शस्त्रसंधी नंतर केवळ काही दिवसांतच, भारताने पश्चिम सीमेवर सुरक्षा उपाययोजना वाढवत गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-कश्मीरमध्ये गुरुवारी, व्यापक Mock Drills (प्रशिक्षण सराव) सुरू करण्याची घोषणा केली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, हे सराव युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरी प्रशासन आणि सामान्य नागरिक यांना तयारी ठेवण्यासाठी पूर्वतयारीचा भाग आहेत.
हे मॉक ड्रिल्स अशा वेळी होणार आहेत, जेव्हा 10 मे पासून भारत-पाकिस्तानदरम्यान नाजूक शस्त्रसंधी सुरू आहे. याआधी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित संघटनांना जबाबदार धरले आहे.
या हल्ल्यानंतर 7 मे रोजी, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी केंद्रांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. त्यानंतर काही दिवस दोन्ही देशांमध्ये चकमकी घडल्या, ज्याचे परिणामी शस्त्रसंधीत रूपांतर झाले.
नागरी सज्जतेसाठी मॉक ड्रिल्स
या सरावांत हवाई हल्ल्यांची सूचना (air raid sirens), ब्लॅकआउट प्रोटोकॉल्स आणि तातडीच्या स्थलांतराच्या (evacuation) प्रक्रिया प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यात येणार आहेत. नागरिकांना सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण दिले जात आहे – जसे की अन्नसाठा कसा करायचा, पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांपासून बचाव, आणि संपर्क साधने बंद झाल्यास काय करावे इत्यादी.
पंजाबमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे, कारण हे राज्य पाकिस्तानी सीमेला लागून असल्यामुळे इथे धोका अधिक आहे.
याव्यतिरिक्त 100 हून अधिक ठिकाणांना “विशेष संवेदनशील” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी खात्री केली आहे की बंकर, निवारा स्थळे आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स (पूर्वसूचना यंत्रणा) कार्यरत आहेत.
स्थानिक प्रशासन आणि हवाई दलामध्ये समन्वयासाठी हॉटलाइन आणि रेडिओ चाचण्या घेतल्या जात आहेत.
याबाबत एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “हे सराव फक्त खबरदारी नाहीत तर एक ठाम संदेश आहे, की भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या नागरिकांचे आणि पायाभूत सुविधाांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.”
जागतिक स्तरावर भारताचा राजकीय प्रतिसाद
भारताने पाकिस्तानच्या दहशतवादातील सहभागाबाबत जागतिक जनजागृती सुरू केली आहे.
सात सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळे, ज्यामध्ये विविध पक्षांचे खासदार सहभागी आहेत, ३३ देशांच्या राजधानीत भेटी देत आहेत, ज्यामध्ये न्यूयॉर्क, बहारीन, दक्षिण कोरिया, स्लोव्हेनिया, पनामा, गायाना आणि कतार यांचा समावेश आहे.
न्यूयॉर्कमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ठामपणे सांगितले की, “पाकिस्तानातून कोणीही असा विचार करू नये की, ते आमच्या नागरिकांना त्यांना वाटेल तेव्हा ठार करू शकतात. त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.”
प्रतिनिधीमंडळाने, यावेळी 9/11 हल्ल्याच्या मेमोरियलवर श्रद्धांजली अर्पण केली आणि जागतिक दहशतवादाच्या सामूहिक वेदना अधोरेखित केल्या.
बहारीन, दक्षिण कोरिया आणि स्लोव्हेनिया येथे भारतीय खासदारांनी वरिष्ठ नेत्यांना, भारताच्या दहशतवादाबाबतच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाची माहिती दिली.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की, “भारत या लढ्यात एकत्र आहे.”
प्रतिनिधीमंडळांनी भारतीय वंशाच्या नागरिकांना “फोर्स मल्टिप्लायर्स” म्हणून काम करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते सार्वजनिक आणि राजकीय मतप्रवाह आपल्या यजमान देशांमध्ये प्रभावीत करू शकतील.
AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी, यांनी पाकिस्तान-समर्थित दहशतवादी आणि ISIS च्या विचारसरणीतील साम्य दर्शवत या हल्ल्यांच्या मागील अत्यंत टोकाच्या विचारधारेवर प्रकाश टाकला.
शस्त्रसंधी असूनही सतर्कता कायम
10 मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतरही भारत पूर्णपणे सतर्क आहे. गुप्तचर यंत्रणा संभाव्य धोके सतत तपासत आहेत आणि सैन्याची तयारीही उच्च स्तरावर ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, पहलगाम हल्ल्याबाबत ठाम भूमिका घेत स्पष्ट केले आहे की, “हल्ल्याचे दायित्व निश्चित केले जाईल आणि दोषींना त्यांच्या कल्पनाही येणार नाही अशा पद्धतीने शिक्षा केली जाईल.”
ही कृती भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचा ठाम पुरावा आहे, तसेच जागतिक पातळीवर भारताची भूमिका अधिक आक्रमक आणि परिणामकारक बनवण्याचा स्पष्ट प्रयत्नही आहे.
टीम भारतशक्ती