पुढील वर्षी ब्रिटन पुन्हा झळकणार बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर

0

ब्रिटन आणि भारत त्यांची सांस्कृतिक आणि सर्जनशील भागीदारी मजबूत करण्यासाठी सज्ज आहेत. त्या दृष्टीने 2026 पासून संपूर्ण ब्रिटनमध्ये तीन प्रमुख बॉलीवूड चित्रपट चित्रित केले जाणार आहेत.

 

ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी काल मुंबईतील यशराज स्टुडिओला भेट देताना ही घोषणा केली, यामुळे दोन्ही देशांच्या दीर्घकालीन चित्रपट आणि सांस्कृतिक सहकार्यात एक नवीन टप्पा सुरू होणार आहे.

भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी स्टुडिओंपैकी एक असलेल्या यशराज फिल्म्सद्वारे (YRF)  या चित्रपटांची निर्मिती केली जाईल. यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली जाणार असून 3 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. ही भागीदारी चित्रपट, संगीत, साहित्य, नाट्य आणि इतर सर्जनशील उद्योगांमध्ये उभय देशांमधील सहकार्य वाढवण्याच्या वाढत्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करणारी आहे.

आठ वर्षांच्या कालावधीनंतर ब्रिटनला परतण्याचा YRF चा निर्णय ऐतिहासिक संबंध आणि तेथील चित्रीकरणाचे व्यावसायिक फायदे दोन्ही अधोरेखित करणारा आहे. “ब्रिटन हा आमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील एक महत्त्वाचा भाग असून  आम्ही आमचे काही सर्वात लोकप्रिय चित्रपट तिथे चित्रित केले आहेत,”  असे YRF चे सीईओ अक्षय विधानी म्हणाले. “आम्ही ब्रिटनमध्ये परत एकदा शूटींग सुरू करत असताना, दोन्ही देशांच्या सर्जनशील उद्योगांना जवळ आणण्याचा हा एक मार्ग म्हणूनही आम्ही याकडे बघतो. या नव्याने सुरू झालेल्या सहकार्यामुळे दोन्ही बाजूंना काय फायदा होऊ शकतो हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.”

YRF एकाच वेळी ब्रिटनमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचे इंग्रजी भाषेतील संगीत रूपांतर ‘कम फॉल इन लव्ह’ विकसित करत आहे. या रंगमंचावरील निर्मितीचा उद्देश व्यापकपणे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना भारतीय कथाकथनाची ओळख करून देणे आणि या सादरीकरणाद्वारे सांस्कृतिक परंपरांना जोडणे हा आहे.

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट (BFI), ब्रिटिश फिल्म कमिशन, पाइनवुड स्टुडिओ, एल्स्ट्री स्टुडिओ आणि सिविक स्टुडिओच्या प्रतिनिधींसह यश राज स्टुडिओला भेट देणारे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी हे पाऊल ब्रिटनच्या सर्जनशील महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असल्याचे वर्णन केले. “बॉलिवूड ब्रिटनमध्ये परतले आहे आणि त्यासोबत नोकऱ्या, संधी आणि सांस्कृतिक सहकार्यही येते,” असे ते म्हणाले. “भारतासोबतचे आमचे सर्जनशील संबंध आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कसे वास्तविक परिणाम निर्माण करत आहेत याचे हे स्पष्ट उदाहरण आहे.”

ही घोषणा म्हणजे सांस्कृतिक सहकार्य कार्यक्रम 2025 चा एक भाग आहे. याद्वारे संग्रहालये, वारसा, प्रकाशन आणि सादरीकरण कला यासारख्या क्षेत्रात ब्रिटन आणि भारतीय संस्थांमधील भागीदारी वाढवण्यासाठी डिझाइन केलेले सरकार-ते-सरकार फ्रेमवर्क आहे. हे फ्रेमवर्क टूरिंग प्रदर्शने, कलाकारांचे तिथे राहणे आणि प्रशिक्षण देवाणघेवाणीला समर्थन देते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तरुण व्यावसायिकांमध्ये सहकार्य आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होतात.

भविष्यात चित्रपट सह-निर्मितीचे फ्रेमवर्क भारत आणि ब्रिटनमधील निर्मात्यांना उभय देशांतील उत्पादन प्रोत्साहने आणि आर्थिक लाभ मिळविण्याची परवानगी देते जे उपक्रमाला  पूरक ठरणारे आहे. ही यंत्रणा पोस्ट-प्रॉडक्शन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिझाइनमधील तज्ज्ञांच्या सामायिकरणाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे कथानक बाजारपेठ आणि विविध प्लॅटफॉर्मवर अधिक प्रवाहीपणे जाण्यास मदत करते. सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी आणि सांस्कृतिक निर्यातीद्वारे सर्जनशील अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी दोन्ही सरकारांच्या प्रयत्नांशी देखील सुसंगत आहे.

ब्रिटन सरकारच्या मते, असे सर्जनशील उद्योग दरवर्षी ब्रिटिश अर्थव्यवस्थेत £12 अब्ज पेक्षा जास्त योगदान देतात आणि सुमारे 90 हजार नोकऱ्यांचा आधार बनतात. बॉलीवूड चित्रपट निर्मितीच्या नवीन लाटेमुळे या क्षेत्रात, विशेषतः चित्रीकरणाची ठिकाणे असलेल्या प्रादेशिक अर्थव्यवस्थांमधील गती आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.

उद्योजकांनी या नूतनीकरण झालेल्या भागीदारीचे स्वागत केले आहे. “भारत आणि ब्रिटनमध्ये चित्रपटाद्वारे सखोल संबंध निर्माण झाले आहेत आणि हे सहकार्य दोन्ही देशांना सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अनेक संधी निर्माण करते. ही निर्मिती नवीन प्रेक्षकांना एकत्र आणण्यास आणि दोन्ही बाजूंच्या उद्योग वाढीस पाठिंबा देण्यास मदत करू शकते,” असे ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचे सीईओ बेन रॉबर्ट्स म्हणाले.

“यशराज फिल्म्स सारख्या स्टुडिओसोबत काम केल्याने सामायिक अनुभवावर आधारित सर्जनशील भागीदारी निर्माण होण्यास मदत होते. यामुळे पोस्ट-प्रॉडक्शन, व्हीएफएक्स आणि तांत्रिक प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात सहकार्याचे दरवाजे उघडतात,” असे ब्रिटिश फिल्म कमिशनचे सीईओ एड्रियन वूटन म्हणाले.

स्टारमर यांचा भारत दौरा – पदभार स्वीकारल्यानंतरचा जो त्यांचा पहिलाच दौरा आहे – संस्कृती आणि चित्रपटाव्यतिरिक्त व्यवसाय, शिक्षण आणि तंत्रज्ञानात संबंध वाढवण्याच्या उद्देशाने एका व्यापक व्यापार मोहिमेचा भाग आहे. दोन्ही सरकारांसाठी, सर्जनशील क्षेत्राला मुत्सद्देगिरी, आर्थिक वाढ आणि लोक-ते-लोक सहभागाचे साधन म्हणून वाढत्या प्रमाणात पाहिले जात आहे.

भारत आणि ब्रिटनमधील सांस्कृतिक संबंध चित्रपटाच्या पलीकडेही विस्तारलेले आहेत. ब्रिटन लोकसंख्येच्या सुमारे 2.6 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतीय डायस्पोराने देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात दीर्घकाळ योगदान दिले आहे. ब्रिटन आधारित 65 हजारांहून अधिक कंपन्या भारतीय डायस्पोरा सदस्यांच्या मालकीच्या आहेत, जे रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या समुदायाने दोन्ही देशांच्या सर्जनशील उद्योगांमधील पूल म्हणूनही काम केले आहे, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामायिक नरेटिव्हजना समर्थन दिले आहे.

ब्रिटनच्या सांस्कृतिक राज्य सचिव लिसा नंदी यांनी बॉलीवूड भागीदारीचे वर्णन करताना दोन्ही देशांच्या सर्जनशील संरेखनात एक नैसर्गिक सातत्य असल्याचे सांगितले. “दोन्ही देशांमध्ये अनेक मजबूत सर्जनशील क्षेत्रे आहेत. शिवाय जनता आणि सामायिक नरेटिव्हजद्वारे मजबूत संबंध आहेत,” असे त्या म्हणाल्या. “ब्रिटनमध्ये बॉलीवूड चित्रपटांची निर्मिती करणे हे एक नैसर्गिकपणे उचलले गेलेले पुढचे पाऊल आहे. ते नोकऱ्यांना समर्थन देणारे, प्रेक्षकांना अधिक आनंद देण्यासाठी आणि आम्ही विकसित करत असलेल्या सर्जनशील भागीदारीवर आधारित आहे.”

दोन्ही देशांमध्ये कार्यरत असलेली निर्मिती कंपनी – सिव्हिक स्टुडिओच्या सीईओ अनुष्का शाह यांनी सीमा ओलांडून सामायिक जागतिक समस्यांना हाताळणाऱ्या कथांना असणाऱ्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकला. “दोन्ही देशांमध्ये मुळे असलेली कंपनी म्हणून, आम्हाला सीमा ओलांडून समुदायांना जोडणाऱ्या कथांमध्ये खूप अधिक मूल्य दिसते,” असे त्या म्हणाल्या. “जागतिक स्तरावर महत्त्वाच्या विषयांना संबोधित करणाऱ्या चित्रपटांवर काम करण्यास आम्ही विशेषत्वाने उत्सुक आहोत.”

ब्रिटन आणि भारतीय चित्रपट क्षेत्रांमधील वाढती भागीदारी आंतरराष्ट्रीय सहभागासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून सांस्कृतिक उद्योगांची व्यापक ओळख दर्शवते. गेल्या काही दशकांपासून, बॉलीवूडने ब्रिटनच्या लँडस्केप आणि आर्किटेक्चरचा वापर सिनेमाच्या पार्श्वभूमीवर केला आहे, तर ब्रिटिश सिनेमा आणि थिएटरला भारतात वाढता प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. हे सहकार्य आता एका संरचित भागीदारीत विकसित झाले आहे ज्यामध्ये कथा सांगणे, वाणिज्य आणि धोरण यांचा समावेश आहे.

नवनिर्मिती सुलभ करून, सर्जनशील चौकटींचा विस्तार करून आणि कलात्मक देवाणघेवाणीला चालना देऊन, दोन्ही देश सांस्कृतिक सहकार्य वाढीसाठी शाश्वत चालक बनतील असे उद्दिष्ट बाळगून आहेत.

स्टारमर यांच्या घोषणेवरून दिसून आले की, हे केवळ बॉलिवूडचे ब्रिटनमध्ये पुनरागमन करण्याबद्दल नाही तर जागतिक स्तरावर कथा सांगण्यासाठी, भविष्यात समान इतिहास आणि दृष्टिकोन असलेल्या दोन्ही देशांमधील सर्जनशील आणि आर्थिक बंध मजबूत करण्याबद्दल आहे.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleअरबी समुद्रात भारत-ब्रिटनमधील ऐतिहासिक नौदल सराव: कोकण 2025
Next articleयुक्रेनियन सैन्याने डोनेट्स्कमध्ये रशियन सैन्यावर निशाणा साधला: झेलेन्स्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here