अमेरिकेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांना 14 जून रोजी वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या अमेरिकन लष्कर दिन समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यामुळे भारतीय धोरणात्मक वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे आमंत्रण वॉशिंग्टन आणि रावळपिंडी यांच्यातील शीतयुद्धाच्या शैलीतील संबंध पुन्हा जागृत झाल्याचे संकेत देणारे असून नवी दिल्लीसाठी चिंताजनक गोष्ट आहे.
यूएस सेंटकॉमचे कमांडर जनरल मायकेल कुरिल्ला यांच्या अलीकडील वक्तव्यानंतर जनरल मुनीर यांची ही भेट होणार आहे. 11 जून रोजी दहशतवादविरोधी कारवायांमधील “असामान्य भागीदार” म्हणून त्यांनी पाकिस्तानचे वर्णन केले होते. कुरिल्ला यांनी इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (IS-KP) विरुद्धच्या कारवायांमध्ये इस्लामाबादच्या सहकार्याचे कौतुक केले आणि दक्षिण आशियातील अमेरिकेच्या धोरणात्मक गणना “अद्याप बदललेली नाही” असे ठाम प्रतिपादन केले.
दहशतवादी भूमिकेची पाठराखण करणे?
भारतीय संरक्षण विश्लेषकांनी अमेरिकेच्या या भूमिकेवर तीव्र टीका केली असून इशारा दिला आहे की ते दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याच्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन भूमिकेची पाठराखण करणे आहे.
संरक्षण भाष्यकार लेफ्टनंट कर्नल मनोज के. चन्नन (निवृत्त) म्हणाले, “हे विधान भारताच्या मुख्य सुरक्षाविषयक चिंतांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.” ओसामा बिन लादेनला आश्रय देण्यापासून ते 26/11 च्या सूत्रधारांना संरक्षण देण्यापर्यंत, पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांमधील सहभाग चांगल्या प्रकारे नोंदवला गेला आहे. त्याला एक अभूतपूर्व भागीदार म्हणणे धोरणात्मक विस्मरण-किंवा त्याहून वाईट शब्दांत सांगायचे झाले तर अमेरिकेचा दुटप्पीपणा प्रतिबिंबित करते.
भारताने स्वतःहून अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर कधीही आक्षेप घेतला नसला तरी, दहशतवादाशी लढा देणारा देश आणि विश्वासार्हपणे त्याची निर्यात केल्याचा आरोप असलेला देश यांच्यातील खोट्या समतुल्यतेस सातत्याने विरोध केला आहे. “जर वॉशिंग्टन खरोखरच भारताकडे एक धोरणात्मक भागीदार म्हणून पाहत असेल, तर त्याने दहशतवादी प्रायोजक आणि दहशतवादी पीडितांची तुलना करणे थांबवले पाहिजे,” असे सांगून चन्नन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात “सोयीपेक्षा सातत्य” राखण्याचे आवाहन केले.
वॉशिंग्टनच्या लष्करी पाठिंब्याची पुनरावृत्ती
जनरल मुनीर यांना आमंत्रित केल्याने दक्षिण आशियातील अमेरिकेच्या निवडक स्मृती आणि व्यवहारिक राजनैतिकतेबद्दल जुन्या शंका पुन्हा निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानचा दुटप्पीपणाचा रेकॉर्ड असूनही, वॉशिंग्टनने प्रादेशिक स्थिरतेच्या नावाखाली वारंवार पाकिस्तानी लष्कराला शस्त्रे आणि निधी पुरवला आहे. विश्लेषकांना तोच खेळ मागच्या पानावरून पुढे परत सूरू राहण्याची भीती वाटते.
“विरोधाभास स्पष्ट आहे,” असे एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. “एकीकडे, अमेरिका चीनला संतुलित करण्यासाठी भारताला आकर्षित करते; दुसरीकडे, ते चीनच्या सर्वात जवळच्या प्रादेशिक प्रॉक्सी असलेल्या पाकिस्तानला कायदेशीर मान्यता देते. यामुळे विश्वास आणि दीर्घकालीन धोरणात्मक अभिसरण दोन्ही कमकुवत होतात.”
बदलत्या बुद्धिबळाच्या पटलावर विचारपूर्वक टाकलेले पाऊल
सूत्रांच्या मते, मुनीर यांचे आमंत्रण चीनच्या वाढत्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्या व्यापक पुनर्संचयनाचा एक भाग आहे. पाकिस्तानचे भौगोलिक स्थान, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हशी (BRI) असलेले त्याचे संबंध आणि त्याच्या न वापरलेल्या दुर्मिळ खनिज साठ्यांमुळे अमेरिकन हितसंबंध पुन्हा जागृत झाले आहेत.
तरीही वॉशिंग्टन इस्लामाबादच्या निष्ठेबद्दल सावध आहे. पाकिस्तानचे बीजिंगशी असलेले सखोल संबंध पाहता, अमेरिका हेजिंग करत असल्याचे दिसते – अफगाणिस्तान आणि दहशतवादविरोधी लढाईत निवडक सहकार्य शोधत आहे तर दुसरीकडे पूर्ण-प्रमाणात संरेखन टाळत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, 14 जूनच्या समारंभासाठी कोणत्याही वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याला असेच आमंत्रण मिळाल्याचे कोणतेही संकेत नाहीत, ज्यामुळे धोरणात्मक क्षुल्लकतेची धारणा आणखी बळकट झाली आहे.
भारताने डोळे उघडे ठेवून पुनर्विचार करावा
तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की वॉशिंग्टनचा पाकिस्तानकडे असणारा कल अतिशय नाजूक बनलेले प्रादेशिक संतुलन बिघडवू शकतो. “भारताला वेढले जात आहे—बांगलादेशच्या राजकीय वळणापासून ते म्यानमारच्या अस्थिरतेपर्यंत आणि चीनच्या वाढत्या नौदल आक्रमकतेपर्यंत,” चॅनन यांनी इशारा दिला. “अमेरिका कदाचित शत्रू नसेल, परंतु तो कायमचा मित्रही नाही.”
हेन्री किसिंजरच्या “अमेरिकेचा शत्रू असणे धोकादायक आहे, परंतु त्याचा मित्र असणे घातक आहे” या वाक्याचा उल्लेख करून चॅनन यांनी धोरणात्मक सुधारणा करण्याचे आवाहन केले. “भारताने फ्रान्स, इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरियासोबत भागीदारी अंगीकृत केली पाहिजे. ब्रिक्स आणि एससीओमध्ये नेतृत्वाचा आग्रह धरला पाहिजे. आणि जागतिक कथनांना (narratives) आकार दिला पाहिजे जिथे पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघडकीस येईल.”
काश्मीर आणि इतर मुद्दे
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारख्या गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉशिंग्टन खाजगीरित्या पाकिस्तानला आग्रह करू शकते, परंतु भारतीय अधिकारी कोणत्याही खऱ्या सुधारणांबद्दल साशंक आहेत. पाकिस्तान देखील त्याच्या खनिज-समृद्ध प्रदेशात गुंतवणूक करण्याची अपेक्षा करतो आणि काश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करू शकतो – हा मुद्दा नवी दिल्ली अजूनही द्विपक्षीय आणि वाटाघाटी करण्यायोग्य नसलेला मानते.
खरे तर, मुनीर यांच्या भेटीमुळे धोरणात नाट्यमय बदल होणार नाहीत. परंतु प्रतीकात्मकदृष्ट्या, धर्मगुरू-चालित, भारतविरोधी प्रवाहाचे पुरस्कर्ते म्हणून पाहिल्या जाणाऱ्या एका सेनापतीचे लाल गालिच्याने केलेले स्वागत, हा सामायिक लोकशाही मूल्यांचा विश्वासघात आहे, असा अर्थ नवी दिल्लीत आधीच लावला जात आहे.
धोरणात्मक सहभाग, आंधळा विश्वास नाही
भारतासाठी, मार्ग स्पष्ट आहेः अमेरिकेच्या भागीदारीला चालना देण्यासाठी धोरणात्मक संयम आवश्यक आहे, भावनात्मकता नाही. जसजशी जागतिक व्यवस्था विकसित होत आहे आणि भू-राजकीय टेक्टोनिक्स बदलत आहे, तसतशी नवी दिल्लीने आपली मुत्सद्देगिरी वास्तववादात ठेवली पाहिजे-आकांक्षा आणि कठीण राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये संतुलन साधणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
हुमा सिद्दीकी