तटरक्षक दलाच्या अजित आणि अपराजित गस्ती नौकांचे जलावतरण

0
भारतीय तटरक्षक दलाने (ICG) शुक्रवारी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL)  येथे ICGS अजित आणि ICGS अपराजित या दोन प्रगत वेगवान गस्ती नौकांचे (FPV) जलावतरण केले आणि भारताच्या सागरी सुरक्षेला बळकटी देण्यात एक महत्वाचा टप्पा गाठला.

 

भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधल्या जात असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आठ FPV  मालिकेतील हे सातवे आणि आठवे जहाज असून, देशाच्या किनारपट्टीवरील देखरेख आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

GSL ने पूर्णपणे डिझाइन केलेली आणि बांधलेली FPV भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे वाढते सामर्थ्य प्रतिबिंबित करतात. 52 मीटर लांबीची आणि 320  टन वजन वाहून नेणारी  ही जहाजे कंट्रोलेबल पिच प्रोपेलर्सने (CPP)  सुसज्ज आहेत, तसेच भारतातील या श्रेणीतील ही पहिलीच जहाजे असून, उत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी आणि प्रोपल्शन कार्यक्षमता देतात.

या गस्ती नौका मत्स्यव्यवसाय संरक्षण, किनारी गस्त, तस्करी विरोधी, चाचेगिरी विरोधी आणि विशेषतः भारताचे बेट प्रदेश आणि विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) शोध आणि बचाव मोहिमा, यासारख्या बहु-कार्यात्मक भूमिका बजावण्यासाठी सक्षम आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या मते, हा प्रकल्प रोजगार निर्मिती, एमएसएमई सहभाग आणि स्वदेशी औद्योगिक वाढीमध्ये देशांतर्गत जहाजबांधणीचे योगदान अधोरेखित करतो, ज्यामुळे सागरी क्षेत्रातील आत्मनिर्भरते प्रति भारताची वचनबद्धता बळकट होते.

अजित आणि अपराजित या दोन FPV च्या समावेशामुळे भारतीय तटरक्षक दलाने आधुनिक, अति-वेगवान प्लॅटफॉर्मच्या ताफ्याचा विस्तार सुरू ठेवला आहे, त्यामुळे भारताच्या विशाल सागरी  किनारपट्टीवर वर्धित परिचालन सज्जता आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित झाली आहे. या जलावतरणामुळे देशासाठी पुढील पिढीची स्वदेशी संरक्षण जहाजे तयार करण्यात GSLचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleराजनाथ सिंह यांची थार शक्ती सरावाला उपस्थिती
Next articleUN@80: दहशतवादाला आळा घालण्यासाठी सुधारणांची गरज- भारत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here