शुक्रवारी अतिवृष्टी झाल्याने चीनच्या मध्य आणि दक्षिण भागात अतिवृष्टी तसेच अचानक आलेल्या पुरामुळे धोका वाढला आहे. त्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली.
जलसंपदा मंत्रालय आणि राष्ट्रीय हवामान अंदाज संस्थेचा हवाला देत, राज्य वृत्तसंस्था शिन्हुआने वृत्त दिले की, या वर्षातील पहिला रेड अलर्ट गुरुवारी उशिरा अनहुई, हेनान, हुबेई, हुनान, गुइझोउ आणि गुआंग्शी प्रदेशात जारी करण्यात आला.
हवामानशास्त्रज्ञांच्या मते हवामान बदलांशी या अतिवृष्टी आणि तीव्र पूरांचा संबंध असून, राज्यकर्त्यांसमोर मोठ्या प्रमाणात वाढती आव्हाने निर्माण करत आहेत. या बदलांमुळे जुन्या पूर संरक्षण प्रणाली बाद ठरण्याचा, लाखो लोकांना विस्थापित करण्याचा आणि चीनच्या 2.88 कोटी डॉलर्सच्या कृषी क्षेत्रावर कहर करण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सर्वाधिक नुकसान
या वर्षी जूनच्या सुरुवातीला चीनमध्ये नेहमीपेक्षा लवकर पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे साचलेल्या पाण्यात उगवलेली पिके नंतर आलेल्या तीव्र उष्णतेमुळे जळून गेली, जलाशयांतील पाणी कमी झाले आणि रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधा खराब झाल्या.
गेल्या जुलैमध्ये, जेव्हा पाऊस सामान्यतः सर्वाधिक होता तेव्हा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे आर्थिक नुकसान 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होते.
2020 मध्ये चीनने दशकांमधील सर्वात लांब पावसाळी हंगामाचा अनुभव घेतला. त्यावेळी 60 दिवसांपेक्षा जास्त दिवस किंवा नेहमीपेक्षा सुमारे तीन आठवडे जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे झालेले नुकसान तिप्पट होते.
मुसळधार पाऊस
गुरुवारी, दक्षिण हुनानमध्ये मुसळधार पावसामुळे लिशुई नदीच्या वरच्या आणि खालच्या भागात 1998 नंतरचा सर्वात मोठा पूर आला कारण नदीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा जास्त झाली.
चीनमध्ये टिकटॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डुयिनवर अपलोड केलेल्या व्हिडिओंमध्ये नदी आपले पात्र सोडून मुख्य रस्त्यांवर आल्यामुळे कचरा खालच्या दिशेला वाहून नेताना दिसत आहे.
नैऋत्य चोंगकिंगच्या डोंगराळ महानगरात, गुरुवारी राज्य माध्यमांनुसार, रस्त्यांवर पूर आल्यामुळे अनेक नागरी इमारती चिखलाच्या पाण्यात बुडाल्या तर काही वाहनेदेखील वाहून गेली. काही ठिकाणी तर, पाणी जवळजवळ वीजेच्या तारांवरून वाहत होते.
चोंगकिंगमधील एका पर्वतीय काउंटीमधील शहरे आणि गावांमधून जवळजवळ 300 लोकांना बाहेर काढण्यात आले, जिथे दररोज एकूण पाऊस 304 मिमी (12 इंच) इतका पडत आहे, तर पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या पावसामुळे किमान एक स्थानिक नदी 19 मीटर इतकी फुगली असल्याचे, राज्य सरकारच्या सीसीटीव्हीने वृत्त दिले आहे.
बुधवारी, दक्षिण ग्वांगडोंग प्रांतातील झाओक्विंग शहरात पुराचे पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा पाच मीटरनेही जास्त वाढल्याने वीजपुरवठा खंडित झाला, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. पुरातील पाण्याच्या पातळीचा हा ऐतिहासिक विक्रम असल्याचे सांगितले जात आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)