पाकिस्तानने, भारतीय हवाई दलाचे आदमपूर हवाई तळ आणि मौल्यवान अशी S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली नष्ट केल्याच्या दावा केला होता. मात्र पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहाटे अचानक आदपूर तळाला भेट दिली आणि S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली समोर उभे राहत, तिच्या सलामतीचा पुरावा दिला.
पंतप्रधान मोदी, C-130J सुपर हरक्युलीस या विमानातून त्या धावपट्टीवर उतरले, जी बॉम्ब हल्ल्याने उडवून दिल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मोदींच्या केवळ उपस्थितीनेच इस्लामाबादच्या हा खोटा प्रोपगंडा पूर्णपणे खोडला गेला.
ना कोणती हानी, ना कुठली शंका
पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीनंतर, प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, एक स्थिर आणि पूर्णत: कार्यरत असे हवाई तळ दिसत आहे. सर्वात ठळक दृश्य म्हणजे – पंतप्रधान मोदी आणि हवाई दलाचे अधिकारी, पूर्णपणे सलामत असलेल्या S-400 प्रणालीसमोर उभे असून, पाकिस्तानच्या खोट्या दाव्याला हेच खरे प्रत्युत्तर आहे.
अन्य एका छायाचित्रात, पंतप्रधान मोदी MiG-29 लढाऊ विमानासमोर उभे असून,त्याखाली तळाचे बोधवाक्य दिसते आहे:
“When enemy pilots don’t sleep well.”
“पंतप्रधानांची ही भेट केवळ मनोबल वृद्धिंगत करणारी नव्हती, तर एक ठाम रणनीतिक संदेशही होती,” असे एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. “त्या एका फोटोने पाकिस्तानचे संपूर्ण कथन उघड झाले,” असेही ते म्हणाले.
क्षेपणास्त्रामधील संदेश
ही भारतातील S-400 प्रणालीच्या कार्यरत स्थितीतील पहिली अधिकृत छायाचित्रे आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली की, 9 व 10 मे रोजी पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान आदमपूर येथील S-400 युनिटने यशस्वीपणे शत्रूच्या अनेक क्षेपणास्त्रांना अडवले.
भारताकडे सध्या 3 कार्यरत S-400 स्क्वॉड्रन असून, आणखी दोन लवकरच कार्यरत होतील.
Sharing some more glimpses from my visit to AFS Adampur. pic.twitter.com/G9NmoAZvTR
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
खोटे दावे, खरे चित्र
पाकिस्तानच्या ISPR चे प्रवक्ते, लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषदांमध्ये पुन्हा पुन्हा असा दावा केला होता की, ‘आदमपूर एअरबेस पूर्णतः नष्ट करण्यात आला आहे.’
या व्यतिरिक्त, पाकिस्तानने उधमपूर, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमधील फिरोजपूर येथे नागरी भागांवरही क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले. मात्र, भारताने कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे स्पष्ट केले.
तो सॅल्युटच पुरेसा होता
पंतप्रधान मोदींनी भेटीदरम्यान, वायुसेनेच्या जवानांशी संवाद साधला आणि त्यांना सॅल्युट केला, जो त्यांच्या शौर्याचा गौरव होता आणि सोबतच एक जिवंत संदेश होता. त्यांनी घातलेली त्रिशूल टोपी, जी पश्चिमी हवाई कमांडचे प्रतीक आहे, आणि S-400 सोबत घेतलेला फोटो, हे दोन्ही मौन-पद्धतीने पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर आणि भारताच्या युद्धातील विजयाचे प्रतीक आहे.
“आपण केवळ सीमारेषा राखली नाही, तर आपण सत्यही राखून ठेवलं,” अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे.
– रवी शंकर