अल-कायदा इन द अरेबियन पेनिन्सुलाचा (AQAP) नेता साद बिन आतेफ अल-अवलाकी याचा 34 मिनिटांचा एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये तो अमेरिकेविरुद्ध जिहादचे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि व्हाईट हाऊसशी जवळून संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींच्या हत्येचे आवाहन करताना बघायला मिळाला.
अल-अवलाकीने आपल्या संदेशात आपल्या समर्थकांना सध्याच्या प्रशासनाशी संबंध असलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनाही लक्ष्य करण्याचे आवाहन केले.
गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शविल्याच्या संदर्भात हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
“गाझामधील आपल्या लोकांसोबत जे घडले आहे – आणि घडत आहे – त्यानंतर कोणत्याही सीमा शिल्लक नाहीत,” असे अल-अवलाकीने सांगितले आणि अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना – त्यांचे वंश किंवा राष्ट्रीय मूळ काहीही असो – सूड घेण्याचे उघड आवाहन केले आहे.
प्रारंभिक आणि निर्णायक कारवाईचा भाग म्हणून, मी पापी, गर्विष्ठ आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पण अमेरिकेमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुसलमानाला आवाहन करतो-मग तो अरब असो, अमेरिकन असो किंवा इतर कोणत्याही वंशाचा. इथे केवळ एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मुस्लिम आहेत, पैगंबर महंमद यांचे अनुयायी आहेत,” असे तो या व्हिडिओत म्हणताना दिसतो.
‘सूडात्मक हिंसाचार’
अल-अवलाकीने जिहादच्या बॅनरखाली सूडात्मक हिंसाचाराचे आवाहन करून भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. “अविश्वासू अमेरिकन लोकांना मारताना कोणाचाही सल्ला किंवा परवानगी घेऊ नका. गरज आहे ती अढळ दृढनिश्चयाची. तुमच्या लक्ष्यांची यादी प्रभावी आणि अर्थपूर्ण असली पाहिजे,” असे तो म्हणाला.
त्यां त्यांच्या अनुयायांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या प्रतिमा प्रदर्शित करण्यापूर्वी “मानवतेतील सर्वात वाईट आणि गुन्हेगारांपैकी सर्वात वाईट” असे ज्याला म्हटले आहे त्यावर हल्ला करण्याचे आवाहन केले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यापूर्वी त्यांनी आपल्या अनुयायांना ‘मानवांमधील सर्वात वाईट आणि गुन्हेगारांमधील सर्वात वाईट’ लोकांवर हल्ला करण्याचे आवाहन केले.
व्हिडिओमध्ये एलोन मस्क यांच्या देखील एका फोटोचा समावेश असून, अल-अवलाकीने ट्रम्पच्या प्रमुख समर्थकांपैकी एक म्हणून मस्क यांचा उल्लेख केला आहे. मस्क यांनी आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक क्षेत्रात ट्रम्प यांना पाठिंबा दिला.
याव्यतिरिक्त, परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांचे फोटोही या व्हिडिओत दाखवण्यात आले.
त्यानंतर अल-अवलाकीने आपल्या संदेशात अधिक खळबळजनक उल्लेख करत म्हटले, “त्यांच्या कुटुंबियांच्या मागावर जा. व्हाईट हाऊसमधील राजकीय व्यक्तींशी संबंधित किंवा त्यांच्याशी जवळून संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण लक्ष्य मानले पाहिजे.”
60 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस
धमक्या आणि अमेरिकनविरोधी हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याच्या त्याच्या प्रदीर्घ इतिहासाला प्रतिसाद म्हणून अमेरिकी सरकारने साद बिन आतेफ अल-अवलाकीला – ज्याला साद मुहम्मद आतिफ या टोपणनावाने देखील ओळखले जाते – पकडण्यासाठी मदत करणाऱ्याला किंवा त्याची माहिती देणाऱ्याला 60 लाख डॉलर्सचे बक्षीस देऊ केले आहे.
2011 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेला अल-कायदाचा एक प्रमुख विचारवंत अन्वर अल-अवलाकी याच्या कुटुंबातील तो एक सदस्य असल्याचे मानले जाते.
साद अल-अवलाकीने सातत्याने अमेरिका, त्याचे मित्र देश आणि जगभरातील ज्यू समुदायांविरुद्ध हिंसाचाराचे आवाहन केले आहे.
“ज्यूंसाठी एकही सुरक्षित जागा ठेवू नका-जसे त्यांनी पॅलेस्टिनींसाठी कोणतेही आश्रय, घर किंवा शांततेचा क्षण सोडला नाही”, असे त्याने घोषित केले.
अरबी द्वीपकल्पातील येमेनमधून कार्यरत असलेल्या अल-कायदाची स्थापना 2009 मध्ये दहशतवादी गटाच्या सौदी आणि येमेनी शाखांच्या एकीकरणानंतर झाली.
अमेरिकेने 2010 मध्ये अधिकृतपणे एक्यूएपीला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)