माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक वेगळा मुद्दा अलीकडे रशिया आणि युक्रेन, या दोन्ही देशांकडून हाताळला जात आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या युद्धानंतर, अखेर रविवारी रशियन संरक्षण मंत्रालय आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी प्रत्येकी 1,000 कैद्यांची अदलाबदल केली आहे. ही आतापर्यंतची Russia-Ukraine यांच्यातील सर्वात मोठी कैद्यांची देवाणघेवाण ठरली आहे.
ही देवाणघेवाण, शुक्रवारी सुरू झाली आणि तीन दिवस चालली, ज्यात प्रामुख्याने युद्धकैदी होते, तसेच दोन्ही देशातील प्रत्येकी 120 नागरिकांचा समावेश होता. रविवारी दोन्ही बाजूंनी 303 कैद्यांची देवाणघेवाण करण्यात आली.
राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी, याबाबत टेलिग्राम अॅपवर लिहिले की: “आज आमच्या सशस्त्र दलांचे, नॅशनल गार्डचे, सीमा सुरक्षा दलाचे आणि विशेष वाहतूक सेवांचे जवान घरी परतत आहेत.”
ही देवाणघेवाण, म्हणजे 16 मे रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या थेट बैठकीनंतर घेण्यात आलेला एकमेव ठोस शांततापूर्ण निर्णय होता. तथापि, या बैठकीत युद्धविरामावर कोणतीही सहमती झाली नव्हती.
युक्रेन, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी कोणत्याही अटिविना 30 दिवसांच्या युद्धविरामाची मागणी केली आहे, जेणेकरून शांती प्रक्रियेसाठी आधार मिळू शकेल.
युरोपातील द्वितीय महायुद्धानंतरच्या या सर्वात प्राणघातक संघर्षात, दोन्ही बाजूंनी हजारो सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले असावेत, असा अंदाज आहे, जरी कोणतीही बाजू नेमके आकडे प्रसिद्ध करत नाही.
रशियन फौजांनी युक्रेनच्या शहरांना वेढा घालून, बॉम्बहल्ले करत हजारो नागरिकांना मारले आहे.
शुक्रवारी, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, “कैद्यांची देवाणघेवाण पूर्ण झाल्यावर रशिया युक्रेनसमोर दीर्घकालीन शांतीचा मसुदा प्रस्ताव ठेवण्यास तयार आहे.”
तथापि, त्याच वेळी रशियन फौजांनी कीव्हसह अनेक युक्रेनी शहरांवर 367 ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला, आजवरच्या हा युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला ठरला, ज्यात किमान 12 लोक ठार आणि डझनभर लोक जखमी झाले.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 4 तासांत त्यांनी 95 युक्रेनी ड्रोन नष्ट केले किंवा अडवले. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, ट12 युक्रेनी ड्रोन राजधानीकडे येत असताना अडवले गेले.’
भारताच्या संसदीय प्रतिनिधींच्या टीमचे मॉस्कोमधील लँडिंगही ड्रोनच्या धोक्यामुळे उशीरा झाले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या माहितीसह)