पश्चिम आणि मध्य मालीत लष्करी आणि सरकारी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या समन्वित दहशतवादी हल्ल्यांच्या विस्तृत मालिकेचा भाग म्हणून ही घटना घडली असावी.
परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली तीव्र चिंता, घटनेचाही केला निषेध
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या अपहरणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एका अधिकृत निवेदनात, MEA ने हिंसाचाराच्या या कृत्याचा तीव्र निषेध करत “निंदनीय” घटना असल्याचे म्हटले आहे.
भारत सरकारने अपहरण केलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि लवकर सुटका सुनिश्चित करण्यासाठी त्वरित आणि आवश्यक पावले उचलण्याचे मालीमधील अधिकाऱ्यांना आवाहन केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित एजन्सींशी सतत संपर्कात आहेत.
मालीची राजधानी बामाको येथील भारतीय दूतावास स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी आणि डायमंड सिमेंट कारखान्याच्या व्यवस्थापनाशी सक्रियपणे संपर्क साधत आहे.
भारतीय राजदूत देखील अपहरण झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून अपहरण झालेल्यांबद्दल त्यांना मिळत असलेली माहिती आणि आवश्यक ती मदत पुरवत आहेत. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे हे भारत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
मालीमधील भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी
मालीमधील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने या देशातील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणारे एक निवेदन जारी केले आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नियमित अपडेटसाठी दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्रालयाने कुटुंबियांना आणि सामान्य जनतेला आश्वासन दिले आहे की अपहरण झालेल्या व्यक्तींना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज