अब्जाधीश एलन मस्क यांनी सोमवारी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या कर-कपात आणि खर्च विधेयकावर आगपाखड केली. याशिवाय सरकारी खर्चाला आळा घालण्याच्या पूर्वीच्या आश्वासनांना न जुमानता त्याचे समर्थन करणाऱ्या खासदारांना पदावरून हटवण्याचे आश्वासन दिले.
याच कायद्यावरून ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर काही आठवडे शांत राहिल्यावर, शनिवारी सिनेटने हे पॅकेज हाती घेतल्यावर मस्क पुन्हा एकदा या चर्चेत सहभागी झाले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये ते “पूर्णपणे वेडे आणि विध्वंसक” असल्याचे विधान मस्क यांनी केले.
पोर्की पिग पार्टी
सोमवारी, मस्क यांनी आपली टीका आणखी तीव्र करत म्हटले की, ज्या खासदारांनी खर्चात कपात करण्यासाठी मोहीम राबवली होती, परंतु विधेयकाचे समर्थन केले होते, त्यांनी “लाजेने माना खाली घातल्या पाहिजे!”
“आणि जर मी या पृथ्वीवर शेवटचे काम केले तर ते पुढील वर्षी त्यांचे प्राथमिक निकाल गमावतील”, असेही मस्क म्हणाले.
टेस्ला आणि स्पेसएक्सच्या सीईओने नवीन राजकीय पक्षासाठी पुन्हा आवाहन केले, ते म्हणाले की विधेयकाच्या प्रचंड खर्चाने सूचित केले आहे की “आपण एक-पक्षीय देशात राहतो-पोर्की पिग पार्टी!!”
“लोकांची खरोखर काळजी घेणाऱ्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची वेळ आली आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुन्हा पुन्हा, सतत होणारे वाद
मस्क यांनी विधेयकावर केलेल्या टीकेमुळे ट्रम्प यांच्याशी असणाऱ्या संबंधात दुरावा निर्माण झाला आहे. टेक अब्जाधीशांनी ट्रम्प यांच्या पुनर्निवडणुकीच्या मोहिमेवर जवळजवळ 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केला होता. तसेच प्रशासनाच्या वादग्रस्त डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे (DOGE) नेतृत्व केल्यानंतर दोघांच्या नात्यात नाट्यमयरित्या बदल झाला. DOGE हा एक संघीय खर्च कमी करण्याशी निगडीत उपक्रम आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी असा युक्तिवाद केला आहे की या कायद्यामुळे राष्ट्रीय कर्जात मोठी वाढ होईल आणि DOGE द्वारे त्यांनी मिळवलेली बचत नष्ट होईल असा दावाही त्यांनी केला आहे.
मस्क यांचे काँग्रेसवर किती वर्चस्व आहे किंवा विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांच्या मतांचा काय परिणाम होऊ शकतो हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु रिपब्लिकननी चिंता व्यक्त केली आहे की ट्रम्प यांच्याशी त्यांच्या सतत होणाऱ्या वादांमुळे 2026 च्या मध्यावधी काँग्रेस निवडणुकीत बहुमताचे रक्षण करण्याच्या त्यांच्या संधींना धक्का बसू शकतो.
या दुराव्यामुळे टेस्लासाठीही अस्थिरता निर्माण झाली आहे. कंपनी शेअर्सच्या किमतीत प्रचंड चढउतार झाले आहेत ज्यामुळे त्यांच्या बाजार मूल्याच्या सुमारे 150 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा फटका कंपनीला बसला आहे. आता अर्थात शेअर्सच्या किंमतीत सुधारणा झाली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)