व्यापार वृद्धी आणि धोरणात्मक संवाद राखण्यावर पाकिस्तान – चीनची सहमती

0

भारतासोबत झालेल्या प्राणघातक संघर्षानंतर काही दिवसांतच चीनसोबत व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढविण्यास सहमती दर्शवल्याची घोषणा बुधवारी पाकिस्तानने केली. बीजिंगने भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष चर्चेद्वारे सोडवण्याचे आवाहन केले आहे.तीन दशकांमधील सर्वात वाईट अशा चार दिवसांच्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानने 10 मे रोजी संघर्ष विरामावर सहमती दर्शविली.

भारत-पाकिस्तान संघर्ष

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये तणाव वाढला होता. या हल्ल्यात ठार झालेले सर्व पुरुष हिंदू पर्यटकांचा समावेश होता.

भारत या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत असला तरी इस्लामाबादने कोणताही सहभाग नाकारला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी मंगळवारी बीजिंगमध्ये त्यांचे समकक्ष वांग यी यांची भेट घेतली.

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील मतभेद संवादाद्वारे सोडवण्यासाठी,चीन व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदी साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे स्वागत करतो आणि त्यांना पाठिंबा देतो, असे वांग यी यांनी मंगळवारी सांगितले.

चीनने पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, वांग यांनी दार यांना सांगितले की चीन पाकिस्तानच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पाठिंबा देईल.

संवाद राखण्याव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी व्यापार, गुंतवणूक, कृषी, औद्योगिकीकरण आणि इतर क्षेत्रात अधिक सहकार्य करण्यास सहमती दर्शविली, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

स्वतंत्रपणे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दार आणि वांग यांनी बीजिंगमध्ये अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशीही एक बैठक घेतली.

नेत्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा अफगाणिस्तानपर्यंत विस्तार करण्याचा आणि चीनच्या जागतिक पायाभूत सुविधा कार्यक्रम, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हसाठी  (BRI) अधिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

तिन्ही नेत्यांमधील पुढील बैठक काबूलमध्ये होईल, असे मंत्रालयाने सांगितले.

सार्वकालिक मित्र राष्ट्रे

गेल्या काही दशकांपासून, चीन आणि पाकिस्तानने संरक्षण, आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रात मजबूत संबंध निर्माण केले आहेत.

चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि एक प्रमुख गुंतवणूकदार आहे, विशेषतः चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरद्वारे (CPEC) , जो एक प्रमुख बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प आहे.

लष्करीदृष्ट्या, देश अनेक संयुक्त सराव करत आहेत आणि संरक्षण तंत्रज्ञानावर सहकार्य करणे सुरू आहे. राजनैतिकदृष्ट्या, ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर एकमेकांना पाठिंबा देतात

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)


+ posts
Previous articleऑपरेशन सिंदूर दरम्यान LoC वर भारताचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर
Next articleजयशंकर आणि डेन्मार्कच्या पंतप्रधानांची भेट, Anti-Terror भूमिकेचे कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here