ट्रम्प 2.0: कमी सोशल मीडिया पोस्टचाही बाजारपेठेवर परिणाम

0
ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प, डेटोना बीच, फ्लोरिडा. 16 फेब्रुवारी 2025. (रॉयटर्स/केव्हिन लामार्क)

अमेरिकेची गुंतवणूकविषयक बँक जे. पी. मॉर्गनने केलेल्या अभ्यासानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा निवडून आल्यापासून त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत बाजारपेठेशी संबंधित कमी सोशल मीडिया पोस्ट पाठवल्या आहेत. 

बँकेच्या विश्लेषकांना असे आढळले की व्यापार शुल्क, परराष्ट्र संबंध आणि अर्थशास्त्र यासारख्या संवेदनशील विषयांवर ट्रम्प यांनी यावेळी प्रकाशित केलेल्या 126 पोस्टपैकी केवळ 10 टक्के पोस्टमुळेही चलन बाजारावर स्पष्ट परिणाम  झाल्याचे बघायला मिळाले.

मात्र, आता या पोस्टची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी त्या मुद्द्यांशी संबंधित 20 हून अधिक पोस्ट पाठवल्या. ही संख्या जानेवारीतील पोस्टच्या सरासरीपेक्षा दुप्पट होती. अर्थात, अजूनही मेक्सिको आणि इतरांबरोबरच्या त्यांच्या 2018-19 या काळातील व्यापाराशी संबंधित त्यांनी केलेल्या 60‌ पोस्ट प्रति आठवड्याच्या उच्चांकापेक्षा ही संख्या खूपच कमी आहे.

सोमवारी प्रकाशित झालेल्या जे. पी. मॉर्गनच्या नोंदीत म्हटले आहे की, “वेगवेगळ्या विषयांपैकी, शुल्कांबाबतच्या पोस्टवर सर्वात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचा कारभार अवलंबून होता,” त्यापैकी जवळजवळ एक तृतीयांश पोस्टमुळे बाजारपेठ बदलत होती.

आतापर्यंतचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीला मेक्सिकोच्या पेसो आणि कॅनडाच्या डॉलरमध्ये अनुक्रमे 2 टक्के आणि 1 टक्क्यांहून अधिक घसरण दिसली. ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के दर लागू करण्यासाठी आपत्कालीन अधिकारांचा वापर केल्याचे पोस्ट केले. मात्र हा निर्णय त्यांनी दोन दिवसांनी पुढे ढकलला.

दरम्यान, चीनवर लक्ष केंद्रित केलेल्या इतरांनी त्यांच्या टोननुसार दोन्ही दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

ट्रम्प यांनी पुन्हा निवडून आल्यानंतर लगेचच फेंटॅनिल पुरवठ्यावर कर लावण्याची धमकी दिल्यानंतर युआनमध्ये घसरण झाली. परंतु जानेवारीच्या मध्यात चलनाने उसळी घेतली. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याशी फोनवरून आपले  “खूप चांगले” संभाषण झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.

जे. पी. मॉर्गनच्या विश्लेषकांनी सांगितले की त्यांच्या मागील चाचणीवरून असे दिसून आले आहे की ट्रम्प यांच्या पोस्टवरून व्यापार क्षेत्राला अद्याप फारसा फायदा झालेला नाही.

जी 10 उच्च बीटा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलर खरेदी करणे किंवा प्रत्येक पोस्टनंतर पाच ते 180 मिनिटांच्या दरम्यान सर्वात थेट परिणाम झालेले वैयक्तिक चलन खरेदी करणे ‘निराशाजनक’ ठरले असते, असे ते म्हणाले, ‘अत्यंत आशावादी’ गृहितकांचा विचार करूनही 4 टक्क्यांपेक्षा जास्त नफा होणार नाही.

ट्रम्प या टप्प्यावर बाजारपेठेत फारशी खळबळ न माजवणारे सोशल मीडिया संदेश पाठवत असताना, त्यांनी पत्रकारांसोबत जवळजवळ दररोज प्रश्नोत्तरांच्या सत्रांबरोबरच ओव्हल ऑफिसमधून थेट संवाद वाढवण्यावर भर दिला आहे.

सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleभारताच्या संभाव्य ‘F-35’ डीलवर, चीन आणि पाकिस्तानचा तीव्र इशारा
Next articleIndia Open To F-35 Offer, But No Formal Proposal Yet: Defence Secretary

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here