भारत फोर्ज लिमिटेड (Bharat Forge Ltd.) आणि फ्रान्समधील टर्गिस गेयार्ड (Turgis Gaillard) कंपनीने, भारतीय सशस्त्र दलांना AAROK UAV प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. AAROK हे MALE (Medium Altitude Long Endurance) वर्गातील एक मानवरहित UAV (Unmanned Aerial Vehicle) आहे, जे कमीत कमी खर्चात सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळवून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
खूप उंचीवर आणि दीर्घकाळ उडू शकणारे हे UAV, लांब पल्ल्याच्या निगराणी मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर्स आणि रडार प्रणालीमुळे, ते शत्रूपासून दूर राहूनही त्यांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करू शकते.
AAROK आपली इलेक्ट्रो-ऑप्ट्रॉनिक्स प्रणाली वापरून, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवते आणि ती माहिती थेट त्याच्या कमांड आणि कंट्रोल सिस्टीमला पाठवते, जेणेकरून कमांडर आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अपडेटेड रणनैतिक परिस्थितीची माहिती मिळत राहते. ही प्रणाली दिवसा आणि रात्री, सलग 24 तासांहून अधिक काळ हवेत कार्यरत राहू शकते.
यामध्ये 1.5 टनांहून अधिक वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असून, ती सुरक्षित अंतरावरून डागण्याची सुविधा आहे. त्यामुळे AAROK शत्रूच्या संरक्षण व्यवस्थेमागे घुसून हल्ला करू शकते, त्यांच्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या संरक्षण प्रणाली (SAMs) निष्प्रभ करू शकते, त्यामुळे बहु-आयामी लष्करी कारवाईत (multi-domain operations) हे UAV निर्णायक भूमिका बजावतो.
AAROK च्या माध्यमातून टर्गिस गेयार्ड आणि भारत फोर्ज – भारतीय सैन्याला एक प्रगत, मजबूत आणि अत्याधुनिक MALE UAV देत आहेत, जे नेटवर्क असलेल्या युद्धभूमीत “फोर्स मल्टिप्लायर” म्हणून काम करेल.
भारत फोर्ज, भारतात AAROK चे उत्पादन सुरू करणार आहे. या उत्पादन यंत्रणेच्या स्थापनेमुळे भारतीय लष्कराच्या गरजा वेळेत पूर्ण करता येतील आणि AAROK ची देखभाल आणि दुरुस्ती पूर्णपणे स्थानिक पातळीवर आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे होऊ शकेल.
आज मानवरहित हवाई यंत्रणा (UAVs) आधुनिक युद्धपद्धतीत मोठे बदल घडवत आहेत. पूर्व युरोप, पश्चिम आशिया आणि इतर भागांतील सध्याच्या संघर्षांमधून हे बदल अधिकाधिक स्पष्ट होत आहेत. भारतानेही यावरून धडे घेतले असून, ऑपरेशन सिंदूरच्या किनेटिक टप्प्यात हे बदल प्रभावीपणे दाखवून दिले आहेत.
भारत या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे आणि या प्रकारच्या UAV प्रणालींचा समावेश भारतीय लष्कराच्या क्षमतेला निश्चितीच बळकटी देणारा ठरणार आहे.
by- Dhruv Yadav