इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना, भारताने या प्रदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मदत आणि प्रयत्न या दोन्हीची व्याप्ती वाढवली आहे.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने आणखी एक सूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना (पीआयओ) इराणच्या राजधानीतून, विशेषतः वैयक्तिक वाहतुकीची सुविधा असलेल्यांना, स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
एका सार्वजनिक घोषणेत, दूतावासाने व्यक्तींना तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे, कारण सद्य परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. संभाव्य संघर्ष युद्धात रुपांतरीत होण्याची भीती वाढत असल्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे.
“जे लोक स्वतःच्या वाहनांचा वापर करून शहर सोडू शकतात त्यांना त्वरित तसे करण्यास प्रोत्साहित केले जात आहे,” असे या सूचनापत्रात म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या संपर्कात नसलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकांना तातडीने संपर्क साधून त्यांचे स्थान आणि संपर्क या विषयीची माहिती सामायिक करण्याचे आवाहन दूतावासाने केले आहे.
समन्वित स्थलांतर आणि मदत उपाय
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पुष्टी केली की अनेक भारतीय नागरिकांना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्याच्या दृष्टीने आधीच मदत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अलिकडच्या काळात तेहरानमधून भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्थेचे- विशेषतः बसेस – नियोजन करण्यात आले आहे.
“अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून स्थलांतरित करण्यात आले आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले. “आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी दूतावास इराणमधील भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहे.”
आपत्कालीन हेल्पलाईन आणि नियंत्रण कक्ष
संवाद आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढविण्यासाठी, नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने 24×7 चालणारा नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. इराण आणि भारतात मदत मागणाऱ्या भारतीय नागरिकांना व्हॉट्सॲप सपोर्टसह अनेक हेल्पलाइन क्रमांक प्रदान केले आहेत.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने बंदर अब्बास आणि झाहेदानसह विविध प्रदेशांसाठी खास संपर्क लाईन्ससह स्वतःची 24 तास सुरू राहणारी आपत्कालीन हेल्पलाईन देखील सुरू केली आहे.
मदतीसाठी संपर्क कुठे साधावा
दूतावास हेल्पलाईन (इराण):
फोन नंबर : +98-9128109115, +98-9128109109
व्हॉट्सअँप नंबर : +98-901044557, +98-9015993320, +91-8086871709
ईमेल : cons.tehran@mea.gov.in
परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्ष (भारत):
टोल फ्री नंबर : 1800-118-797
फोन नंबर : +91-11-23012113 / 23014104 / 2301790
व्हॉट्सअँप नंबर : +91-9968291988
ईमेल: situationroom@mea.gov.in
हुमा सिद्दीकी