चीन आणि भारतातील वाढत्या अक्षय उर्जा क्षमतेमुळे, नव्या विक्रमाची नोंद

0
अक्षय ऊर्जा

थिंक टँक एंबर (Ember) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चीन आणि भारतातील जलद वाढणाऱ्या अक्षय ऊर्जा क्षमतेमुळे, 2025 च्या जानेवारी ते जून या कालावधीत- जागतिक स्तरावारही अक्षय्य ऊर्जा स्रोतांनी कोळशापेक्षा जास्त वीजनिर्मीती केली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

अहवालानुसार, वारा आणि सौरऊर्जेसारख्या स्रोतांद्वारे एकूण 5,072 टेरावॅट-तास (TWh) वीज निर्माण झाली आहे, तर कोळशापासून 4,896 TWh वीज तयार झाली आहे.

अक्षय (नूतनीकरणीय) ऊर्जा निर्मितीची वाढ

जागतिक हवामान उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, बहुतेक शास्त्रज्ञांनी कोळशाच्या वीज निर्मितीवर अंकुश लावणे महत्त्वाचे मानले आहे, कारण या प्रक्रियेत वायू उर्जा निर्मितीच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडचे दुप्पट उत्सर्जन होते. एम्बर येथील वरिष्ठ वीज विश्लेषक माल्गोरझाटा वियाट्रोस-मोटिका म्हणाल्या की, “अक्षय उर्जा निर्मितीच्या माध्यमातून, आम्हाला एका महत्त्वपूर्ण बदलाची पहिली चिन्हे दिसत आहेत.”

जगातिक पातळीवर विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी, सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती वेगाने वाढत आहेत. 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत, जागतिक स्तरावरील विजेची मागणी 2024 च्या याच कालावधीच्या तुलनेत 2.6%, म्हणजेच 369 TWh ने वाढली. सौर ऊर्जेच्या उत्पादनातील 306 TWh ची वाढ आणि पवन ऊर्जेच्या उत्पादनातील 97 TWh ची वाढ, यामुळे ही मागणी पूर्ण करणे शक्य झाले.

अक्षय ऊर्जांकडे वळण्यामागे चीन आणि भारत हे मुख्य कारण असल्याचे, एम्बरच्या अहवलात म्हटले आहे. अहवालानुसार, जगातील सर्वात मोठा वीज ग्राहक असलेल्या चीनने जीवाश्म-इंधन निर्मिती 2% ने कमी केली तर त्यांची सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती अनुक्रमे 43% आणि 16% नी वाढली.

भारतात, पवन आणि सौरऊर्जेच्या निर्मितीत अनुक्रमे 29% आणि31% वाढ झाली, ज्यामुळे देशाला कोळसा आणि वायूचा वापर 3.1% ने कमी करण्यास मदत झाली, असे अहवालात दिसून आले आहे.

कोळसा आणि गॅसची मागणी

अहवालानुसार, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये 2025 च्या पहिल्या सहामाहीत, जीवाश्म इंधनांद्वारे वीजनिर्मिती वाढली आहे, कारण वीज मागणीत वाढ झाल्यामुळे वारा आणि जलविद्युत उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, कोळसा आणि गॅससारख्या पारंपरिक इंधनांवर अधिक अवलंबून राहावे लागले.

अमेरिकेत, कोळशाच्या निर्मितीत 17% वाढ झाली, कारण गॅस निर्मितीत 3.9% घट झाली, तर युरोपमध्ये गॅस-आधारित वीज निर्मिती 14% आणि कोळशाच्या निर्मितीत 1.1% वाढ झाली, असे अहवालात म्हटले आहे. हवामान बदलाबद्दल संशयवादी असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कोळशाच्या उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आणि गेल्या महिन्यात कोळशाच्या वीज प्रकल्पांना पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleस्टारमर यांच्या भारत भेटीमुळे, जेट इंजिन कराराला मिळू शकते चालना
Next articleभारताशी फक्त व्यापार करार, व्हिसा कराराचा आत्ता विचार नाही: स्टारमर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here