डोमिनिकन रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी, लोकप्रिय सेंटो डोमिंगो नाईटक्लबमध्ये छत कोसळल्यानंतर, आज तीन दिवसांनी बेपत्ता लोकांचे शोध आणि बचाव कार्य थांबवले आहे. या दुर्घटनेत किमान 184 लोकांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे गुरुवारी रिपोर्ट्समधून समोर आले.
ही घटना डोमिनिकन रिपब्लिकमधील गेल्या दहा वर्षांतील सर्वात भीषण आपत्तींपैकी एक ठरली आहे.
रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी पहाटे किमान 300 लोक डोमिनिकन रिपब्लिकच्या, आयकॉनिक जेट सेट नाईटक्लबमध्ये उपस्थित होते, तेव्हा ही दुर्घटना घडली.
मेरेन्ग्यू कलाकार रुब्बी पेरेझ, आपल्या ऑर्केस्ट्रासोबत त्या ठिकाणी परफॉर्म करत होते, त्यावेळी छत कोसळल्याची घटना घडली.
पेरेझ यांचा मृतदेह बुधवार सकाळी घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आला, असे आपत्कालीन सेवांनी CNN ला सांगितले.
मृतांमध्ये दोन माजी मेजर लीग बेसबॉल खेळाडूंचाही समावेश होता.
दुर्घटनेतील जखमींच्या नेमक्या संख्येची अधिकाऱ्यांनी अद्याप घोषणा केलेली नाही, परंतु आपत्कालीन कार्यवाही केंद्राचे संचालक जुआन मॅन्युएल मेंडेझ यांनी CNN ला सांगितले की, मंगळवारी 145 लोक जखमी होऊनही “जिवंत” होते.
300 हून अधिक बचाव कार्यकर्त्यांनी, स्निफर कुत्र्यांच्या मदतीने, मलब्यातून बचावलेल्या लोकांना शोधून काढले.
बेपत्ता लोकांचे कुटुंबीय आपले आप्तस्वकीय बचावतील या आशेने घटनास्थळी उभे होते.
“गेले दोन दिवस खूप कठीण गेले आहेत, कारण जेव्हा आपले लोक अशाप्रकारे अडकलेले असतात, तेव्हा मानसिकदृष्ट्या आपले चित्त स्थिर नसते,” असे एका प्रतिसादकर्त्याने CNNला सांगितले.
घटनेच्या ठिकाणाचे अनेक व्हिडीओ सध्या ऑनलाइन फिरत आहेत, ज्यात छत कोसळण्याच्या क्षणीचे दृश्य दिसत आहेत.
अध्यक्ष लुईस अबिनेडर यांनी, या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि X वर लिहिले की: “जेट सेट नाईटक्लबमध्ये झालेल्या या शोकांतक दुर्घटनेबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत. या घटनेपासून आम्ही प्रत्येक मिनिटाला त्याचे अनुसरण करत आहोत. सर्व आपत्कालीन सेवा संस्थांनी आवश्यक मदत दिली आहे आणि ते अथकपणे बचाव कार्य करत आहेत. पीडितांच्या कुटुंबांसोबत आमची प्रार्थना आहे.”
अमेरिकेच्या नागरिकाचा मृत्यू
US राज्य सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की, या दुर्घटनेत एक अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
त्यांनी X वर पोस्ट केले: “Jeanette आणि मी एकत्र प्रार्थनेत आहोत, कारण डोमिनिकन रिपब्लिकमधील लोक सेंटो डोमिंगोतील जेट सेट नाइटक्लबमध्ये झालेल्या ताज्या शोकांतक घटनेवर शोक व्यक्त करत आहेत, ज्यात किमान एक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन लीगल परमानंट रेजिडंटस देखील मरण पावले आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे.”
दुर्घटनेतील जीवित हानीच्या शोक व्यक्त करत त्यांनी पुढे लिहिले: “आमचे हृदय प्रभावित कुटुंबांसोबत आहे. या कठीण काळात यूएस आपल्या डोमिनिकन मित्रांला समर्थन देण्यासाठी तयार आहे.”
दुर्घटनेत मरण पावलेले दोन माजी बेसबॉल खेळाडू ओक्टाव्हियो डोटेल आणि टोनी ब्लांको यांची ओळख पटली आहे.
MLB कमिशनर रॉब मॅनफ्रेड यांनी एक विधान जारी केले, ज्यात ते म्हणाले: “मेजर लीग बेसबॉल ओक्टाव्हियो डोटेल, टोनी ब्लांको, नेल्सी क्रूझ आणि सेंटो डोमिंगोतील काल रात्रीच्या दुर्घटनेत सर्व मृतांचा हृदयापासून शोक व्यक्त करते. आम्ही सर्व पीडितांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना आणि आमच्या सहकाऱ्यांना, नेल्सन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला, आमच्या संवेदना पाठवितो. बेसबॉल आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील संबंध खूप गहरे आहेत आणि आम्ही आज सर्व डोमिनिकन खेळाडूंना आणि फॅन्सना विचारात घेत आहोत.”
जीवित राहिलेल्या व्यक्तीचा अनुभव
व्हेनेझुएलाच्या जेनिरे मेना या आणखी एका बचावलेल्या महिलेने CNN ला सांगितले की, ती तिच्या दोन मैत्रिणींसह तिचा 40 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी क्लबमध्ये आली होती.
मीना म्हणाल्या की, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरी मैत्रिण ढिगाऱ्याखाली अडकली.
“मी जिवंत राहिल्याबद्दल कृतज्ञ आहे, खूप वेदना होत आहेत, परंतु मी वाचले याकरता मी कृतज्ञ आहे,” असे त्या म्हणाल्या.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)