कमला हॅरिस यांना अनपेक्षितपणे डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षीय निवडणुकीचे नामांकन मिळाल्यामुळे त्यांना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून मिळालेल्या सल्ल्यांपैकी एक सल्ला म्हणजे “प्रचाराच्या टॅलेंट पूलवर सतत लक्ष असू दे, कारण तुम्हाला हवी असलेली प्रतिभा तुमच्या जवळपासच असू शकते.”
एक महिन्यापूर्वी, जो बायडेन यांना माघार घेण्यास भाग पाडले गेल्यानंतर डेमोक्रॅट्सनी हॅरिस यांना उमेदवारी देण्याचा बायडेन यांचा निर्णय खोडून काढला होता. रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी हॅरिस या योग्य उमेदवार आहेत का, असा प्रश्न ते विचारत होते. पण जनमत चाचण्यांचे निकाल हळूहळू हॅरिस यांच्या बाजूने झाल्याचे पाहून लवकरच त्यांच्या नावाला असणारा विरोध मावळत गेला.
डेव्हिड प्लॉफ आणि स्टेफनी कटर यांच्यासह ओबामा यांचे माजी सल्लागार लगेचच हॅरिस यांच्या मोहिमेत सामील झाले. तर दुसरीकडे हॅरिस यांना उघडपणे पाठिंबा देण्यापूर्वी ओबामांनी हॅरिस यांना अनेक दिवस वाट पहायला लावली.
अनेक गोष्टींमध्ये घडवला इतिहास
हॅरिस आणि ओबामा यांच्यात डेमोक्रॅट्स आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असण्याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीं समान आहेत. अमेरिकन सिनेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोघांनी स्थानिक राजकारणात काम केले. ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष ठरले. तर हॅरिस या पहिल्या महिला उपराष्ट्रपती, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती बनल्या आहेत. अशाप्रकारे दोघांनीही ऐतिहासिकदृष्ट्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व केले आहे. जर हॅरिस निवडणुका जिंकल्या तर पुन्हा एकदा इतिहास घडणार आहे. अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला अध्यक्ष म्हणून इतिहासात त्यांच्या नावाची नोंद होणार आहे.
एका डेमोक्रॅटच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून निवड केली, त्याला ओबामांनी पाठिंबा दर्शवला होता. 2020 च्या निवडणुकीपासून ते नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात आहेत, असे सहाय्यकांचे म्हणणे आहे. “योजनाबद्ध किंवा धोरणात्मक सल्ला, निधी उभारणी इत्यादींसह ओबामा यांनी हॅरिस यांच्या मोहिमेला शक्य त्या मार्गाने पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे”, असे ओबामांच्या एका सहाय्यकाने सांगितले.
2008 ची पुनरावृत्ती
हॅरिस यांच्या प्रचार सभा या ओबामांच्या हजारो लोकांची गर्दी खेचणाऱ्या सभेचेची भव्य पुनरावृत्ती आहे. हॅरिस यांचे माजी सल्लागार जमाल सिमन्स म्हणतात की जरी ही दोघेही राजकीयदृष्ट्या खूप भिन्न व्यक्तिमत्वे असली तरी 2008 मध्ये लोकांनी जो उत्साह ओबामांमध्ये पाहिला होता त्याचीच झलक हॅरिस यांच्यात बघायला मिळत आहे.
हॅरिस यांच्या सहाय्यिकेने सांगितले की दोन्ही ओबामा अधिवेशनात बोलणार आहेत याचा त्यांना आनंद झाला. मिशेल ओबामा या पक्षात प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्यांनी स्वतः पाठपुरावा केला असता तर जनमत चाचण्यांनुसार, अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी त्यांना लक्षणीय पाठिंबा मिळाला असता.
दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा अजूनही डेमोक्रॅट्समध्ये प्रचंड प्रमाणात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. पक्षाध्यक्षपदाच्या त्यांच्या दोन टर्म्सकडे नॉस्टॅल्जिया म्हणून पाहिले जाते. त्यांच्या अद्ययावत गाण्यांनी सुसज्ज असणारी प्लेलिस्ट आणि अद्ययावत पुस्तक वाचनाची यादी यामुळे सात वर्षांनंतरही ओबामांची पक्षातील तरुण लोकांमधील क्रेझ असूनही कायम आहे.
ओबामा बायडेन संबंध
हॅरिस यांच्यावर ओबामांचा प्रभाव एकीकडे वाढला आहे तर दुसरीकडे आपले माजी उपराष्ट्रपती बायडेन यांच्याशी असलेले ओबामांचे संबंध अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत.
“तुम्ही कोणावर तरी प्रेम करू शकता आणि कोणाचा तरी आदर करू शकता आणि तरीही ते नातेसंबंध गुंतागुंतीचे असू शकतात,” असे बायडेन – ओबामा या दोघांशीही जवळीक असलेल्या एका डेमोक्रॅटने सांगितले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)