‘सीमापार लष्करी कारवायांवर सध्या सुरू असलेला थांबा (pause) एका ठराविक तारखेनंतर संपणार आहे,’ असे इस्लामाबादकडून पसरवण्यात आलेले वृत्त, भारताने ठामपणे फेटाळून लावले आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, ’10 मे रोजी, पाकिस्तानी लष्करी पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या सशर्त विरामाची कोणतीही अंतिम मुदत नाही.’
भारतीय लष्कराने रविवारी सांगितले की, “लष्करी संचालन महासंचालकांमधील (DGMOs) झालेल्या चर्चेनुसार, घोषित केलेला युद्धविराम पुनर्पुष्टी किंवा कालमर्यादेवर अवलंबून नाही, जशी अहवालांमध्ये मे 18 ही तारीख नमूद केली होती. “याला कोणतीही अंतिम तारीख नाही. हा विराम पूर्णतः पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून आहे,” असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “पाकिस्तानला सध्या आम्ही ‘परीविक्षणावर’ (probation) वर ठेवले आहे. “आमचे पाऊल हे केवळ ट्रेलर होते, गरज भासल्यास आम्ही संपूर्ण चित्र दाखवू,” असा इशारा त्यांनी शुक्रवारी भुज हवाई तळावर दिला. “दहशतवाद निर्मूलन हे नव्या भारताचे नवे वास्तव आहे,” असे ते म्हणाले.
भारतीय लष्कराने एका छोट्या निवेदनात स्पष्ट केले की, “DGMO च्या स्तरावर सध्या कोणतीही पुढील बैठक नियोजित नाही.”
ऑपरेशन सिंदूर: सीमापार धक्का
भारत-पाकिस्तानमधील हा संघर्षविराम ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर काही दिवसांत लागू करण्यात आला. हा एक तीव्र प्रतिहल्ला होता जो पहलगाम हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला.
9 आणि 10 मे रोजी रात्री, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून तिथल्या अनेक दहशतवादी तळांवर टप्प्याटप्प्याने हल्ले केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, यांनी त्यांच्या कबुलीजबाबात नुकसानीचे प्रमाण मान्य केले. “पहाटे 2:30 वाजता, मला जनरल असीम मुनीर यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितले की, अनेक हवाई तळांवर भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे,” असे शरीफ यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले आणि त्या रात्रीला पाकिस्तानच्या अलीकडील इतिहासातली ‘सर्वात काळोख्या रात्रींपैकी एक’ असे संबोधले.
भारतीय लष्करी सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे आणि उपग्रह प्रतिमांनी हल्ल्याची पुष्टी केल्यानुसार, 11 पाकिस्तानी हवाई तळ एकतर नष्ट झाली किंवा ती निकामी झाली. भारताच्या उच्च-मूल्यवान लक्ष्यांमध्ये खालील तळ समाविष्ट होती:
नूर खान हवाई तळ (VIP केंद्र), शाहबाज हवाई तळ, जेकबाबाद व भोलारी हवाई तळ (Erieye AWACS ताफा), भोलारीत एक Erieye रडार विमान, कमांड सेंटर, रडार यंत्रणा व हॅंगर उद्ध्वस्त झाल्याचे गुप्तचर अहवालात नमूद केले आहे, हे हल्ले म्हणजे पाकिस्तानच्या प्रारंभिक इशारा क्षमतेला जबरदस्त धक्का आहे.
पाकिस्तान हवाई दलाचे मोठे नुकसान
भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे झालेले तपशीलवार नुकसान:
- 2 JF-17 फायटर जेट्स (एक हवाई लढाईत, एक जमिनीवर)
- 1 मिराज विमान
- 1 Erieye AWACS विमान
- 1 C-130 मालवाहतूक विमान
C-130 विमानाच्या जळत्या अवशेषांचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, 5 हवाई कर्मचारी- ज्यामध्ये स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ यांचा समावेश आहे, त्यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले.
दहशतवादाच्या पायाभूत रचनेवर आघात
Operation Sindoor चा दुसरा टप्पा, केवळ लष्करी लक्ष्यांपुरता मर्यादित नव्हता. या टप्प्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 21 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद चे वरिष्ठ कमांडरही होते.
लक्ष्य केलेली महत्वाची टार्गेट्स: सवाई नाला, बालाकोट, मुरिदके आणि कोटली. ही ठिकाणे दीर्घकाळ भारतविरोधी कारवायांची केंद्रे मानली जात होती. आता त्यांना जमीनदोस्त केल्याने, हे भारताचे सर्वात मोठे आणि व्यापक प्रतिहल्ले मानले जात आहे.
टॉप LeT कमांडरचा खात्मा
लष्कर-ए-तोयबा चा टॉप कमांडर सैफुल्ला खालिद (उर्फ अबू सैफुल्ला) याचा सिंधमधील मटली फलकारा चौकात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून खात्मा केला. तो अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता, जसे की:
2001 – रामपूर CRPF कॅम्प हल्ला
2005 – IISc बंगळुरू गोळीबार
2006 – RSS मुख्यालयावर हल्ल्याचा कट
नेपाळमध्ये ‘विनोद कुमार’ या खोट्या नावाने कार्यरत असलेल्या खालिदने, नंतर पाकिस्तानात परत येऊन पुन्हा लष्कर व जमात-उद-दवा मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचा खात्मा करणे भारताच्या “अदृष्य हात” (invisible hand) धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे, ज्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था गोंधळून गेल्या आहेत.
पाकिस्तानचा फाटलेला मुखवटा
हल्ल्यांनंतर पाकिस्तानने सुरुवातीला, सर्व घटना लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्ल्याचे प्रमाण कालांतराने इतके वाढले, की इस्लामाबादला ते अंशतः स्वीकारण्यास भाग पाडले.
निष्क्रिय झालेली हवाई तळ, उद्ध्वस्त झालेली रडार यंत्रणा आणि नष्ट झालेले दहशतवादी गट यामुळे पाकिस्तानला ज्या धोरणिक वास्तवाला तो टाळू पाहत होता, त्याचा सामना करावा लागत आहे. “नवीन दिल्ली आता नव्या लढाईची व्याख्या रचते आहे.”
टीम भारतशक्ती