US Coast Guard Cutter Stratton वर आयोजित केलेल्या या मोहिमेत चारही देशांतील महिला अधिकाऱ्यांसह तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचे cross-embarkation आहे. जहाज ग्वामच्या दिशेने मार्ग आखत असताना, त्यात केवळ कर्मचारीच नव्हे तर एक सामायिक संदेश आहेः की इंडो-पॅसिफिक जागतिक स्थिरतेच्या केंद्रस्थानी आहे आणि ते मुक्त, खुले आणि आंतरराष्ट्रीय नियमांद्वारे नियंत्रित राहिले पाहिजे.
पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हे अभूतपूर्व पाऊल उचलण्यात आले आहे. व्यावसायिक नौवहन मार्गांवरील हल्ल्यांमुळे सागरी मार्गांच्या सुरक्षेबाबत जागतिक चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत, QUAD चा उपक्रम एकता आणि सज्जतेचा धोरणात्मक संकेत पाठवतो, ज्यामुळे वाढत्या भू-राजकीय अशांततेदरम्यान सागरी निकष कायम ठेवण्याच्या सामायिक संकल्पाला बळकटी मिळते.
सप्टेंबर 2024 च्या QUAD नेत्यांच्या शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या विल्मिंग्टन जाहीरनाम्यात मांडलेले हे क्रॉस-डेक निरीक्षक Mission QUAD च्या अजेंड्यातील व्यावहारिक प्रगती दर्शवते.
हे प्रत्यक्ष-वेळेच्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ प्रदान करते, परस्पर विश्वास वाढवते आणि भारतीय तटरक्षक दल (आयसीजी), जपानी तटरक्षक दल (जेसीजी), अमेरिकन तटरक्षक दल (यूएससीजी) आणि ऑस्ट्रेलियाच्या सीमा दलांमधील (एबीएफ) परिचालन आंतरसंचालनीयता वाढवते.
भारताचा सहभाग SAGAR (Security and Growth for All in the Region) या त्याच्या सागरी सिद्धांताशी जवळून मेळ घालणारा असून Indo-Pacific Oceans Initiative (IPOI) अंतर्गत झालेल्या उपक्रमांना पूरक आहे, जे नियम-आधारित सागरी प्रशासन, प्रादेशिक लवचिकता आणि मानवतावादी समन्वयाप्रती त्याची वचनबद्धता अधोरेखित करते.
1 जुलै रोजी QUAD परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी (QFMM) भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असल्याने या उपक्रमाला धोरणात्मक महत्त्व आहे. या वेळेमुळे या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत होणाऱ्या QUAD नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी राजनैतिक गती वाढण्यास बळकटी मिळते.
त्यांच्या भेटीदरम्यान, सागरी सुरक्षा आणि व्यापक सुरक्षा अनिवार्यता यांच्यातील दुवा सांधणाऱ्या ‘दहशतवादाची मानवी किंमत’ या शीर्षकाखाली आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही जयशंकर यांच्या हस्ते होणे अपेक्षित आहे. QUAD चे परराष्ट्र मंत्री प्रादेशिक गतीशीलतेवर चर्चा करतील, सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचे मूल्यांकन करतील आणि इंडो-पॅसिफिक आराखडा मजबूत करण्यासाठी नवीन प्रस्तावांवर विचार करतील.
QUAD आपल्या धोरणात्मक आणि कार्यान्वित पदचिन्हाचा विस्तार वक्तव्याच्या पलीकडे वास्तविक जगाच्या सहकार्यात करत असताना, ‘At Sea Observer Mission’ भविष्यातील संयुक्त कार्यांच्या दृष्टीने एक आराखडा ठरू शकेल. सागरी मार्गांवर दबाव असल्याने आणि इंडो-पॅसिफिक स्थैर्य अधांतरी असल्याने, हा उपक्रम प्रतीकात्मकतेपेक्षा अधिक आहे-ही सामायिक सुरक्षा आणि सामूहिक सज्जतेसाठी करण्यात आलेली गुंतवणूक आहे.
हुमा सिद्दीकी