इराणी आण्विक स्थळांवरील हल्ला : उत्तर कोरियाचाही निषेधाचा सूर

0
उत्तर

सोमवारी  इराणच्या आण्विक स्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा उत्तर कोरियाने तीव्र निषेध केला असून हा प्रकार इराणच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांचे गंभीर उल्लंघन असल्याचे मत व्यक्त केल्याचे वृत्त उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे.

पश्चिमेकडून स्वीकारल्या जाणाऱ्या आणि प्रोत्साहित केलेल्या जेरुसलेमच्या “अखंड युद्धाच्या हालचाली आणि प्रादेशिक विस्तार” मुळे निर्माण झालेल्या मध्यपूर्वेतील सध्याच्या तणावाला सर्वस्वी अमेरिका आणि इस्रायल दोषी आहेत, असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

‘प्रादेशिक अखंडतेला हिंसकपणे पायदळी तुडवले’

“(उत्तर कोरिया) अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो … ज्याने एका सार्वभौम राष्ट्राची प्रादेशिक अखंडता आणि सुरक्षा हितसंबंधांना हिंसकपणे पायदळी तुडवले,” असे मत केसीएनए वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या निवेदनात नाव न सांगता एका प्रवक्त्याने व्यक्त केले आहे.

“न्यायसंपन्न आंतरराष्ट्रीय समुदायाने अमेरिका आणि इस्रायलच्या संघर्षात्मक कृत्यांचा एकमताने निषेध करत या प्रकाराला नकार देण्यासाठी आवाज उठवला पाहिजे,” असेही निवेदनात म्हटले आहे.

इराण आणि अण्वस्त्रधारी उत्तर कोरिया यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याबरोबरच, अनेक दशकांपासून इतरही गोष्टींसाठी उभय देशांमध्ये लष्करी सहकार्य सुरू असावे असा संशय आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या एका समितीने 2021 मध्ये सांगितले होते की दोन्ही देशांनी महत्त्वाच्या भागांच्या हस्तांतरणासह लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकास प्रकल्पांवर पुन्हा सहकार्य सुरू केले आहे.

प्योंगयांग मदतीचा हात पुढे करेल का?

“प्योंगयांग इराणला नष्ट झालेल्या क्षेपणास्त्र उत्पादन सुविधांची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मदत देऊ शकते, ज्यामध्ये टेहळणी टाळण्यासाठी नवीन ठिकाणी देखील ही बांधणी उभी करता येईल या विचाराचा समावेश असू शकतो,” असे अमेरिकास्थित कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे अंकित पांडा म्हणाले.

अशा तंत्रज्ञानाबाबतची राजकीय आणि लष्करी संवेदनशीलता लक्षात घेता, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची पुनर्बांधणी किंवा त्याची गती वाढवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये इतर कोणताही देश ठोस सहकार्य करण्यास इच्छुक असेल की नाही याबाबत खात्री नसल्याचे ते म्हणाले.

“शस्त्रांच्या डिझाइनशी संबंधित काही बाबी आहेत ज्यांचा प्रसार उत्तर कोरियाला करायचा नाही कारण एकदा इराणमध्ये गेल्यानंतर ते अमेरिकेला सापडू शकतात आणि अमेरिकेला त्याच्या प्रतिबंधक शक्तीला कमकुवत करण्यात मदत करू शकतात,” याकडे पांडा यांनी लक्ष वेधले.

अर्थात प्योंगयांगला शस्त्रास्त्र निर्मितीचा मोठा अनुभव आहे आणि ते पारंपरिक स्फोटकांसारख्या अणुबॉम्बच्या विखंडनीय नसलेल्या घटकांमध्ये मदत करू शकतात, असे ते म्हणाले.

अमेरिका, युक्रेनियन आणि इतर गुप्तचर सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाने युक्रेनशी लढण्यासाठी हजारो सैनिक तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे पाठवून इराणचा आणखी एक भागीदार असलेल्या रशियाला लष्करी मदत वाढवण्यासाठी गेल्या वर्षी अभूतपूर्व पावले उचलली आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleIndian Army Signs Rs137 Crore Contract with ideaForge Under Emergency Procurement Drive
Next articleIndia’s Strategic Return to China: Rajnath Singh, NSA Doval to Attend SCO Meetings Amid Rising Tensions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here