भारत-टांझानिया यांच्यात AIKEYME 2025 सागरी सरावाला सुरुवात

0
AIKEYME

भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांमधील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, पहिल्या आफ्रिका-भारत की मेरीटाईम एंगेजमेंट (AIKEYME) सरावातील बंदर टप्प्याचे औपचारिक उद्घाटन टांझानियातील दार एस सलाम येथे भारतीय नौदलाच्या जहाजावर (आयएनएस) चेन्नई येथे करण्यात आले. टांझानियाचे संरक्षण आणि राष्ट्रीय सेवामंत्री डॉ. स्टर्गोमेना लॉरेन्स टॅक्स आणि भारताचे संरक्षण राज्यमंत्री (एमओएस) संजय सेठ यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

AIKEYME 2025 हा भारत आणि टांझानिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, ज्यामध्ये कोमोरोस, जिबूती, केनिया, मादागास्कर, मॉरिशस, मोझांबिक, सेशेल्स आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील नौदलांचा सहभाग आहे. हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) मजबूत प्रादेशिक सागरी सुरक्षा चौकटीला चालना देणे हा या सरावाचा उद्देश आहे.

उद्घाटन कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, राज्यमंत्री संजय सेठ यांनीही अरुषा येथे नवीन शस्त्र प्रशिक्षण सिम्युलेटर सुविधेच्या शुभारंभात आभासी पद्धतीने भाग घेतला. भारताच्या संरक्षण उद्योगाची ताकद दाखविणाऱ्या संरक्षण प्रदर्शनाचेही त्यांनी उद्घाटन केले. प्रदर्शनात 22 भारतीय कंपन्या प्रमुख संरक्षण मंच आणि प्रणाली प्रदर्शित करत आहेत.

आपल्या भाषणात संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी सागरी आव्हानांवर मात करण्यासाठी सामायिक उद्देशाचे महत्त्व अधोरेखित केले, संपूर्ण प्रदेशात सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती या तत्त्वांतर्गत “महासागर” उपक्रम एकता आणि परस्पर विकासासाठी कसा महत्त्वाचा आहे याबद्दल मार्गदर्शन केले. शांततापूर्ण आणि समृद्ध सागरी भविष्य सुरक्षित करण्यासाठी शाश्वत भागीदारीच्या गरजेवर भर देत, “जर तुम्हाला वेगाने जायचे असेल तर एकटे जा; जर तुम्हाला दूर जायचे असेल तर एकत्र जा,” या आफ्रिकी म्हणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

डॉ. स्टर्गोमेना लॉरेन्स टॅक्स यांनी AIKEYMEचे सह-यजमानपद भूषवल्याबद्दल भारताचे आभार मानले आणि या उपक्रमाचे वर्णन मजबूत सागरी सहकार्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल असे केले. पायरसी, तस्करी आणि सागरी गुन्हे यासारख्या आव्हानांना सामूहिक प्रतिसाद देण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. सरावाच्या भविष्यातील आवृत्त्यांप्रती टांझानियाच्या वचनबद्धतेला दुजोरा देत, त्यांनी प्रादेशिक सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्याचे आवाहन केले.

आपल्या भेटीदरम्यान, संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी सहभागी नौदल आणि हिंद महासागर नौदल परिसंवाद (आयओएनएस) सागर जहाजाच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी आयएनएस चेन्नईचा दौरा केला आणि टांझानियाला पॅराशूटचे 15 संच, नॅशनल डिफेन्स कॉलेजसाठी पुस्तके आणि ट्राय-सर्व्हिसेस वॉर गेमिंग सिम्युलेटर अशा वस्तू भेट म्हणून दिल्या, जे दोन्ही देशांमधील दृढ संरक्षण संबंध प्रतिबिंबित करतात.

AIKEYME 2025 आणि आयओएस सागर उपक्रम हे बहुपक्षीय नौदल सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ते मुक्त, खुल्या आणि सुरक्षित हिंद महासागरासाठी सहभागी राष्ट्रांच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतात, सीमा ओलांडणारे बंध मजबूत करतात आणि शाश्वत प्रादेशिक सहकार्याच्या भविष्याचा पाया रचतात.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleIndia Successfully Tests High-Powered Laser Weapon, Joins Elite Global Club
Next articleउच्च-शक्तीच्या लेझर शस्त्राची चाचणी यशस्वी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here