तैवानजवळील चीनच्या लष्करी सरावांना पुढील आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता असल्याने, शुक्रवारी राष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी तैवानच्या सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला.
तैवानच्या एका वरिष्ठ सरकारी प्रवक्त्याने गुरुवारी तैपेईमध्ये सांगितले की, मंगळवारी लाई यांनी पदभार स्वीकारल्याच्या एक वर्षाच्या वर्धापनदिनानिमित्त चीन “अडचण निर्माण करण्यासाठी” अधिक लष्करी सराव करेल, ही शक्यता तैवान नाकारू शकत नाही.
लाई यांना चीन “अलिप्ततावादी” म्हणत असल्याने चर्चेसाठी त्यांच्या अनेक ऑफर चीनने धुडकावल्या आहेत. लोकशाही आणि पूर्णपणे स्वतंत्रपणे शासित तैवानवरील चीनच्या सार्वभौमत्वाच्या दाव्यांना लाई यांनी कायमच नाकारले आहे. लाई यांच्या मते फक्त तैवानचे लोकच स्वतःचे भविष्य ठरवू शकतात.
महिन्याच्या अखेरीस पारंपरिक ड्रॅगन बोट महोत्सवापूर्वी लाई यांनी दक्षिणेकडील काओसुंग शहरातील तळांवर लष्करी अभियंते आणि पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर क्रू यांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल आभार मानण्यासाठी भेट दिली.
लष्कराचे अभियंते आणि नौदलाची पाणबुडीविरोधी विमानचालन कमांड हे दोन्ही “देशाच्या सशस्त्र दलांच्या लष्करी सामर्थ्याचे आधारस्तंभ आहेत आणि एकूण राष्ट्रीय संरक्षण धोरणासाठी देखील अपरिहार्य आहेत,” असे त्यांनी काओशुंगच्या झुओयिंग नौदल तळावर दुपारी जेवण घेत असताना झालेल्या चर्चेत हेलिकॉप्टर क्रूला सांगितले.
“तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळेच लष्कराची भरभराट होत आहे आणि देशातील लोक शांतता तसेच आनंदाने जगू शकतात आणि काम करू शकतात,”असे ते म्हणाले. ‘राष्ट्राच्या संरक्षणासाठी एकत्र काम करूया,” असा संदेशही त्यांनी दिला.
चीन किंवा त्याच्या सराव क्षमतेचा थेट उल्लेख न करणाऱ्या लाई यांच्यासोबत संरक्षणमंत्री वेलिंग्टन कू आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस जोसेफ वू हे त्यांचे दोन सर्वात वरिष्ठ संरक्षण अधिकारी होते.
चीनच्या संरक्षण मंत्रालय आणि तैवान व्यवहार कार्यालयाने या आठवड्यात म्हटले आहे की लाई हे “तैवान सामुद्रधुनीतील संकट निर्माण करणारे” असून त्यांनी शत्रुत्व आणि संघर्ष वाढवला, शांतता आणि स्थिरता बिघडवली आहे.
गेल्या महिन्यात, चीनने तैवानभोवती “Strait Thunder-2025A” असा कोड-नेम असलेल्या युद्ध सरावांचे आयोजन केले होते, ज्याच्या शेवटी असणारा “A” असे सूचित करणारा आहे की पुढे आणखी काही होऊ शकते.
चीनने मे 2024 च्या सरावांना “Joint Sword – 2024A” असे नाव दिले होते. हा सराव लाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच आयोजित करण्यात आला होता. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये “Joint Sword – 2024B” चे आयोजन करण्यात आले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)