ऑपरेशन सिंदूरचा एक महिना: भारताचा हल्ला आणि त्याचे व्यापक परिणाम

0

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जलद आणि नियोजनबद्ध बदला म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर पार पाडले. त्यानंतरच्या महिनाभरात भारतशक्तीने उच्च लष्करी सूत्रांकडून मिळवलेल्या विशेष माहितीवरून असे दिसून आले की या ऑपरेशनचे प्रमाण, त्याचे आधुनिक रूप आणि परिणाम सुरुवातीला सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीपेक्षा खूपच जास्त होते. राष्ट्रीय सुरक्षा नियोजक आणि वरिष्ठ लष्करी नेतृत्व 7 जून रोजी ऑपरेशन सिंदूरला झालेला एक महिना शांतपणे साजरा करत असताना, भारतशक्तीला – कृती अहवाल, डिजिटल बुद्धिमत्ता आणि तपशीलवार नुकसान मूल्यांकनांवर आधारित – कळले आहे की या मोहिमेत खोलवर हल्ले, पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना मोठे नुकसान आणि पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या माहितीपेक्षा अधिक विस्तृत theatre of operations (पार पाडण्यात आलेल्या कामगिरीचा परिघ) या गोष्टींचा समावेश होता.

तिन्ही दलांनी केलेल्या वर्गीकृत कारवाई अहवाल आणि युद्धभूमीवरील मूल्यांकनांनुसार, भारतीय हवाई दलाने चार पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली ज्याचे उत्पादक चीन होते आणि दोन मोठी पाळत ठेवणारी विमाने, कदाचित दोन F-16 लढाऊ विमाने, एक C-130J आणि एक SAAB 2000 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) प्रणाली यांचा समूळ नाश केला. अलीकडच्या लष्करी इतिहासातील तांत्रिकदृष्ट्या सर्वात अत्याधुनिक मोहिमांपैकी एक असलेल्या या मोहिमेत भारतीय सैन्याने 7 मे ते 10 मे दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला.

याशिवाय, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई तळांवर आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर दीड डझनहून अधिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे आणि जवळजवळ तेवढीच फ्रेंच SCALP हवाई-प्रक्षेपित क्षेपणास्त्रे डागली. लीक झालेल्या आणि भारतशक्तीने अभ्यास केलेल्या पाकिस्तानच्या अंतर्गत अहवालानुसार, पेशावर, हैदराबाद, बहावलनगर आणि छोड़ येथील खोल लक्ष्यांसह तेरा पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला. याशिवाय ड्रोन हल्ले आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यासह भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे 7.6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान केल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे पाकिस्तानची हवाई संरक्षण आणि ISR यांना गंभीरपणे नुकसान झाले असून त्यांची क्षमता कमी झाली आहे.

पहिला टप्पाः पहलगामपासून वॉर रूमपर्यंत

पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर – ज्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला – भारताच्या सुरक्षा व्यवस्थेची गाडी वेगाने पुढे सरकली. 48 तासांच्या आत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस जनरल अनिल चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी साउथ ब्लॉकच्या वॉर रूममध्ये तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार, 29 एप्रिलपर्यंत, पंतप्रधानांनी सशस्त्र दलांना एकाच उद्देशाने पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिले होते: या प्रदेशाला पूर्ण युद्धाकडे न ढकलता दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सर्जिकल, दंडात्मक हल्ला करा.

देण्यात आलेले आदेश स्पष्ट होते – लवकरात लवकर प्रतिहल्ला, शून्य वाढ.

टप्पा 2: तिन्ही दलांचे एकत्रीकरण, फसव्या कवायती, धोरणात्मक पवित्रा

तणाव वाढत असताना, पाकिस्तानने भारतीय प्रत्युत्तराची अपेक्षा करत नौदलाच्या गोळीबारासाठी अलर्ट जारी केले. मात्र भारताची तयारी नियमित लष्करी हालचालींच्या पडद्यामागे लपलेली होती:

  • भारतीय सैन्याने, व्हायपर स्ट्राइक सराव अंतर्गत, राजस्थान सीमेजवळ यांत्रिक हल्ला केला, संभाव्य युद्धवाढीसाठी तयारी करत असल्याचे दाखवले.
  • भारतीय हवाई दलाने आक्रमक सराव सुरू केला, राफेल, मिराज-2000 आणि Su-30MKI स्क्वॉड्रनना कामगिरीसाठी अलर्टवर ठेवले.
  • भारतीय नौदलाने शांतपणे आयएनएस विक्रांत आणि त्यांच्या वाहक युद्ध गटाला अरबी समुद्रात हलवले, ज्यामुळे सागरी तयारी बळकट झाली.
  • या नियमित कवायती म्हणजे प्रत्यक्षात जवळच्या हल्ल्यासाठी थेट तालीम असल्याचे दिसून आले.

टप्पा 3: फसव्या घोषणा आणि अचूक तयारी

धोरणात्मक अस्पष्टता कायम ठेवण्यासाठी, भारताने 7 मे रोजी देशव्यापी नागरी संरक्षण मॉक ड्रिलची घोषणा केली. शहरांमध्ये सायरन वाजत असताना, खऱ्या कामगिरीची सक्रिय तयारी पूर्णत्वाला नेली जात होते.

उच्च-स्तरीय त्रि-सेवा ब्रीफिंग दरम्यान लक्ष्य निर्देशांक अंतिम करण्यात आले होते, ज्यामध्ये मुरीदके, बहावलपूर, सियालकोट आणि पाकव्याप्त काश्मीर (POJK) मधील अनेक ठिकाणी दहशतवादी लाँच पॅड समाविष्ट होते, याला सूत्रांनी दुजोरा दिला आहे. लक्ष्यांचे अंतिम प्रमाणीकरण हल्ल्यांच्या काही तास आधी झाले.

टप्पा 4: अवघ्या 22 मिनिटांमध्ये भारताची सीमापार कामगिरी फत्ते

7 मे रोजी पहाटे 1.05 वाजता, ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले.

नियंत्रण रेषेवरील दहशतवादी लाँचपॅडवर 22 मिनिटांच्या हल्ल्याने सुरू झालेले हे ऑपरेशन लवकरच अचूकतेने राबवण्यात आलेल्या बहु-टप्प्यांच्या लष्करी मोहिमेत रूपांतरित झाले. भारतीय ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि लपवून नेलेल्या शस्त्रसामग्रींनी केवळ पीओकेमध्येच नव्हे तर पाकिस्तानी हद्दीत खोलवर असणाऱ्या दहशतवादी छावण्या, कमांड पोस्ट आणि रडारांना लक्ष्य केले, ज्यापैकी बऱ्याच घडामोडी सुरुवातीच्या ब्रीफिंगमध्ये उघड करण्यात आल्या नव्हत्या.

ज्या प्रमुख लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला त्यापैकी:

  • मरकझ-ए-तैयबा (मुरीदके येथील एलईटी मुख्यालय) मोठ्या भागाला नुकसान न पोहोचवता लक्ष्यावर जाऊन कोसळण्यासाठी डिझाइन केलेल्या चार ते पाच क्रिस्टल मेझ क्षेपणास्त्रांनी निकामी केले.
  • जैश-ए-मोहम्मदचा मरकझ-ए-सुभान अल्लाह प्रशिक्षण तळ राफेल जेटमधून सोडण्यात आलेल्या सहा SCALP क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे उध्वस्त करण्यात आला, ज्यामध्ये बंकर-बस्टिंग वॉरहेड्सचा वापर करण्यात आला.
  • भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे डागलेल्या इस्रायली आत्मघाती ड्रोन्सनी (loitering munitions) पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
  • अमेरिकन बनावटीच्या एक्सकॅलिबर प्रिसिजन राउंड्सचा वापर करून  M777 हॉवित्झर तोफांनी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या दुसऱ्या क्रमांकाच्या संरक्षण तळांना उद्ध्वस्त केले, ज्याला पोलंडमध्ये तयार झालेल्या विस्तारित पल्ल्याच्या दारूगोळ्याची मदत मिळाली.

30 मिनिटांपेक्षा कमी वेळात, पहाटे 1:27 पर्यंत, कारवाई पूर्ण झाली. नऊ प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले – सर्व पहलगाम हल्ल्याच्या मॉड्यूलशी संबंधित होते आणि 100हून अधिक दहशतवादी मारले गेले.

पाचवा टप्पाः पाकिस्तानचा अल्प प्रतिसाद आणि हल्ल्याची दुसरी लाट

भारतीय संरक्षण दलांना उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ४८ तासांच्या आत पाकिस्तानचा प्रत्युत्तरात्मक हल्ला – ऑपरेशन बन्यान-उम-मारसूस –  सुरू झाला होता. मात्र 10 मे रोजी आठ तासांत हे ऑपरेशन बंद पडले, याला सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशननंतरच्या आढावामध्ये दुजोरा दिला. S-400 प्रणाली आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने येणाऱ्या अनेक धोक्यांना रोखले आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना शून्य नुकसान होईल याची काळजी घेतली.

प्रत्युत्तर म्हणून, 9-10 मे रोजी, ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा अमलात आणण्यात आला. भारतीय हवाई दलाने 13 पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ले केले, ज्यामुळे धावपट्टी, रडार प्रणाली आणि इंधन डेपोचे गंभीर नुकसान झाले. Red Line न ओलांडता पाकिस्तानची प्रत्युत्तरात्मक क्षमता कमी केली.

अधिक मोठा रंगमंच -टप्पा दुसरा आणि त्यापलीकडे

9 ते 10 मे च्या संध्याकाळ दरम्यान, भारतीय सैन्याने पूर्वी मान्य केलेल्यापेक्षा जास्त मोठे हल्ले केले:

  • 13 पाकिस्तानी हवाई तळ आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले.
  • भारताने सोडलेल्या ड्रोनने पश्चिमेला पेशावरपर्यंत आणि दक्षिणेला हैदराबादपर्यंत हल्ला केला, असे एका लीक झालेल्या पाकिस्तानी अंतर्गत अहवालात म्हटले आहे.
  • अटोक, बहावलनगर, गुजरात, झांग, छोर आणि इतर ठिकाणी अतिरिक्त हल्ले झाल्याची पुष्टी झाली – त्यापैकी सात ठिकाणांचा भारताच्या अधिकृत ब्रीफिंगमध्ये उल्लेख नाही.
  • नुकसानीचा अंदाज आता 7.6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये AF-16 आणि एडब्ल्यूएसीएस सिस्टमपासून ते गंभीर रडार नोड्स आणि क्षेपणास्त्र बॅटरीपर्यंतचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानचा प्रत्युत्तरात्मक प्रयत्न, ऑपरेशन बन्यान-उम-मारसूस, 10 मे रोजी आठ तासांत बंद पडला, जो त्याच्या ४८ तासांच्या उद्दिष्टापेक्षा खूपच कमी होता, असे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी 3 जून रोजी उघड केले.

हवाई वर्चस्व आणि हवाई प्रत्युत्तर

भारतशक्तीने पुनरावलोकन केलेल्या डिजिटल युद्धभूमीच्या पुराव्यांनुसार, भारतीय हवाई दलाने S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली आणि SAM बॅटरीच्या मदतीने ऑपरेशन दरम्यान आश्चर्यकारक यश मिळवले:

  • चार चिनी उत्पादन असलेली पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आली.
  • दोन मोठी विमाने – कदाचित एक C-130J आणि एक SAAB 2000 AEW&C – देखील नष्ट करण्यात आली, ज्यामुळे पाकिस्तानी हवाई कमांड-आणि नियंत्रण क्षमतांमध्ये व्यत्यय आला.

हवाई संघर्षाच्या प्रमाणात असे दिसून येते की भारताने लक्ष्यांवर केवळ हल्लाच केला नाही तर काश्मीरपासून अरबी समुद्रापर्यंत असणारे हवाई युद्धक्षेत्र नियंत्रित केले.

टप्पा 6 : धोरणात्मक परिणाम: ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही

10 मे रोजी, संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्याच्या समाप्तीची औपचारिक घोषणा केली. तरीही, सूत्रांच्या मते, भारतीय सैन्य अजूनही उच्च पातळीवरील सतर्कता बाळगून आहे, त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की संघर्षामध्ये आणखी वाढ किंवा प्रॉक्सी हल्ले होण्याची शक्यता आहे.

“आता लक्ष जलद भरपाई, उपकरणांची भरपाई आणि आयएसआर (गुप्तचर-निरीक्षण-जागरूकता) वर्चस्व यावर आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान मोदींनी वारंवार म्हटल्याप्रमाणे, ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक प्रतिसाद नाही – तो एक संदेश आहे आणि तो संदेश देणे अजूनही सुरूच आहे.

भारताच्या दहशतवादविरोधी धोरणासाठी एक नवीन पायंडा

ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या दहशतवादविरोधी सिद्धांतातील धोरणात्मक उत्क्रांतीचे संकेत देते – अचूक लष्करी तंत्रज्ञानाचे राजकीय निर्णायकतेसह एकत्रीकरण. 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवलेल्या या मोहिमेची रचना जोरदार प्रहार करण्यासाठी करण्यात आली होती परंतु ती युद्धापर्यंत पोहोचली नाही. ऑपरेशनचे उद्दिष्ट स्पष्टपणे साध्य झाले.

ऑपरेशननंतरच्या ब्रीफिंग्ज आणि पुनर्पुरवठा प्रोटोकॉलवरून असे दिसून येते की सशस्त्र दल पुढील आकस्मिक परिस्थितींसाठी अजून तयारी करत आहेत, विशेषतः जर पाकिस्तान समर्थित प्रॉक्सी गटांनी सीमापार कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची ही तयारी आहे.

एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने या बदलाचा सारांश दिला:

“आम्ही आता नियंत्रित वाढीच्या सिद्धांतावर प्रचंड अचूकतेसह काम करत आहोत. संदेश स्पष्ट आहे: भारताची भूमिका बदलली आहे.”

आता पुढे काय

भारत सरकारने सार्वजनिकरित्या ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यापासून परावृत्त केले असले तरी, इस्लामाबाद, बीजिंग आणि वॉशिंग्टनसह सर्वच देशांनी यामागचा धोरणात्मक संदेश शांतपणे स्वीकारलेला आहे.

या ऑपरेशनने केवळ पहलगाम हत्याकांडाला न्याय मिळवून दिला नाही तर संयुक्त सैन्याच्या operations, real-time ISR fusion, and long-range strike coordination across services एक चाचणी केंद्र म्हणून काम केले. ऑपरेशन सिंदूरचे संपूर्ण परिणाम – लष्करी आणि राजनैतिकदृष्ट्या – अजूनही उलगडत आहेत.

परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे: भारताने आपल्या धोरणात्मक संयमाच्या मर्यादा पुन्हा एकदा आखून घेतल्या आहेत.

रवी शंकर / हुमा सिद्दीकी


+ posts
Previous articleArmy to Get 3 New Air Defence Missile Regiments to Bolster Western Front
Next articleलष्कराला 3 नवीन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र रेजिमेंट मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here