गुरुवारी, लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान, 242 प्रवाशांसह गुजरातमधील अहमदाबादजळच्या मेघाणी नगर या रहिवासी भागात कोसळले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दृश्यांमध्ये, अपघाताच्या ठिकाणाहून धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत. हा परिसर घनदाट वस्तीचा आहे.
नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या या विमान दुपारी 1:39 वाजता, अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे 23 वरून उड्डाण केले होते आणि उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.
हा अपघात नियमित टरमॅक ऑपरेशन्सदरम्यान घडल्यामुळे तात्काळ आणि मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन प्रतिसाद देणे सोपे झाले.
प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाचे बोईंग B787-8 ड्रीमलाइनर हे विमान उड्डाणाच्या टप्प्यात असतानाच हा अपघात घडला.
बचाव कार्य सुरू
अहमदाबाद अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा विभागाने, तात्काळ मदत पोहचवण्यास सुरुवात केली असून, शहरातील विविध विभागांतून पाचपेक्षा अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
“पाचहून अधिक अग्निशमन वाहनांची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत,” अशी माहिती एका वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्याने दिली.
AI 171 या फ्लाइटमध्ये, एकूण 242 लोक प्रवास करत होते, त्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. दुर्घटनेतील एकूण नुकसानीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र बहुतेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मेघाणी नगरमधील स्थानिक रहिवाशांनी, तीन मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकल्याचे आणि त्यानंतर विमानतळ परिसरात धुराचे लोट दिसल्याचे सांगितले. परंतु स्फोटाचे नेमके कारण किंवा स्वरूप अजून अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर लगेचच विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले, जेणेकरून आपत्कालीन सेवा सुरळीत चालू राहतील आणि सार्वजनिक सुरक्षितता राखली जाईल. सुरक्षा दलांनी घटनास्थळाचा परिसर बंद केला आहे, आणि विमानतळ प्रशासनाने प्राथमिक आंतरशाखीय चौकशी सुरू केली आहे.
विमानातील नुकसानीचे प्रमाण तपासण्यासाठी एक तांत्रिक टीम नेमण्यात आली असून, अपघाताचे कारण मात्र अजूनही तपासाधीन आहे. DGCA (नागरी उड्डाण संचालनालय) यांना याची माहिती देण्यात आली असून, ते लवकरच सविस्तर चौकशी सुरू करतील.
एअर इंडिया आणि DGCA यांच्याकडून, अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. घटनास्थळी बचाव पथके आणि तपास यंत्रणा कार्यरत असतानाच पुढील अपडेट्स येणे अपेक्षित आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNSच्या इनपुट्सह)