चीन, हाँगकाँगहून येणाऱ्या पार्सलवर अमेरिकेच्या टपाल सेवेची बंदी

0
चीन
18 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसच्या (USPS) संकलन पेटीचे चित्र आहे. (रॉयटर्स/बेनोइट टेसियर/फाईल फोटो)

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारातील त्रुटी बंद केल्यानंतर चीन आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या inbound parcelsवर तात्पुरती बंदी घालण्याची घोषणा युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसने (USPS) केली. याआधी टेमू आणि शीनसारख्या किरकोळ विक्रेत्यांना शुल्क न भरता कमी किमतीची पॅकेजेस अमेरिकेत पाठवण्याची परवानगी मिळाली होती.

अतिरिक्त 10 टक्के शुल्क

ट्रम्प प्रशासनाकडून मंगळवारपासून लागू झालेल्या चिनी वस्तूंवर अतिरिक्त 10 टक्के शुल्क लादण्यात आले असून आयातदार तसेच अमेरिकेच्या खरेदीदारांना 800 अमेरिकन डॉलर्सपेक्षा कमी किंमतीच्या पॅकेजेससाठी शुल्क भरणे टाळता येईल यासाठी सोईस्कर अशा ‘डी मिनिमिस’ची त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली.

USPSने सांगितले की या बदलामुळे चीन आणि हाँगकाँगमधून येणारी पत्रे आणि ‘flats’ च्या प्रवाहावर परिणाम होणार नाही. चीन आणि इतर देशांकडून डी मिनिमिस शिपमेंट बंद करण्याच्या ट्रम्पच्या बदलाशी याचा संबंध आहे की नाही यावर मात्र त्यांनी त्वरित भाष्य केले नाही.

टेमू आणि शीन यांची प्रगती

फास्ट-फॅशन किरकोळ विक्रेता शीन आणि ऑनलाइन डॉलर-स्टोअर टेमू, जे खेळण्यांपासून स्मार्टफोनपर्यंतची सगळी उत्पादने विकतात, त्यांची अमेरिकेत वेगाने मागणी वाढली आहे, यांचे श्रेय अंशतः ‘डी मिनिमिस’ ला जाते.

चीनवरील अमेरिकी काँग्रेस समितीने जून 2023 च्या अहवालात म्हटले आहे की, डी मिनिमिस तरतुदीअंतर्गत दररोज अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या सर्व पॅकेजेसमधील 30 टक्क्यांहून अधिक वाटा या दोन कंपन्यांचा असण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, डी मिनिमिस अंतर्गत पाठवलेल्या पॅकेजेसपैकी जवळजवळ अर्धी पॅकेजेस चीनमधून येतात. शीन आणि टेमू यांनी यावर प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

मॉर्निंगस्टारचे वरिष्ठ समभाग विश्लेषक चेल्सी टॅम म्हणाले, “आमच्या मते, USPS ला पॅकेजेस पुन्हा अमेरिकेमध्ये पाठवायला परवानगी देण्यापूर्वी नवीन करांची अंमलबजावणी कशी करावी हे ठरवण्यासाठी थोडा वेळ लागेल.”  “त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे आव्हान आहे कारण 2024 मध्ये दररोज 40 लाख डी मिनिमिस पॅकेजेस होते आणि सर्व पॅकेजेस तपासणे कठीण आहे-त्यामुळे त्यासाठी वेळ लागेल.”

निर्बंधांमुळे खर्च वाढला

डी मिनिमिसवरील निर्बंधांमुळे  शीन आणि टेमूसारख्या कंपन्यांनी विकलेली उत्पादने अधिक महाग होतील, मात्र मालवाहतुकीच्या प्रमाणावर नाटकीयरित्या परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

फ्रेट प्लॅटफॉर्म झेनेटामधील मुख्य हवाई मालवाहतूक अधिकारी नियाल व्हॅन डी वू म्हणाले, “गेल्या वर्षी चीनमधील ई-कॉमर्सचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहे, त्यामुळे ग्राहकांच्या मागणीच्या त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि केवळ डी मिनिमिस पुरेसे आहे याची मला खात्री नाही.”

परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना

चिनी ई-कॉमर्स दिग्गज पीडीडी होल्डिंग्जची उपकंपनी टेमू तसेच यावर्षी लंडनमध्ये सूचीबद्ध होण्याची योजना असलेल्या आणि सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेल्या शीन या दोघांनीही चीन व्यतिरिक्त इतर देशांकडून अधिक उत्पादने मिळवणे, अमेरिकेत मालासाठी गोदामे उघडणे आणि अधिक अमेरिकन विक्रेते आणणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत.

मात्र त्यांची बहुतांश उत्पादने अजूनही चीनमध्ये तयार केली जातात. अमेरिकेत धोकादायक कृत्रिम ओपिओइड फेंटॅनिलचा प्रवाह रोखण्याच्या दृष्टीने बीजिंग पुरेसे काम करत नसल्याचा वारंवार इशारा दिल्यानंतर ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here