पोप लिओ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या पहिल्याच संभाषणात युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केल्याचे व्हॅटिकनने बुधवारी सांगितले.
“पोप यांनी रशियाला शांततेला अनुकूल असा इशारा देण्याचे आवाहन केले, पक्षांमध्ये सकारात्मक संपर्क साधण्यासाठी आणि संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले,” असे व्हॅटिकनने म्हटले आहे.
पहिले अमेरिकन पोप लिओ यांनी बुधवारी दुपारी पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या दूरध्वनीवरील झालेले संभाषण व्हॅटिकनसाठी असामान्य होते कारण व्हॅटिकन कधीही पोप यांच्या फोन कॉलबद्दल कोणतीही विधाने जारी करत नाही.
मदत, मानवतावादी परिस्थितीवर चर्चा
“मानवतावादी परिस्थिती, आवश्यकतेनुसार मदत पुरवण्याची गरज, कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि कार्डिनल (मॅटेओ) झुप्पी यांनी या संदर्भात केलेल्या कामाचे मूल्य याबद्दल यावेळी चर्चा झाली,” असे व्हॅटिकनने पुढे म्हटले. बोलोन्याचे आर्चबिशप झुप्पी हे युक्रेनसाठी व्हॅटिकनचे शांतता दूत म्हणून काम करत आहेत.
क्रेमलिनने सांगितले की, पुतीन यांनी लिओ यांचे – जे चारच आठवड्यांपूर्वी पोप बनले आहेत – आणि संघर्ष मिटवण्याच्या दृष्टीने मदत करण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार मानले. मात्र त्याचवेळी युक्रेनचा युद्ध “वाढवण्याचा” इरादा असल्याचेही स्पष्ट केले.
शांतता चर्चेसाठी व्हॅटिकन योग्य ठिकाण नाही
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की पोप यांनी व्हॅटिकनमध्ये रशिया-युक्रेन यांच्यातील वाटाघाटी आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
मात्र रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इतर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की व्हॅटिकन हे दोन मोठ्या प्रमाणात ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन देशांमधील शांतता चर्चेसाठी योग्य ठिकाण नाही.
युक्रेनला शांततेत रस नाही: पुतीन
पुतीन यांनी युक्रेन संघर्ष वाढवण्यावर भर देत आहे आणि रशियन भूभागावरील नागरी पायाभूत सुविधांच्या ठिकाणी हल्ले करत असल्याचे” म्हटले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले. रशियाने त्या कृत्यांचे “दहशतवादी कृत्य” म्हणून वर्णन केले आहे.
संघर्षाची “मूळ कारणे” सोडवली पाहिजेत, युक्रेनने तटस्थता स्वीकारावी आणि नाटोने पूर्वेकडे करण्यात येणारा विस्तार नाकारावा अशी रशियाची मागणी असल्याचे क्रेमलिनने परत एकदा स्पष्ट केले.
रशियाने नवीन पोप आणि त्यांचे पूर्वसुरी फ्रान्सिस यांच्याशी चांगले संबंध जोपासण्याचा प्रयत्न केला आहे, विशेषतः कुटुंब पुनर्मिलन सारख्या मानवतावादी मुद्द्यांवर.
व्हॅटिकनच्या निवेदनात लिओ यांची निवड झाल्याबद्दल रशियन ऑर्थोडॉक्स पॅट्रिआर्क किरिल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. किरिल यांनी पुतीन यांना दिलेल्या पाठिंब्यावर पोप फ्रान्सिस यांनी टीका केली होती.
व्हॅटिकनने भूमिका वाढवावी : मॉस्कोचे आवाहन
रशियाशी ऐतिहासिक संबंध असलेल्या युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या सदस्यांसाठी युक्रेनमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे आवाहन करण्यासाठी व्हॅटिकन “अधिक सक्रिय भूमिका घेईल” अशी आशा रशियन निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
मॉस्कोबद्दल संशयास्पद सहानुभूतीमुळे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनेक पाद्रींविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली आहे. 2019 मध्ये औपचारिकपणे मान्यता मिळालेले कीव येथे एक वेगळे युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च युद्धादरम्यान युक्रेनमध्ये मोठे झाले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)