संयुक्त सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराचे पथक फ्रान्सला रवाना

0

फ्रान्स येथे होणाऱ्या, द्वैवार्षिक भारत-फ्रेंच संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी, भारतीय लष्कराचे पथक मंगळवारी फ्रान्सला रवाना झाले. ‘शक्ती’ असे या सरावाचे नाव असून, त्याची 8वी आवृत्ती- 18 जून ते 1 जुलै दरम्यान कॅम्प लार्झॅक, ला कॅव्हलरी, फ्रान्स पार पडणार आहे.

एकूण 90 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व, प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या एका बटालियनद्वारे केले जात आहे तसेच इतर शस्त्रास्त्र दल आणि सेवांमधील कर्मचारी देखील यात सहभागी आहेत.

फ्रेंच पथकातही 90 जवान सहभागी असून, 13व्या फॉरेन लिजियन हाफ-ब्रिगेड (13th DBLE) चे सदस्यही या सरावात भाग घेणार आहेत.

‘शक्ती’ सराव हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या लष्करांमधील द्वैवार्षिक प्रशिक्षण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश परस्पर संवेदनशीलता वाढवणे, संचालनात्मक समन्वय घडवून आणणे आणि लष्करी संबंध दृढ करणे हा आहे.

संयुक्त ऑपरेशन्सवर भर

या आवृत्तीत, संयुक्त राष्ट्रांच्या अध्याय VII अंतर्गत उप-परंपरागत वातावरणात संयुक्त ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, हे प्रशिक्षण अर्ध-शहरी भूभागात दिले जाईल.

हा सराव दोन्ही लष्करी पथकांना रणनैतिक सराव, युद्धतंत्र आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, नव्या पिढीच्या उपकरणांवर प्रशिक्षण, तसेच शारीरिक क्षमतेत वाढ यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच उपलब्ध करून देणार आहे.

याशिवाय हा उपक्रम एकता, परस्पर सन्मान आणि व्यावसायिक सलोखा वाढवण्यास मदत करेल.

शक्ती-VIII हा सराव भारत आणि फ्रान्समधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक असून, दोन्ही मित्र राष्ट्रांमधील सामरिक संबंध आणखी मजबूत करण्यास सहाय्य करणार आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यात पारंपरिकदृष्ट्या घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि दोन्ही देशांमध्ये सर्वांगीण सहकार्य असलेली दृढ आणि दीर्घकालीन सामरिक भागीदारी अस्तित्वात आहे.

26 जानेवारी 1998 रोजी, भारताची फ्रान्ससोबत पहिली सामरिक भागीदारी सुरू झाली होती, जी दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता वाढवण्याच्या दृष्टीने उभारण्यात आली होती.

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “संरक्षण व सुरक्षा, नागरी अणुऊर्जा आणि अंतराळ ही क्षेत्रे द्विपक्षीय भागीदारीचे मुख्य आधारस्तंभ असून, आता यामध्ये नव्याने इंडो-पॅसेफिक घटकही समाविष्ट झाला आहे.”

अलीकडच्या काळात, या भागीदारीअंतर्गत सागरी सुरक्षा, डिजिटायझेशन, सायबर सुरक्षा, प्रगत संगणन, दहशतवादविरोधी उपाय, हवामान बदल, नवीकरणीय व शाश्वत विकास या क्षेत्रांचा देखील समावेश झाला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleIndian Armed Forces on Standby as Armenia Facilitates First Batch of Evacuations from Iran
Next articleModi-Carney Meet: भारत-कॅनडा संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here