डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी टीव्हीवर झालेली डिबेट पाहण्यासाठी कोट्यवधी अमेरिकन लोकांनी टीव्ही संचासमोर ठिय्या दिला होता. पण या दोघांबरोबरच सोशल मीडियाच्या छोट्या पडद्यांवर देखील एक लुटुपुटूची लढाई बघायला मिळाली.
चर्चेला सुरुवात झाल्याक्षणापासून, हॅरिस यांची स्टेजवर चालताना ट्रम्प यांच्यासारखा हात हलवून स्वतःची ओळख करून देण्याचे व्हिडिओ आणि फोटो डेमोक्रॅट्सनी पोस्ट केले.
सोशल मीडिया वापरकर्ता ॲडम जेम्स स्मिथने एक्सवर पोस्ट केले, “कमला म्हणाल्या की तू माझ्याशी हस्तांदोलन करणार आहेस, डॅम इट!” या पोस्टला 68 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले.
उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांच्या चर्चेच्या योजनेचा एक भाग म्हणजे ट्रम्प यांना स्टेजवर अशा गोष्टी सांगण्यास प्रवृत्त करणे, ज्या सोशल मीडिया क्लिपमध्ये व्हायरल होऊ शकतात. या योजनेला अपेक्षित यश मिळाले असे या चर्चेतून सूचित झाले. मात्र, चर्चा संपल्यानंतर ट्रम्प यांच्या मोहीम आणि ऑनलाइन समर्थकांनी लगेचच या चर्चेत विजयी झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष जिंकण्याचा दावा त्यांनी केला.
ट्रम्प यांचे खोटे दावे
ट्रम्प आपल्या भाषणात खोट्या गोष्टींबाबत दावे करत असताना हॅरिस यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांचे त्वरित मिम्समध्ये रूपांतर झाले. ओहायोमधील हैतीयन स्थलांतरित पाळीव कुत्रे आणि मांजरी खात होते या खोट्या दाव्याची ट्रम्प यांनी पुनरावृत्ती केल्याने कदाचित सर्वात जास्त प्रतिक्रिया यावर निर्माण यायला सुरूवात झाली.
“ते कुत्रे खात आहेत,” सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पटकन ट्रेंड झाले. त्यानंतर यावरच हजारो पोस्ट्स यायला सुरूवात झाली. मात्र यामुळे अध्यक्षीय चर्चेत या वाक्याची नेमकी प्रासंगिकता काय याबद्दल अनेकांचा गोंधळ उडाला.
चर्चा संपताच हॅरिस अंतिम ऑनलाइन विजेत्या झाल्याचे बघायला मिळाले. “तुमच्यासारख्या अनेकांप्रमाणेच मी पण आज रात्री ही चर्चा पाहिली,” असे टेलर स्विफ्टने मंगळवारी तिच्या 280 दशलक्षाहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्सना सांगितले. “मी @kamalaharris साठी मतदान करत आहे कारण ती हक्कांसाठी लढते आणि मला वाटते की त्यांना जिंकण्यासाठी एका योद्ध्याची गरज आहे”.
ही पोस्ट केल्यानंतर पुढच्या दोन तासांत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत इन्स्टाग्रामवर या पोस्टला 43 लाखांहून अधिक “लाईक्स” मिळाले.
सोशल मीडियावरील मोहिमा
राजकीय रणनीतीकारांच्या म्हणण्यानुसार, या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहेत. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी, आपापल्या पक्षाची धोरणे आणि त्यांच्या उमेदवारांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आशय निर्माते (कन्टेन्ट क्रिएटर) किंवा प्रभावकांसाठी (इन्फ्लुएन्झर्स) आशय तयार केला आहे.
लोक काय विचार करतात आणि लोकांनी काय विचार करायला हवा या दोन्ही गोष्टीं सोशल मीडिया ठरवतात,” असे नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक शॅनन मॅकग्रेगर यांनी सांगितले.
अर्थात सध्या सोशल मीडियावर हॅरिस आणि त्यांच्या प्रचार मोहीम अनुयायांपेक्षा ट्रम्प यांनी बाजी मारल्याचे बघायला मिळत आहे. हॅरिस यांच्या प्रचारमोहिमेसाठी सुरू करण्यात आलेल्या अधिकृत कमला खात्याचे एक्सवर 13 लाख फॉलोअर्स आहेत तर ट्रम्प मोहिमेचे सुमारे 24 लाख अनुयायी आहेत. मात्र हॅरिस यांच्या मोहिमेला टिकटॉकवरील त्याच्या व्हिडिओंवर 10 कोटींहून अधिक “लाईक्स” मिळाले आहेत, तर ट्रम्प यांना 4 कोटी 40 लाख.
ट्रम्प यांचा विजय झाल्याचे घोषित
हॅरिस यांच्या आर्थिक योजनेवर चर्चा करताना ट्रम्प यांच्या प्रचारमोहीम सहकारी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्यांनी ही योजना अत्यंत साधी आणि हॅरिस यांचे बॉस राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याच अजेंड्याची कॉपी असल्याचे म्हटले.
मुलांना वाचायला शिकवणाऱ्या लोकप्रिय पुस्तकांच्या मालिकेचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले, “धावा, जागा, धावा”. हे शब्द एक्सवर वेगाने ट्रेंड झाले.
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, हॅरिस यांनी मंगळवारी गर्भपात मर्यादा, राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांची शारीरिक क्षमता आणि त्यांच्या असंख्य कायदेशीर कारवायांबाबत हल्ले करत ट्रम्प यांना बचावात्मक धोरण स्वीकारायला भाग पाडले. मात्र ट्रम्प यांचे प्रचारमोहीम सहकारी आणि स्वतः ट्रम्प यांनी चर्चा संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या विजयाची घोषणा केली.
“लोकांच्या दृष्टीने आज रात्री मोठा विजय मिळाला आहे,” असे ट्रम्प यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर जाहीर केले. त्या पोस्टला सुमारे 30 हजार लाईक्स मिळाले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला आणि मॉडरेटर आपल्यावर अन्याय करत असल्याची त्यांनी तक्रार केली.
हॅरिस यांच्या प्रचारमोहिम सहकाऱ्यांनीही मंगळवारी रात्री एका निवेदनाद्वारे आजच्या डिबेटमध्ये हॅरिस विजयी झाल्याचे घोषित केले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)