झेन टेक्नॉलॉजीजद्वारे खास नौदल प्रशिक्षणासाठी, FAC AI सिम्युलेटरची निर्मिती

0

हैदराबादस्थित झेन टेक्नॉलॉजीज, या संरक्षण प्रशिक्षण आणि ड्रोनविरोधी उपाययोजनांमधील अग्रगण्य कंपनीने, स्वदेशी फास्ट अटॅक क्राफ्ट (FAC) सिम्युलेटर लाँच केला आहे. या सिम्युलेटरचा वापर नौदल ऑपरेटर आणि युद्ध कर्मचाऱ्यांना जहाज चालवणे, दिशादर्शन करणे आणि आधुनिक सागरी युद्धात प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. कंपनीची उपकंपनी अप्लाइड रिसर्च इंटरनॅशनल (ARI) सिम्युलेशन द्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

हा सिम्युलेटर उच्च दर्जाचे वातावरण प्रदान करतो, जे वास्तविक सागरी परिस्थितीची प्रतिकृती तयार करते. यात 360° व्हिज्युअलायझेशन, सिक्स-डिग्री मोशन प्लॅटफॉर्म आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड लक्ष्यीकरण प्रणालींचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना जहाज चालवणे, युद्धाच्या युक्त्या आणि रिमोट शस्त्रे वापरण्याचा सराव सुरक्षित व पुनरावृत्ती करता येणाऱ्या वातावरणात करता येतो.

यामधील प्रगत वैशिष्ट्यांमध्ये: AI-सक्षम प्रशिक्षक स्टेशन, जे प्रशिक्षणार्थींच्या क्षमतेनुसार प्रशिक्षणात बदल करते आणि कामगिरीचे विश्लेषण करते त्याचा समावेश आहे. याशिवाय, हॅप्टिक फीडबॅकसह रिअलिस्टिक प्रपल्शन आणि स्टिअरिंग कंट्रोल्सचा समावेश आहे. तसेच मध्यम श्रेणीच्या मशीन गन आणि रिमोट वेपन स्टेशनचे अनुकरण यामध्ये करण्यात आले आहे, ज्यात रीकॉइल इफेक्ट्सचा समावेश आहे. जवळच्या-क्वार्टर संरक्षणापासून ते असमतोल धोक्यांचा सामना करण्यापर्यंत विविध प्रशिक्षण मॉड्यूल यात उपलब्ध आहेत.

या सिम्युलेटरच्या लाँचिंग प्रसंगी भारतशक्तीशी बोलताना, झेन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक अतलुरी यांनी, भारताच्या सागरी सुरक्षा आव्हानांवर प्रकाश टाकला. ज्यामध्ये, 7,500 किलोमीटरची किनारपट्टी आणि विस्तृत विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) समाविष्ट आहे. “असमतोल धोक्यांचा सामना करण्याची, व्यापार मार्गांना सुरक्षित करण्याची आणि नौदल सज्जता मजबूत करण्याची वाढती गरज लक्षात घेता, FAC सिम्युलेटरसारख्या प्रगत प्रशिक्षण प्रणाली कार्यान्वित करणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

कंपनीने सांगितले की, ‘ही प्रणाली उच्च-तणावाच्या सागरी परिस्थितीत युद्ध सज्जता, योग्य रणनीती ठरवणे आणि सांघिक समन्वय वाढवेल, त्याचबरोबर प्रत्यक्ष प्रशिक्षणाशी संबंधित खर्च आणि धोके कमी करेल. या नवीन सिम्युलेटरद्वारे, झेन टेक्नॉलॉजीज नौदल प्रशिक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमता वाढवण्याचा आणि संरक्षण तंत्रज्ञानामध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहे.’

मार्चमध्ये, झेन टेक्नॉलॉजीजला संरक्षण मंत्रालयाकडून 152 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर कंपनीच्या इंटिग्रेटेड एअर डिफेन्स कॉम्बॅट सिम्युलेटर (IADCS) च्या पुरवठ्यासाठी आहे, जो L70 गनसाठी तयार करण्यात आला आहे आणि भारतीय लष्करासाठी केंद्रित आहे. हा सिम्युलेटर ऑपरेटरची सज्जता वाढवतो आणि युनिट स्तरावर समन्वय सुधारतो. यात वास्तविक जीवनातील परिस्थितींचं अत्यंत वास्तवदर्शी आभासी अनुकरण केलेले असते. त्यामुळे खर्चिक आणि अवघड थेट प्रशिक्षणाच्या गरजा कमी होतात. हा एक स्केलेबल, जुळवून घेण्यास सुलभ, आणि दीर्घकालीन ऑपरेशनल तसेच आर्थिक फायदा करणारा उपाय आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Is In Desperate Need of Nuclear Attack Submarines (SSN)
Next articleकाउंटर-ड्रोन रणनीती तातडीने सुधारण्यावर, भारतीय लष्करी नेत्यांचा भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here