इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा युद्धविराम कराराच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी तीन इस्रायली ओलिस आणि 90 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका झाली.
युद्धविराम करारामुळे गाझा पट्टी उद्ध्वस्त झालेल्या आणि मध्यपूर्वेत भडका उडवणाऱ्या 15 महिन्यांच्या युद्धाला स्थगिती मिळाली.
या युद्धविरामामुळे बॉम्बस्फोट झालेल्या परिसरात परतण्याची पॅलेस्टिनींना मुभा मिळाली असून त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. तर दुसरीकडे मदत पोहोचवणाऱ्या ट्रक्सनी अत्यंत आवश्यक ती मदत गरजवंतांपर्यंत पोहोचवली आहे.
तर दुसरीकडे गाझामध्ये इतके दिवस लपून आता बाहेर आलेल्या हमासच्या सैनिकांचा जमावाने जयजयकार केला.
पॅलेस्टिनी कैद्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सवी वातावरण
पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस वेस्ट बँकमधील रामल्ला येथे पोहोचल्या तेव्हा मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी वाट पाहत तिथे उभे होते.
हमासच्या म्हणण्यानुसार, इस्रायली तुरुंगातून सुटका झालेल्यांमध्ये वेस्ट बँक आणि जेरुसलेममधील 69 महिला आणि 21 किशोरवयीन मुलांचा समावेश आहे.
ओलिसांचे कुटुंबियांशी भावनिक पुनर्मिलन
गाझामधून थेट प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात तीन महिला ओलिस हमासच्या लढाऊ सैनिकांनी वेढलेल्या रेड क्रॉसच्या वाहनात चढताना दिसल्यावर तेल अवीवमध्ये, शेकडो इस्रायली लोकांनी संरक्षण मुख्यालयाबाहेरील चौकात जल्लोष केला आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.
इस्रायली सैन्याने सांगितले की रोमी गोनेन, डोरॉन स्टीनब्रेचर आणि एमिली दामरी यांना त्यांच्या जन्मदात्रींकडे पुन्हा सुपूर्द करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
गोळी झाडत अपहरण करण्यात आले त्यावेळी दामरीने दोन बोटे कायमची गमावली. मात्र तिने स्मितहास्य करत बॅंडेज केलेला हात दुसऱ्या हाताने धरत आईला मिठी मारली.
पंतप्रधान नेतान्याहू यांचा संदेश
“मला त्यांना सांगायची इच्छा आहेः रोमी, डोरॉन आणि एमिली-संपूर्ण देश तुम्हाला आलिंगन देत आहे. आपल्या घरी तुमचे स्वागत आहे,” असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका कमांडरला दूरध्वनीवरून सांगितले.
शेबा वैद्यकीय केंद्रात, महिलांना त्यांच्या कुटुंबियांना परत एकदा भेटता आले तिथे आनंदाश्रूंपासून मनमुराद हास्यापर्यंतचे वातावरण बघायला मिळाले. हसणाऱ्या दामरीभोवती इस्रायली झेंडा गुंडाळण्यात आला होता.
इस्रायलने म्हटले आहे की, 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात अपहरण झालेल्या 250हून अधिक लोकांमध्ये या तिघींचा समावेश होता. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले होते.
मृत्यू आणि विध्वंस
गाझामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये 47 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
गाझाची जवळजवळ संपूर्ण म्हणजे 23 लाख नागरिक बेघर झाले आहे.
सुमारे 400 इस्रायली सैनिकही मारले गेले आहेत.
गाझा युद्धविराम करारात लढाई थांबवण्याची, गाझाला मदत पाठवण्याची आणि इस्रायली तुरुंगात असलेल्या सुमारे 2 हजार पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात सहा आठवड्यांच्या पहिल्या टप्प्यात उर्वरित 100 पैकी 33 इस्रायली आणि परदेशी ओलिसांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ओलिसांपैकी अनेकांचा मृत झाला असावा असे मानले जात आहे.
गाझा पट्टीच्या उत्तरेला, पॅलेस्टिनींनी भग्नावशेष आणि वळलेल्या धातूच्या उद्ध्वस्त झालेल्या भूप्रदेशातून मार्ग काढला, ज्यावर युद्धातील सर्वात तीव्र लढाईत बॉम्बफेक करून विस्मरणात टाकले गेले होते.
“15 महिने वाळवंटात हरवल्यानंतर शेवटी मला प्यायला थोडे पाणी मिळाले असे मला वाटते,” अशी प्रतिक्रिया आयाने व्यक्त केली.
आया म्हणाली की ती एका वर्षाहून अधिक काळापासून तिच्या गाझा शहरातील घरातून विस्थापित झाली होती.
तीन तासांच्या विलंबानंतर युद्धविरामाचा पहिला टप्पा लागू झाला, या दरम्यान इस्रायली लढाऊ विमाने आणि तोफखान्याने गाझा पट्टीवर परत एकदा हल्ला केला.
पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणी झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला.
इस्रायलने हमासकडून ओलिसंची नावे देण्यास उशीर झाल्याचा आरोप केला आणि आपण दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे सांगितले. हमासने म्हटले आहे की यादी उशीरा प्रदान करण्यामागे तांत्रिक अडथळा होता.
अध्यक्ष बायडेन यांचे विधान
“आज गाझामधील बंदुका शांत झाल्या आहेत,” असे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या कार्यालयातील शेवटच्या दिवशी सांगितले. एका वर्षाहून अधिक काळ अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीला दूर ठेवलेल्या युद्धविरामाचे स्वागत केले.
ते म्हणाले, “आम्ही आज या टप्प्यावर पोहोचलो आहोत याचे कारण आहे इस्रायलने हमासवर अमेरिकेच्या पाठिंब्याने तयार केलेल्या दबावामुळे.”
या युद्धविरामाने 15 महिने लपून राहिल्यानंतर सावलीतून बाहेर पडण्याची संधी हमासच्या सैनिकांना दिली.पोलिसांच्या गणवेशात घातलेले हमासचे पोलिस काही भागात वेगाने तैनात केले गेले आणि सशस्त्र सैनिकांनी दक्षिणेकडील खान युनिस शहरातून रस्ता काढला. या ठिकाणी जमावाने “अल-कसाम ब्रिगेड्सला सलाम,” अशा शब्दांमध्ये या गटाच्या सशस्त्र शाखेचा जयजयकार केला.
“सर्व प्रतिकार गट नेतान्याहू असूनही जिवंत राहिले आहेत,” एका सैनिकाने रॉयटर्सला सांगितले.
गाझावर शासन कोण करणार?
युद्धानंतर गाझावर कोण शासन करणार यावर अजूनही कोणतीही तपशीलवार योजना तयार झालेली नाही. याबाबत पुनर्बांधणी करणे फारच कमी आहे.
हमासचे जर कोणत्याही प्रकारे पुनरागमन झाले तर इस्रायलच्या संयमाची परीक्षा होईल, कारण जोपर्यंत अतिरेकी गट पूर्णपणे संपुष्टात येत नाही तोपर्यंत आपण पुन्हा लढाई सुरू करू असे इस्रायलने म्हटले आहे.
कट्टर राष्ट्रीय सुरक्षामंत्री इटामार बेन-गवीर यांनी युद्धविरामावरील चर्चेदरम्यान मंत्रिमंडळ बैठक सोडली. मात्र त्यांच्या पक्षाने नेतन्याहू यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केलेला नाही असे सांगितले.
इतर सर्वात प्रमुख कट्टरपंथी, अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच हे सध्या तरी सरकारमध्ये राहिले आहेत. मात्र हमासचा पूर्णपणे नाश न करता युद्ध संपले तर ते सरकारमधून बाहेर पडतील असे त्यांनी सांगितले आहे.
युद्धविरामाची वेळ
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला हा युद्धविराम लागू झाला.
ट्रम्प यांचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज म्हणाले की जर हमासने करार रद्द केला तर अमेरिका इस्रायलला “त्याला जे करायचे आहे ते करण्यास मदत करेल.”
“हमास गाझावर कधीही राज्य करणार नाही. ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे,” असे ते म्हणाले.
गाझा शहरातील दृश्य
उद्ध्वस्त गाझा शहरातील रस्त्यांवर पॅलेस्टिनी ध्वज फडकावत आणि मोबाइल फोनवर या सगळ्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यात अनेक नागरिक व्यस्त होते.
घरातील सामानाने भरलेल्या अनेक गाड्या भंगार आणि ढिगाऱ्याने विखुरलेल्या रस्त्यांवरून पुढे चालल्या होत्या.
गाझा शहरातील 40 वर्षीय अहमद अबू अयहम म्हणाले की, “युद्धविरामामुळे जीव वाचला असला तरी नुकसान आणि विनाशामुळे उत्सव साजरा करण्याची वेळ अजून आलेली नाही.”
ते म्हणाले, “आम्ही दुःखात आहोत, खूप वेदना होत आहोत आणि एकमेकांना मिठी मारून रडण्याची ही वेळ आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)