ड्रोन क्षमता वाढीसाठी, IG Drones आणि VoxelSensors ची भागीदारी

0

ड्रोन नवकल्पनेतील भारताचे वाढते नेतृत्व अधोरेखित करत, भारतस्थित IG Drones ने बेल्जियमच्या VoxelSensors या प्रगत सेन्सिंग तंत्रज्ञानातील अग्रेसर कंपनीसोबत सामरिक भागीदारीची घोषणा केली आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट पुढील पिढीचे ड्रोन विकसित करणे आहे, जे GPS सिग्नल कमकुवत किंवा उपलब्ध नसलेल्या जटिल वातावरणात कार्य करण्यास सक्षम असतील.

ही भागीदारी, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) समर्थनाखालील जागतिक कार्यक्रमाचा भाग आहे आणि तांत्रिक प्रगतीस चालना देणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करते.

या सहकार्याचे केंद्रस्थान आहे, VoxelSensors चे अत्याधुनिक SPAES (Spatial Awareness Sensing) तंत्रज्ञान, जे रिअल-टाईम 3D सेन्सिंग सिस्टम ड्रोन्सना, त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचे ‘दृश्य’ प्राप्त करून देते, अडथळ्यांचे संकेत देते आणि अधिक जलद व स्वायत्त निर्णय घेण्यास सक्षम करते. IG Drones त्यांच्या ड्रोन ताफ्यात हे SPAES तंत्रज्ञान समाविष्ट करणार आहे, जेणेकरून जंगल, बोगदे, दाट शहरी भाग आणि बांधकामस्थळे यांसारख्या कठीण प्रदेशातही कार्यक्षमता वाढवता येईल.

MeitY चे CEO पनीरसेंल्वम मदनगोपाल यांनी सांगितले की, “ही भागीदारी सुरक्षित आणि बुद्धिमान प्रणाली तयार करण्यासाठी जागतिक सहकार्याची ताकद दर्शवते. हे भारताच्या उत्तरदायित्वपूर्ण नवकल्पनेच्या आणि स्मार्ट डिजिटल पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”

IG Drones चे CTO संबित परिडा यांनी, या भागीदारीचे व्यावहारिक फायदे स्पष्ट करत सांगितले की, “VoxelSensors च्या तंत्रज्ञानामुळे आमचे ड्रोन उच्च धोका आणि GPS नसलेल्या परिस्थितीत कार्य करण्यास अधिक सक्षम होतील. हे आपत्कालीन प्रतिसाद, पायाभूत सुविधा तपासणी आणि स्मार्ट सिटी विकास अशा क्षेत्रांसाठी ‘गेम-चेंजर’ ठरेल.”

ही भागीदारी IG Drones साठी एका निर्णायक टप्प्यावर झाली आहे, कंपनीने गेल्या वर्षभरात 200 हून अधिक ड्रोन कार्यरत केले आहेत आणि 330% महसुलात वाढ नोंदवली आहे. तसेच AICTE सोबत भागीदारीतून संपूर्ण भारतभर 50 “ड्रोन उत्कृष्टता केंद्रे” सुरू केली आहेत, जे ड्रोन शिक्षण व कौशल्य विकासात कंपनीचे नेतृत्व अधिक दृढ करते.

VoxelSensors चे अध्यक्ष आंद्रे मियोडेझ्की यांनी, या सहकार्याचे स्वागत करत म्हटले की, “ही भागीदारी आमच्या सेन्सिंग तंत्रज्ञानाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात आणते. यामध्ये युरोपियन नवकल्पना आणि भारताचा वेगाने विकसित होणारा ड्रोन इकोसिस्टम यांच्यातील आदर्श समन्वय दिसतो.”

भारत जागतिक ड्रोन क्षेत्रात, आपली स्थिती अधिक मजबूत करत असताना, IG Drones आणि VoxelSensors यांच्यातील ही भागीदारी हे दाखवून देते की आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून तांत्रिक परिवर्तन शक्य आहे.

— टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleMassive Joint Operation Underway as Fire Engulfs Hazardous Singaporean Cargo Ship Off Kerala Coast
Next articleMiddle East War Begins: As Israel Strikes Iran, Why the U.S. Needs Pakistan — and Why India Must Watch Its Flanks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here