ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सुरक्षा दलांनी केलेला उच्च-अचूक हल्ला हा सामरिक वर्चस्व आणि धोरणात्मक संकेतांसाठी स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरात एक निर्णायक टप्पा ठरला.
या आधी नमूद केल्याप्रमाणे, ऑपरेशनच्या जबरदस्त परिणामकारकतेचे श्रेय प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या, भारतीय-विकसित ड्रोन आणि मार्गदर्शित शस्त्रास्त्रांच्या तैनातीला दिले गेले-जे परदेशी तंत्रज्ञानाखाली तयार झालेल्या मूळ प्लॅटफॉर्मपेक्षा काही निर्णायक बदल अधोरेखित करणारे होते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान अनेक स्ट्राइक पॅकेजेस स्वदेशी नेव्हिगेशन आणि लक्ष्यीकरण प्रणालींनी सुसज्ज असलेल्या देशांतर्गत ड्रोन प्लॅटफॉर्मचा वापर करून अंमलात आणल्या गेल्या या गोष्टीला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी ब्रीफिंगमध्ये दुजोरा दिला. या क्षमतांमुळे प्रत्यक्ष युद्धभूमीशी जुळवून घेणे आणि अत्यंत अचूक हल्ले करणे शक्य झाले, ज्यामुळे अनुषंगिक नुकसान कमी झाले.
“ऑपरेशन सिंदूरचे यश केवळ लष्करी नव्हते-ते तांत्रिक होते”, असे संरक्षण आस्थापनेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही मिळवलेल्या अचूकतेची पातळी गेल्या दोन वर्षांत वेगाने विकसित झालेल्या भारतीय ड्रोन स्टार्टअप्सची परिपक्वता प्रतिबिंबित करते,” असेही ते म्हणाले.
या स्टार्टअप्सपैकी एक उल्लेखनीय म्हणजे झुप्पा जिओ नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीज, ही चेन्नई येथील कंपनी आहे. त्याची सूक्ष्म-सशस्त्र/कामिकाझे ड्रोनची ‘अजीत’ मिनी मालिका-जी अलीकडेच भारतीय सैन्याने उच्च-उंचीच्या परिस्थितीत प्रमाणित केली आहे-भारताच्या आत्मनिर्भर भारत (स्वावलंबी भारत) संरक्षण उपक्रमाचे पोस्टर चाइल्ड बनली आहे.
चिनी डीजेआय मालिकेसारख्या परदेशी ड्रोनसाठी एक सुरक्षित, स्वदेशी पर्याय म्हणून तयार केलेले, ‘अजीत’ ड्रोन नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक स्वातंत्र्य या दोन्हींचे उदाहरण देतात. झुप्पाचे संस्थापक आणि तांत्रिक संचालक व्यंकटेश साई यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने मार्च 2025 मध्ये लष्कराच्या तुकड्यांना ड्रोनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आणि सध्या 50 अतिरिक्त तुकड्यांच्या वितरणासाठी वाटाघाटी सुरू आहेत.
“हे ड्रोन केवळ पूर्णपणे स्वदेशीच नव्हे तर cyber-resilient देखील आहेत,” असे साई यांनी भारतशक्तीला सांगितले. “ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या त्यांच्या परिणामकारकतेमुळे सशस्त्र दलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे,” असेही ते म्हणाले.
भारताच्या ड्रोन विकासाच्या प्रयत्नांनी सीमेवरील सततच्या धोक्यांना, विशेषतः पश्चिम आघाडीवर, जोरदार प्रतिसाद दिला आहे. “10 मे रोजी पाकिस्तानशी संघर्ष विराम झाल्याची घोषणा होऊनही, ड्रोनच्या मदतीने घुसखोरी सुरूच आहे”, असे साई यांनी नमूद केले. पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत शस्त्रे आणि अंमली पदार्थ टाकण्यासाठी नियमितपणे चिनी मूळचे डीजेआय ड्रोन तैनात करतात. BSF आणि पंजाब पोलीस नियमितपणे त्यांना अडवत असतात, मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते वाढत्या चिंतेचा विषय आहेत.”
अलीकडेच संगम टॉक्सचे संस्थापक राहुल देवन यांच्या 5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे झुप्पाच्या वाढत्या गतीला चालना मिळाली, जे भारताच्या तंत्रज्ञान उद्योजक समुदायाच्या दृढ विश्वासदर्शक मताचे संकेत आहे.
देवन म्हणाले, “भारताने आपली संरक्षण परिसंस्था भविष्यासाठी सक्षम बनवली पाहिजे.” झुप्पाचे अजित ड्रोन हे अशा भविष्याचे एक ब्लूप्रिंट आहेत जे सुरक्षित, स्केलेबल आणि भारतात तयार केलेले आहेत.
भारताच्या संरक्षण-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झुप्पाला एक अद्वितीय स्थान आहेः त्याची मालकीची ऑटोपायलट प्रणाली त्याच्या पेटंट असलेल्या Disseminated Parallel Control Computing (DPCC) संरचनेवर बांधली गेली आहे. ही एकमेव भारतीय कंपनी आहे-आणि जागतिक स्तरावर फक्त सातपैकी एक-ही प्रगत क्षमता असलेली.
झुप्पासारख्या व्यासपीठांमध्ये भारतीय लष्कराची वाढती गुंतवणूक हा व्यापक आधुनिकीकरण मोहिमेचा एक भाग आहे. गेल्या वर्षभरात, केवळ नियंत्रण रेषेवरच (LoC) नव्हे तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) मोहिमांसाठी स्वदेशी ड्रोनची खरेदी वाढली आहे. चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान पाळत ठेवणे आणि जलद हल्ल्याच्या गरजा वाढल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूर आता पुरते स्थगित झाले आहे, परंतु त्यातून मिळणारा संदेश कायम आहेः भारताची संरक्षण क्षमता आता आयात केलेल्या साधनसामुग्रीवर आधारलेली नाही. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञान युगात येत असताना, एक नवीन अध्याय समोर येत आहे-जिथे लढाया केवळ जमिनीवरील बूटांद्वारेच नव्हे तर भारतीय सर्किट बोर्डांमध्ये अंतर्भूत असलेल्या बुद्धिमत्तेने जिंकल्या आहेत.
हुमा सिद्दिकी