इंधन विमाने तैनात करत मध्यपूर्वेत अमेरिकन लष्करी पर्यायांचा विस्तार

0

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना तसेच इराण आणि इस्रायलमधील तणाव उघड संघर्षात रूपांतरित होत असताना अमेरिकन लष्कराने युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई इंधन भरणारी विमाने तैनात केली असल्याची माहिती दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सोमवारी नाव न छापण्याची अटीवर दिली.

अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की अमेरिकन विमानवाहू जहाज निमित्झ मध्यपूर्वेकडे जात आहे. याशिवाय एका अधिकाऱ्याच्या मते ही पूर्वनियोजित तैनाती आहे. निमित्झमध्ये 5 हजार कर्मचारी आणि लढाऊ विमानांसह 60 हून अधिक विमाने सामावू शकतात.

इराण आणि इस्रायल अभूतपूर्व उघड युद्धात परस्परांवर हल्ला करत असताना अमेरिका संभाव्य शाश्वत कामगिरीच्या दृष्टीने आपली हवाई शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत करत असल्याचे या तैनातीवरून दिसून येते.

इस्रायलने शुक्रवारी इराणवर बॉम्बहल्ला करण्यास सुरुवात केली आणि म्हटले की तेहरान अणुबॉम्ब बनवण्याच्या मार्गावर आहे. तेव्हापासून, इराण आणि इस्रायलने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत यात दोन्ही देशांचे नागरिक ठार झाले आहेत, जखमी झाले आहेत आणि व्यापक प्रादेशिक संघर्षाची चिंता निर्माण झाली आहे.

अतिरिक्त संरक्षण क्षमता

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सोमवारी उशिरा एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांनी मध्य पूर्वेत अतिरिक्त संरक्षण क्षमता तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु त्यांनी याची तपशीलवार माहिती दिली नाही.

“अमेरिकेच्या सैन्याचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि या तैनाती या प्रदेशात आमची संरक्षणात्मक भूमिका वाढवण्यासाठी आहेत,” असे हेगसेथ यांनी त्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

एअरनॅव्ह सिस्टीम्स या एका फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटने  असे म्हटले आहे की 31 हून अधिक अमेरिकन एअर फोर्स रिफ्युएलिंग विमाने – प्रामुख्याने KC-135s आणि KC-46s – रविवारी पूर्वेकडे निघाली.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी रिफ्युएलिंग विमानांच्या संख्येवर भाष्य करण्यास नकार दिला.

“दोन डझनहून अधिक अमेरिकन एअर फोर्स टँकरची अचानक पूर्वेकडे तैनात करणे हा नेहमीचा निर्णय नाही. हे धोरणात्मक तयारीचे स्पष्ट संकेत आहे,” असे डायमी सिक्युरिटी इंटेलिजेंसचे एरिक शौटेन म्हणाले.

“इस्रायलला पाठिंबा देण्याबाबत असो, लांब पल्ल्याच्या कारवायांसाठी तयारी असो, रसद महत्त्वाची असो, या हालचालीवरून असे दिसून येते की जर इराणसोबतचा तणाव वाढला तर अमेरिका जलद पुढाकारासाठी स्वतःला तयार करत आहे.”

अमेरिकेची लष्करी विमाने युरोपमध्ये

एअरनॅव्ह सिस्टीमने म्हटले आहे की अमेरिकेची लष्करी विमाने युरोपमध्ये उतरली आहेत, ज्यात जर्मनीतील रामस्टीन हवाई तळ आणि युनायटेड किंग्डम, एस्टोनिया आणि ग्रीसमधील विमानतळांचा समावेश आहे.

आतापर्यंत अमेरिका सावधगिरी बाळगत आहे, इस्रायलकडे येणारी क्षेपणास्त्रे पाडण्यास मदत करत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याच्या अलिकडच्या काळात इस्रायली योजनेसाठी ट्रम्प यांनी नकाराधिकाराचा वापर केला असल्याचे दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

त्यापैकी एकाने म्हटले आहे की जोपर्यंत अमेरिकन लोकांना लक्ष्य केले जात नाही तोपर्यंत अमेरिका इराणच्या राजकीय नेतृत्वाच्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशा कोणत्याही कृतीला  समर्थन देणार नाही.

ट्रम्प यांनी इस्रायलच्या हल्ल्याचे कौतुक केले आहे आणि तेहरानला अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांना लक्ष्य करणारे हल्ले करून प्रत्युत्तराची व्याप्ती वाढवू नये असा इशारा दिला आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना तिसऱ्या अमेरिकन अधिकाऱ्याने तोफांच्या हालचालींवर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र  या प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी हालचाली बचावात्मक स्वरूपाच्या होत्या यावर भर दिला.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या आणखी एका सूत्राने सांगितले की, अमेरिकेने या प्रदेशातील इतर देशांना सांगितले आहे की आपण बचावात्मक तयारी करत असून जर इराणने अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर हल्ला केला तर ते अधिक आक्रमक कारवाईकडे वळतील.

अमेरिकेचे मध्य पूर्वेत आधीच मोठे सैन्य तैनात आहे, या प्रदेशात जवळजवळ 40 हजार सैनिक आहेत. याशिवाय हवाई संरक्षण प्रणाली, लढाऊ विमाने आणि युद्धनौका यांचा समावेश आहे जी क्षेपणास्त्रे पाडण्यास मदत करू शकतात.

गेल्या महिन्यात, पेंटागॉनने इंडो-पॅसिफिकमधील एका तळावर बी-2 बॉम्बर्सच्या जागी दुसऱ्या प्रकारचे बॉम्बर्स तैनात केले, जे मध्य पूर्वेत ऑपरेशनसाठी एक आदर्श स्थान मानले जाते. बी-52 बॉम्बर्स मोठे बंकर फोडण्यासाठी आवश्यक युद्धसामग्री वाहून नेऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते इराणच्या आण्विक सुविधांवर त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleIsrael Eyes Strike on Iran’s Fordow Nuclear Facility Amid Covert U.S. Support
Next articleIndia and China Take Centre Stage at Paris Air Show Amid Rising Global Tensions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here