PASSEX 2025: अरबी समुद्रात भारत-ब्रिटन नौदल समन्वयाचे प्रदर्शन

0

अरबी समुद्रात 9 ते 10 जूनदरम्यान, भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही यांच्यात, PASSEX 2025 हा द्विपक्षीय सराव पार पडला. या सरावाच्या निमित्ताने, भारत-ब्रिटन समुद्री सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे ठळकपणे दिसून आले. सरावादरम्यान, दोन्ही देशांच्या नौदलांमधील वाढती सुसंगतता आणि सामायिक धोरणात्मक दृष्टिकोन दिसून आला, विशेषतः बदलत्या इंडो-पॅसिफिक (हिंद-प्रशांत) भागातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर.

या सरावासाठी भारतीय नौदलाने INS तबर, एक पाणबुडी आणि P-8I हे सागरी गस्ती विमान तैनात केले होते, जे यूकेच्या कॅरिअर स्ट्राइक ग्रुपसोबत काम करत होते. या गटाचे नेतृत्व HMS Prince of Wales करत होते आणि HMS Richmond देखील त्यात सहभागी होते.

भारतीय नौदलानुसार, या सरावामध्ये जटिल आणि समन्वित प्रदर्शने करण्यात आली, ज्यामध्ये पाणबुडीविरोधी युद्ध सराव, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, टॅक्टिकल पृष्ठभागावरील संघर्ष आणि एक अधिकारी अदलाबदल कार्यक्रम या सर्व उपक्रमांचा समावेश होता, यामुळे दोन्ही नौदलांतील उच्च दर्जाचा ऑपरेशनल समन्वय दिसून आला.

PASSEX 2025, हे 2021 मध्ये सुरू झालेल्या द्विपक्षीय नौदल सहकार्याचे पुढचे पाऊल आहे. पहिल्या PASSEX सरावामध्ये, रॉयल नेव्हीचा CSG-21 उपक्रम चालू असताना, HMS Queen Elizabeth ने भारतीय नौदलाच्या शक्तिशाली ताफ्यासोबत सराव केला होता, ज्यामध्ये विध्वंसक जहाजे, फ्रिगेट्स, एक पाणबुडी आणि P-8I विमानांचा समावेश होता. या सरावात F-35B लाइटनिंग II या लढाऊ विमानाने प्रथमच भारतीय पाण्यात प्रवेश केला होता, ज्यामुळे संयुक्त क्षमतांमध्ये एक नवीन टप्पा गाठण्यात आला.

यंदाचा सराव, हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वाढत्या धोरणात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झाला असून, विश्वासार्ह नौदल भागीदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करतो. भारतासाठी असे उपक्रम समुद्री क्षेत्रातील जागरूकता वाढवतात आणि संरक्षण सज्जता बळकट करतात. तर ब्रिटनसाठी, या भागातील सातत्यपूर्ण उपस्थिती ही ‘ग्लोबल ब्रिटन’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे आणि या प्रदेशातील सुरक्षेप्रती असलेली त्यांची बांधिलकी दर्शवते.

केवळ सामरिक प्राविण्यापुरते मर्यादित न राहता, PASSEX सराव भारत–ब्रिटन संरक्षण संबंधांतील दृढता दर्शवतो. नियमित संयुक्त सराव आणि नौदल अदलाबदल यांमुळे परस्परसुसंगततेत सातत्याने वाढ झाली आहे आणि परस्पर विश्वासही बळकट झाला आहे—जे समुद्री चाचणी, तस्करी आणि प्रादेशिक अस्थिरतेसारख्या सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यावश्यक आहे.

जसे-जसे जागतिक भू-राजकीय प्रवाह बदलत आहेत, तसे PASSEX सारखे द्विपक्षीय सराव, दोन्ही देशांच्या ‘मुक्त, खुल्या आणि नियमाधारित’ हिंद-प्रशांत समुद्री व्यवस्थेप्रती असलेल्या कटिबद्धतेचे ठोस प्रतीक ठरतात.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleअल-कायदाचे अमेरिका आणि त्यांच्या नेत्यांविरोधात जिहादचे आवाहन
Next articleChina’s Simulated Satellite ‘Dogfight’ Sparks Alarms in India’s Defence Circles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here