अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ, चिनाब पुलासाठी CRPF चे संरक्षण

0

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्रशासित जम्मू आणि काश्मीरमध्ये धार्मिक यात्रेकरू आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असलेल्या चिनाब पुलाचा समावेश, आता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) संरक्षणाखाली करण्यात आला आहे. ही हालचाल, 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, तयार करण्यात आलेल्या एकात्मिक सुरक्षा योजनेचा भाग आहे.

शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, चिनाब ब्रिजचे औपचारिक उद्घाटन झाले. रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवरून 359 मीटर उंच असलेला हा पूल अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. या पुलासाठी 28,000 टनांहून अधिक स्टील वापरण्यात आले आहे. तो भूकंप, स्फोट आणि ताशी २६६ किमी वेगाच्या वाऱ्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. त्यामुळे तो केवळ वाहतूकच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचा आहे.

याविषयी बोलताना CRPF चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “चिनाब पुलासोबतच जवळील अंजी खाड पुलाची सुरक्षा जबाबदारीही आता CRPF कडे सोपवण्यात आली आहे. अंजी खाड पूल हा भारतातील पहिला केबल-स्टे रेल्वे पूल असून 96 स्टील केबल्सच्या आधारावर नदीपासून ३३१ मीटर उंचीवर लटकवण्यात आला आहे.”

दरम्यान, रेल्वे मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे रेल्वे सुरक्षा दलच (RPF) पाहील.

रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा

उधमपूर-सोनमर्ग-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पांतर्गत, हे महाकाय प्रकल्प पूर्ण होणे काश्मीरच्या संपर्क साखळीमध्ये ऐतिहासिक पाऊल ठरले आहे. दशकानंतर रेल्वेने काश्मीरला जोडण्यात आले असून, याआधी रस्त्यावर अवलंबून असलेला भाग हा कायम भूस्खलन, हिमवृष्टी आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे धोक्यात असे.

ही नवीन रेल्वे लाईन LoC जवळ असल्याने, सैन्याची हालचाल, आपत्कालीन प्रतिसाद आणि गुप्तता मोहिमांमसाठीही उपयुक्त ठरणार आहे. बोगद्यांमुळे उपग्रह व रडार यांच्यापासून लपवलेली हालचाल शक्य होते.

अमरनाथ यात्रेसाठी व्यापक सुरक्षा यंत्रणा सक्रिय

अमरनाथ यात्रा 2024 साठी, सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, बहु-एजन्सी सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. CRPF, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्य एकत्रितपणे पहलगाम व बालटाल या दोन प्रमुख मार्गांची सुरक्षा करत आहेत.

CRPF ने संपूर्ण यात्रामार्गाची सुरक्षा तपासणी आणि डिजिटल मॅपिंग पूर्ण केली आहे. CRPF चे महासंचालक यांनी स्वतः पहलगाममध्ये तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.

नवीन नियमांनुसार, प्रत्येक यात्रेचा ताफा जॅमरच्या सहवासात असेल, जेणेकरून IED किंवा रिमोट-नियंत्रित स्फोट टाळता येतील.

यंदा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी, 580 हून अधिक निमलष्करी दलांच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
यात CRPF प्रमुख असून BSF, SSB आणि ITBP च्या तुकड्यांचा समावेश आहे. स्थानिक J&K पोलीसही लॉजिस्टिक व स्थलिक पातळीवर पाठिंबा देणार आहेत.

तंत्रज्ञानाचा सुरक्षेसाठी वापर

यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिक उपाय योजनांचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक यात्रेकरूस डिजिटल ओळखपत्र (ID) दिले जाईल. तसेच, प्रत्येक वाहनाला RFID ट्रॅकिंग प्रणाली जोडण्यात येईल. घोडेवाले व इतर सहाय्यक कर्मचारी यांनाही डिजिटल ID दिले जाईल, जेणेकरून आवश्यकता भासल्यास शोध घेता येईल. दुर्गम भागांत संपर्क अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा जवानांना सॅटेलाईट फोनही दिले जातील.

राष्ट्रभावनेचा दुहेरी अधार

एकीकडे चिनाब पुल राष्ट्रीय अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक आहे, तर दुसरीकडे अमरनाथ यात्रा धार्मिक श्रद्धेचे प्रतिनिधित्व करते. दोन्ही गोष्टी केवळ भौतिक नाहीत, तर प्रतीकात्मकदृष्ट्याही राष्ट्राच्या एकात्मतेसाठी महत्त्वाच्या आहेत.

“आम्ही केवळ पायाभूत सुविधा किंवा लोकांचे संरक्षण करत नाही, तर एकात्मता, प्रवेशयोग्यता आणि राष्ट्रीय एकतेचा विचारही सुरक्षित करत आहोत,” असे एका वरिष्ठ CRPF अधिकाऱ्यांनी सांगितले.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleAre Central Asian Nations Looking Beyond Russia For Weapons?
Next articlePakistan Confirms J-35 Offer from China, Seals $2B Fighter Jet Export to Azerbaijan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here