भारतातील जहाज बांधणी उद्योगाचे महत्त्व INS अर्नाळामुळे अधोरेखित

0

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत आज विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड येथे 16 अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टपैकी (ASW-SWC)  पहिले INS अर्नाळा भारतीय नौदलात दाखल झाले. हा टप्पा केवळ भारताच्या किनारी संरक्षण क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण झेपच नाही तर देशाच्या स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाचेही दर्शन घडवणारा आहे – जो संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा एक आधारस्तंभ आहे.

INS अर्नाळाचा सक्रिय सेवेत समावेश हा एक धोरणात्मक वळणबिंदू अधोरेखित करतो. हे केवळ एका अत्याधुनिक युद्धनौकेचे आगमन नाही तर भारताच्या नौदल स्वावलंबनाच्या प्रवासाला आकार देणाऱ्या दशकांच्या गुंतवणूक, नावीन्यपूर्णता आणि स्वदेशीकरणावर चढवलेला कळस आहे. या कमिशनिंग समारंभात नौदलाचा स्वदेशी तंत्रज्ञानावरील वाढता विश्वास तसेच भारतीय शिपयार्ड आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब पडले होते.

‘मातृ उद्योग’ वयात आला

बहुतेक वेळा त्याच्या गुणक परिणामामुळे “मातृ उद्योग” म्हणून ओळखले जाणारे, भारतातील जहाजबांधणी क्षेत्र आता आर्थिक आणि धोरणात्मक ताकदीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. स्टील, इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स आणि सेवा या प्रमुख उद्योगांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याने, जहाजबांधणी जीडीपी वाढ, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान विकासाला उत्प्रेरक बनवण्यासाठी अद्वितीयपणे स्थानावर आहे.

भारताचे संरक्षण जहाजबांधणी क्षेत्र आधीच त्या आश्वासनाची पूर्तता करत आहे. प्रत्येक स्वदेशी प्रकल्प पुरवठादार आणि उपकंत्राटदारांच्या विशाल नेटवर्कमध्ये , ज्यामध्ये 300 हून अधिक एमएसएमई समाविष्ट आहेत त्यांच्याकडून अधिकाधिक चांगले परिणाम कसे मिळतील याचा विचार सुरू आहे. त्याचे परिणाम केवळ रोजगारातच नव्हे तर संशोधन आणि विकास, कौशल्य विकास आणि निर्यात क्षमतेमध्ये देखील स्पष्टपणे उमटलेले दिसतात.

डिझाइन ते डिलिव्हरी: स्वदेशी उत्क्रांतीची सहा दशके

या परिवर्तनाची पाळेमुळे 1964 मध्ये रूजली , जेव्हा भारतीय नौदलाने सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशनची स्थापना केली. आता ते वॉरशिप डिझाइन ब्युरो (WDB) म्हणून ओळखले जाते. गेल्या सहा दशकांमध्ये, स्वदेशी युद्धनौका डिझाइनचा हा जन्मदाता 98 हून अधिक आघाडीच्या जहाजांचा विकास आणि वितरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, ज्यात विनाशक, फ्रिगेट्स, सर्वेक्षण जहाजे, लँडिंग जहाजे आणि अगदी भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका, INS विक्रांत यांचा समावेश आहे.

“INS अर्नाळाचे कमिशनिंग या वारशात भर घालते. हे नौदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला बळकटी देते: खरी सागरी शक्ती केवळ युद्धनौका मिळवण्यातच नाही तर त्यांची स्वदेशी पद्धतीने रचना आणि बांधणी करण्यात आहे,” असे जहाजबांधणी उद्योगातील एका अनुभवी व्यक्तीने सांगितले.

भारतात बांधण्यात आलेल्या युद्धनौकांची एक नवीन पिढी

या वर्षीच भारतीय नौदलाने INS  निलगिरी (पहिले P17A स्टेल्थ फ्रिगेट), INS सुरत (P15B विध्वंसकांपैकी शेवटचे) आणि INS वागशीर (शेवटची P75 पाणबुडी) यांचा समावेश करून एक अभूतपूर्व टप्पा गाठला, हा समारंभ 15 जानेवारी रोजी मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडला. INS अर्नाळासारख्या प्लॅटफॉर्ममध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा उपयोग करण्यात आला आहे – हे नौदलाच्या भारतीय उद्योगासोबतच्या खोल भागीदारीचा पुरावा आहे.

भारतात विकसित केलेल्या आणि स्वदेशी उत्पादित शस्त्रे आणि सेन्सर्ससह एकत्रित केलेल्या डीएमआर-249ए स्टीलचा वापर करून बनवलेल्या या जहाजांनी एकत्रितपणे 24 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. संरक्षण उत्पादन कसे एका शक्तिशाली आर्थिक इंजिनमध्ये रूपांतरित होऊ शकते याची ही प्रमुख उदाहरणे आहेत.

INS विक्रांत: राष्ट्रीय प्रयत्नाचा आर्थिक उपक्रम

आयआयएम कोझिकोडच्या अभ्यासानुसार, 125 हून अधिक भारतीय एमएसएमईंचा सहभाग असलेल्या आणि 76 टक्के स्वदेशी सामग्री पुरवणाऱ्या या ऐतिहासिक INS विक्रांत प्रकल्पाचा अंदाजे 45 हजार 950 कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम झाला – प्रकल्प खर्चाच्या 2.3 पट. केवळ विमानवाहू जहाजाने 14 हजारांपेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आणि पुरवठा साखळीत दीर्घकालीन क्षमता निर्माण केल्या. अशा प्रकल्पांचे धोरणात्मक लाभांश संरक्षणाच्या पलीकडे जातात – ते राष्ट्रीय क्षमता आणि औद्योगिक लवचिकता निर्माण करतात.

डिझाइनमध्येही आत्मनिर्भरता : धोरणात्मक आणि आर्थिक अत्यावश्यक

भारतीय नौदलाने आपल्या भांडवली बजेटचा महत्त्वपूर्ण भाग देशांतर्गत प्रकल्पांसाठी वापर करण्याच्या वचनबद्धतेमुळे अतिशय चांगले परिणाम बघायला मिळत आहेत. यामुळे खाजगी कंपन्या, GRSE आणि CSL सारख्या शिपयार्डद्वारे चालवल्या जाणाऱ्या एक स्वयंपूर्ण जहाजबांधणी परिसंस्था आणि विस्तारित MSMEs यासाठी आधार निर्माण झाला आहे.

भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण 2022 -23  नुसार, नौदल जहाजबांधणी उद्योगाचा GDP गुणक 1.82 आणि रोजगार गुणक 6.4 आहे – हे आकडे भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेला आकार देण्याच्या त्याच्या अतुलनीय क्षमतेवर प्रकाश टाकतात. जहाजबांधणीवर खर्च केलेला प्रत्येक रुपया लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रगत उत्पादनासह विविध संलग्न क्षेत्रांमध्ये 1.82 रुपयांवर परत येतो, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

2047 पर्यंत पूर्णपणे आत्मनिर्भरतेच्या दिशेने

INS अर्नाळाचे कमिशनिंग ही भारतीय नौदलात केवळ आणखी एक भर नाही तर 2047 पर्यंत पूर्णपणे स्वावलंबी दल बनण्याच्या देशाच्या दृष्टिकोनाचे ते एक शक्तिशाली प्रतीक आहे. हे जहाज स्वदेशी डिझाइन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगाचे एकत्रिकरण दर्शवते. भारत आता बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता आपल्या सागरी सुरक्षा गरजा पूर्ण करू शकतो.

प्रादेशिक पाण्याचे क्षेत्र अधिक वादग्रस्त होत असताना आणि हिंद महासागर क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी वाढत असताना, अर्नाळासारखी जहाजे भारताच्या पाण्याखालील देखरेख आणि पाणबुडीविरोधी क्षमतांमध्ये आघाडीवर असतील. परंतु कदाचित त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारत कशाची निर्मिती करू शकतो याचा तरंगता पुरावा म्हणून उभे आहेत – स्वतःसाठी, स्वतःद्वारे आणि जगासाठी, जसे जहाजबांधणीतील एका अनुभवी व्यक्तीने उत्साहाने आपले मत व्यक्त केले आहे.

रवी शंकर


+ posts
Previous articleTrump Calls For ‘Unconditional Surrender’ As Israel-Iran Air War Rages On
Next articleफाल्कन 2000 जेट्सची निर्मिती आता भारतात, नागपूरमध्ये अंतिम असेंब्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here