“जर इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला, तर अमेरिकेवर त्याची कायदेशीर जबाबदारी येईल,” असा थेट इशारा, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी गुरुवारी दिला. CNNच्या एका अहवालानंतर त्यांनी हे विधान केले, ज्यात असा दावा करण्यात आला होता की, इस्रायल अशाप्रकारचे हल्ले करण्याचा विचारात आहे.
इराण आणि अमेरिका, जे इस्रायलचे सर्वात जवळचे सहयोगी आहेत, त्यांचा शुक्रवारी रोम येथे अणुकरारासंदर्भात पाचवा दौर होणार आहे. इराणमधील युरेनियम समृद्धीवरून सध्या दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत. वॉशिंग्टनने असा आरोप केला आहे की, इराण अणुबॉम्ब तयार करू शकतो, मात्र इराणने हा आरोप फेटाळला आहे.
CNN ने गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, “इस्रायलने लष्करी कारवाईचा अंतिम निर्णय घेतला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. तर, दुसरीकडे अमेरिकन अधिकाऱ्यांचे यावर एकमत नाही, की ते इस्रायलवर प्रत्यक्षात हल्ला करतील की नाही.”
“इस्रायलने कोणतीही साहसी कृती करू नये, असा इराणचा स्पष्ट इशारा आहे,” असे अराकची यांनी संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनीओ गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “जर इस्रायलने हल्ला केला, तर वॉशिंग्टनलाही त्यामध्ये समान भागीदाक मानले जाईल आणि इराण आपल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी ‘विशेष उपाय’ करेल आणि त्याविषयी थेट आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला (IAEA) कळवले जातील.”
अराकची यांनी, या उपाययोजनांबद्दल अधिक खोलात जाऊन माहिती दिली नाही. एप्रिलमध्ये इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या सल्लागाराने सांगितले होते की, “इराण IAEA बरोबर सहकार्य थांबवू शकतो किंवा समृद्ध युरेनियम सुरक्षित आणि अज्ञात ठिकाणी हलवू शकतो.”
इराणने इस्रायलला दिली गंभीर इशारा
गुरुवारी, इराणच्या क्रांतीकारी रक्षक दलाने (Revolutionary Guards) म्हटले की, “इस्रायलने हल्ला केल्यास त्याला ‘विनाशकारी आणि निर्णायक’ प्रत्युत्तर दिले जाईल.”
“ते युद्धाची भीती घालून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते चुकीच्या गृहितकांवर आधारलेले आहे. कारण इस्लामिक रिपब्लिक युद्धाच्या काळात जनतेचा आणि लष्कराचा भरघोस पाठिंबा मिळवू शकते,” असे रक्षक दलाचे प्रवक्ते अली मोहम्मद नाईनी यांनी सांगितले.
राजकीय सूत्रांनी सांगितले की, “अमेरिका आणि इराणमधील चर्चा अपयशी ठरल्यास किंवा नवीन अणुकरारामुळे इस्रायलच्या चिंता निवारण न झाल्यास, इस्रायल आपल्या प्रतिस्पर्धी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेऊ शकतो.”
गुरुवारी, अराकची यांनी टीव्हीवरील एका मुलाखतीत सांगितले की, “जर अमेरिकेचा उद्देश इराणमध्ये युरेनियम समृद्धी थांबवणे असेल, तर त्यासाठी कोणताही करार होणार नाही.”
त्यांनी सांगितले की, “अमेरिका म्हणते त्यांना इराणमध्ये समृद्धी मान्य नाही… आणि ती पूर्णतः थांबवली पाहिजे. जर हाच त्यांचा हेतू असेल, तर करार शक्य नाही.”
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुचवले की, आंतरराष्ट्रीय सहभाग असलेल्या युरेनियम समृद्धी कंसोर्टियमचा विचार केला जाऊ शकतो, पण तो इराणमध्ये होणाऱ्या समृद्धीची जागा घेऊ शकत नाही.
मंगळवारी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी म्हटले की, “इराणने युरेनियम समृद्धी थांबवावी, ही अमेरिकेची मागणी अतिरेकी आणि असह्य आहे,” नवीन अणुकरारावर चर्चा यशस्वी होईल की नाही, यावर देखील त्यांनी शंका व्यक्त केली.
इराणचा दावा आहे की, त्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम पूर्णतः नागरी उद्देशांसाठीच आहे.
अराकची यांनी सांगितले की, “इराणकडे अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता आहे, पण त्यांचा तसा हेतू नाहीये.”
गेल्यावर्षी, एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात इराण आणि इस्रायल यांच्यात थेट गोळीबाराची देवाणघेवाण झाली होती, ज्यामुळे प्रादेशिक संघर्षाचा धोका वाढला होता.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)