“युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेची प्रगती ही कीवची भूमिका, मध्यस्थ म्हणून अमेरिकेची भूमिका आणि युद्धभूमीवरील घडामोडी यावर अवलंबून आहे,” असे क्रेमलिन प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह, यांनी रविवारी दूरदर्शनवरील निवेदनात सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीला पाच महिने उलटूनही, रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांच्या लहानशा शेजारी राष्ट्राविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाचा कोणताही स्पष्ट अंत झालेला नाही, जरी ट्रम्प यांनी 2024 च्या निवडणूक प्रचारात हे युद्ध एका दिवसात संपवण्याचे वचन दिले होते.
जानेवारीमध्ये अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून ट्रम्प यांनी, दोन्ही बाजूंना युद्धविरामासाठीच्या चर्चेच्या दिशेने वळवण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी त्यांनी पुन्हा सांगितले की, “युद्धाच्या तोडग्यासंदर्भात काहीतरी ठोस घडेल, अशी त्यांची भावना आहे.”
“कीव सरकारच्या भूमिकेवर स्वाभाविकच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत,” असे पेस्कोव्ह यांनी रशियाच्या शेजारील- चॅनेल बेलारूस 1 टीव्ही, या मुख्य सरकारी वाहिनीला सांगितले.
“यामध्ये वॉशिंग्टनची मध्यस्थी किती प्रभावी ठरते, तसेच युद्धभूमीवरील तात्कालीन परिस्थिती काय असेल, यावरही चर्चेची प्रगती अवलंबून असेल,” असे त्यांनी नमूद केले.
पेस्कोव्ह यांनी मॉस्कोला, वॉशिंग्टन किंवा कीवकडून नेमके काय अपेक्षित आहे यावर स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, ‘युक्रेनने अधिक भूभाग सोडावा आणि पाश्चात्त्य लष्करी मदतीचा त्याग करावा, अशी मागणी मॉस्कोने कायम ठेवली आहे, जी कीवला मान्य नाही,’ असे त्यांनी सांगितले.
समोरासमोर चर्चा
पुढील फेरीच्या चर्चेची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी, “रशियाला आशा आहे की लवकरच या तारखा नक्की केल्या जातील,” असे पेसकोव्ह म्हणाले.
तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धानंतर, रशिया आणि युक्रेनने 16 मे आणि 2 जून रोजी, इस्तंबूलमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर येऊन चर्चा केली, ज्यामुळे कैद्यांची देवाणघेवाण आणि त्यांच्या मृत सैनिकांना परत आणण्याची मालिका यशस्वीरित्या राबवता झाली.
तथापि, या चर्चेनंतरही त्यांनी युद्धबंदीच्या दिशेने कोणतीही ठोस प्रगती केलेली नाही. “2 जूनच्या चर्चेत सामायिक केलेल्या शांतता करारासाठीच्या त्यांच्या ब्लूप्रिंट्स म्हणजे, ‘पूर्णत: एकमेकांविरोधातील निवेदने’ होती,” असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले.
युक्रेनच्या सुमारे पंचमांश भागावर आधीच नियंत्रण ठेवणारा रशिया, हळूहळू प्रगती करत आहे. अलिकडच्या आठवड्यात युक्रेनच्या डोनेस्तक आणि निप्रोपेट्रोव्हस्क या आग्नेय प्रदेशांमध्ये डेरा जमावला असून, ते देशभरात हवाई हल्ले वाढवत आहेत.
चर्चेच्या मागील फेरीचे आयोजन करणाऱ्या तुर्कीने शुक्रवारी सांगितले की, ” आम्ही दोन्ही देशांचे पुन्हा स्वागत करण्यास तयार आहोत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)