तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांनी अमेरिकन सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांच्याशी आपल्या पॅसिफिक दौऱ्यादरम्यान दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने गुरुवारी सांगितले. बीजिंगने तैवानच्या समस्येबाबत चीन – अमेरिका संबंधांमधील “लाल रेघ” (मर्यादा) ओलांडू नये असे म्हटले आहे.
लोकशाही शासन पद्धती असलेल्या तैवानला चीन स्वतःचा प्रदेश मानतो. त्यामुळे तैवानला कोणत्याही देशाने आपल्या जाळ्यात अडकवू नये, त्यांना तसा अधिकार नसल्याचे चीन मानते. त्यामुळे प्रशांत महासागराच्या दौऱ्यादरम्यान हवाई आणि गुआम या दोन्ही ठिकाणी लाई यांना थांबण्याची परवानगी दिल्याबद्दल चीनने अमेरिकेचा निषेध केला आहे.
तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रवक्ते कॅरेन कुओ म्हणाले की लाई यांचे जॉन्सन यांच्याशी बोलले झाले. मात्र या संभाषणाचा तपशील त्यांनी दिला नाही. जॉन्सन यांच्या कार्यालयानेही प्रतिक्रिया मागणाऱ्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही.
या संपूर्ण संभाषण प्रक्रियेशी जवळून परिचित असलेल्या एका स्रोताने सांगितले की हे टेलिफोन संभाषण बुधवारी दुपारी अमेरिकन वेळेनुसार झाले. मात्र या कारणामुळे चीनने तैवानभोवतीचा लष्करी वेढा अजून वाढवू नये.
या कॉलबद्दल विचारले असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, लाई यांच्या अमेरिकी दौऱ्यांबाबत सरकारने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.
“मी पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की तैवानचा मुद्दा हा चीनच्या मूळ हितसंबंधांचा केंद्रबिंदू आहे आणि चीन-अमेरिका संबंधांमध्ये कदाचित ओलांडली जाणार नाही अशी पहिली लाल रेघ आहे,” असे लिन जियान यांनी बीजिंगमधील नियमित पत्रकार परिषदेत सांगितले.
अमेरिकेने चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवले पाहिजे आणि तैवानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तसेच फुटीरतावादी शक्तींना चुकीचे संकेत पाठवणे थांबवले पाहिजे, असे लिन म्हणाले.
“चीन आपले राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व दृढ आणि सशक्त उपाययोजना करेल.”
या संपूर्ण घडामोडींशी परिचित असलेल्या स्रोतांनी रॉयटर्सला सांगितले आहे की लाई यांची पॅसिफिक भेट आणि हवाई तसेच अमेरिकेच्या गुआममध्ये थांबणे यावर प्रतिक्रिया म्हणून चीन युद्धसरावाची एक नवीन फेरी आयोजित करू शकतो.
हवाईमध्ये असताना, लाई यांनी अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांना कॉल करून 20 मिनिटे त्यांच्याशी देखील चर्चा केली, ज्यात त्यांनी चीनच्या लष्करी धोक्यांबाबत माहिती दिली.
2022 मध्ये, चीनने तैवानच्या सभोवताली युद्धसरावांचे आयोजन केले होते. त्यावेळी अमेरिकन सभागृहाच्या अध्यक्षा असलेल्या पेलोसी यांच्या तैवान भेटीवर चीनने आपला राग व्यक्त केला होता.
लाई यांनी मात्र चीनचे सार्वभौमत्वाचे सर्व दावे नाकारले आहेत.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)