आणखी एक दिवस, आणखी एक आपत्कालीन लँडिंग. गुरुवारी, भारतीय हवाई दलाचे (IAF) AH-64E अपाचे हे हल्ला करणारे हेलिकॉप्टर पठाणकोटजवळील हेलेड गावाजवळील शेतात उतरवण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी आणि काही महिन्यांतील अशाप्रकारची चौथी घटना आहे. त्यामुळे एकेकाळी “उडते रणगाडे” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढाऊ हेलिकॉप्टरच्या विश्वासार्हतेबद्दल अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित होतात.
सर्वाधिक त्रासदायक म्हणजे, 2020 च्या करारानुसार ऑर्डर केलेल्या सहा अपाचे हेलिकॉप्टरच्या वितरणाची भारतीय सैन्य प्रदीर्घ काळापासून वाट बघत असतानाच, ही नवीन दुर्घटना घडली आहे, पहिली युनिट्स 2024 च्या मध्यापर्यंत पोहोचतील असे आश्वासन असूनही, एकही हेलिकॉप्टर अद्याप सुपूर्द करण्यात आलेले नाही.
या पॅटर्नकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. भारताचे अपाचे सुरक्षित आहेत का? भारताला निर्यात केली जाणारी हेलिकॉप्टर अमेरिकन लष्कर मात्र का निवृत्त करत आहे?
भारताने खरेदी केली, अमेरिकेने नाकारले: अपाचेची कोंडी
एकेकाळी असमान संघर्षांमध्ये अमेरिकेच्या हवाई दलाचा मुकुट रत्न असलेल्या अपाचेचा तारा मंदावताना दिसत आहे. 2023 मध्ये, अमेरिकन सैन्याने त्यांचे AH-64D मॉडेल्स निवृत्त करण्यास सुरुवात केली आणि AH-64E प्रकारांच्या भविष्यावरही शंका निर्माण केली.
अमेरिकन सैन्यातील ऑपरेशन्सचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल जोसेफ रायन यांच्या मते :
“AH-64D मध्ये युद्ध जिंकण्याची क्षमता नाही… आणि AH-64E देखील त्याच्या सामरिक शेल्फ लाइफच्या समाप्तीच्या जवळ आहे.”
दरम्यान, भारत त्याच हेलिकॉप्टरचा समावेश करत आहे – एक समस्याप्रधान गतिमानता जी वाढत्या एकतर्फी संरक्षण संबंधांवर प्रकाश टाकते. अमेरिका नेक्स जनरेशन MV-75 च्या (पूर्वी FLRAA) विकासाला गती देत असताना, अपाचेची उपयुक्तता टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहे. त्याबाबत लिहिले गेले आहे: अपाचेचे सर्वोत्तम दिवस आता मागे पडले आहेत.
भारतीय सेवेतील अपाचेचे खराब रेकॉर्ड
त्याच्यात अत्याधुनिक सेन्सर सूट आणि फायर पॉवर असूनही, भारतीय सेवेत अपाचेचे रेकॉर्ड खराब आहे. 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांवर नजर टाकली तर –
- एका अपाचेला लडाखमध्ये सावधगिरीने लँडिंग करावे, त्यावेळी त्याचे बऱ्यापैकी नुकसान झाले.
- अंतर्गत वीज समस्यांमुळे आणखी एक अपाचे जामनगरजवळ ग्राउंड करण्यात आले.
- तिसरे सहारनपूरजवळ जबरदस्तीने उतरवण्यासाठी भाग पाडले गेले.
- आणि आता, पठाणकोटची घटना – 14 दिवसांपेक्षाही कमी कालावधीत दुसरे आपत्कालीन लँडिंग.
संरक्षण सूत्रांनी इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये बिघाड, वीजच्या कमी जास्त प्रभावामुळे कॉकपिटमध्ये झालेला धूर आणि उंचावर हेलिकॉप्टर स्थिर करण्यातील अडचणी यासारख्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला आहे – ज्या प्रत्यक्ष लढाईत हानीकारक ठरू शकतात.
वाळवंटी प्रदेशासाठी अपाचे, पर्वतीय प्रदेशासाठी एलसीएच : एक रणनीतिक विभागणी?
भारताने असा दावा केला आहे की अपाचे हेलिकॉप्टर वाळवंटातील युद्धासाठी, विशेषतः पाश्चात्य देशांच्या शस्त्रविरोधी भूमिकांसाठी सर्वात योग्य आहेत. मात्र, लडाख आणि ईशान्येकडील पर्वतीय प्रदेशांमध्ये त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचे शांतपणे पुनर्मूल्यांकन झाले आहे.
याउलट, उच्च-उंचीवरील युद्धासाठी तयार केलेले भारताचे स्वदेशी विकसित हलके लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच) ‘प्रचंड’ने अपेक्षांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. एचएएलने डिझाइन केलेले, एलसीएच हिमालयीन परिस्थितीत – जिथे अपाचेला स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो तिथे – अधिक विश्वासार्ह आणि बहुमुखी प्लॅटफॉर्म म्हणून एलसीएच बाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
हेलिकॉप्टरशिवाय स्क्वॉड्रन
मार्च 2024 मध्ये भारतीय सैन्याने जोधपूरजवळील नागतलाव येथे औपचारिकपणे पहिले अपाचे स्क्वॉड्रन उभारले. तळावर पायाभूत सुविधा, कर्मचारी आणि प्रशिक्षण सुविधा सर्व काही व्यवस्थित आहेत कमतरता आहे ती फक्त हेलिकॉप्टरची
पुन्हा एकदा, “पुरवठा साखळीतील व्यत्यय” असे कारण यासाठी देण्यात आले आहे. हेच कारण LCA Mk1A साठी GE-404 इंजिन वितरण करण्यात होणाऱ्या विलंबासाठी दिलेल्या त्याच स्पष्टीकरणाचे प्रतिबिंब आहे. परंतु सबबी कमी होत चालल्या आहेत. निश्चित वितरण वेळेच्या अभावी लष्कराचे अपाचे स्क्वॉड्रन कागदी क्षमतेपेक्षा थोडे अधिक राहिले आहे.
धोरणात्मक देखरेख की शस्त्रास्त्रांवर आधारित अवलंबित्व?
भारताच्या धोरणात्मक समुदायात वाढत्या गटात कठीण प्रश्न विचारले जात आहेत. अमेरिका स्वतःसाठी आणि त्याच्या नाटो सहयोगींसाठी MV-75 आणि F-35 सारख्या पुढील पिढीच्या प्रणाली राखून ठेवून जुने प्लॅटफॉर्म (जुनी साधनसामुग्री) भारताच्या गळी उतरवत आहे का?
अपाचे आणि चिनूक या दोन्ही विमानांच्या परिचालन आणि वितरणासंदर्भात चिंता असल्याने, अमेरिकी सैन्यासह “interoperability” चा आधार पोकळ वाटू लागतो. आणखी 156 एलसीएच युनिट्स खरेदी करण्याचा भारताचा अलीकडील निर्णय-जो आत्मनिर्भर भारताच्या प्रयत्नांचा एक भाग आहे-हा उच्च-जोखीम असलेल्या परदेशी ओईएमपासून विश्वासार्ह स्वदेशी पर्यायांकडे संभाव्य बदलाचे संकेत देतो.
हुमा सिद्दीकी