इराणच्या मुख्य प्रकल्पातील सर्व यंत्रांना नुकसान झाल्याची शक्यता

0
इराणच्या

इस्रायली हल्ल्यामुळे वीज खंडित झाल्यामुळे नतांझ येथील इराणच्या सर्वात मोठ्या संवर्धन प्रकल्पात कार्यरत असलेल्या सर्व म्हणजे अंदाजे 15 हजार सेंट्रीफ्यूजचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असावे किंवा ते नष्ट झाले असावे अशी शक्यता असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक निरीक्षक प्रमुखांनी सोमवारी सांगितले.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आणि तिचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी यापूर्वी म्हटले होते की नटान्झ येथील भूमिगत संवर्धन प्रकल्पातील सेंट्रीफ्यूजचे नुकसान त्याच्या वीज पुरवठ्यावरील हवाई हल्ल्यामुळे झाले असावे. अर्थात वरवर बघता प्रकल्प असलेल्या भागाला या हल्ल्याचा फटका बसल्याचे दिसून आलेले नाही.

“आमचा अंदाज असा आहे की बाह्य शक्तीच्या या अचानक झालेल्या नुकसानीमुळे, सेंट्रीफ्यूज पूर्णपणे नष्ट झाले नसले तरी त्यांचे गंभीरपणे नुकसान झाले आहे,” असे ग्रोसी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

“मला वाटते की आतून नुकसान झाले आहे”, ते म्हणाले, त्यांच्या एजन्सीच्या 35-देशांच्या संचालक मंडळाच्या काही तासांपूर्वी झालेल्या अपवादात्मक बैठकीच्या अद्ययावत माहितीनुसार त्यांनी हे प्रतिपादन केले.

अत्यंत उच्च वेगाने फिरणाऱ्या नाजूक, बारीक संतुलित यंत्रांसाठी वीज खंडित होणे हा फार मोठा धोका आहे.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या तीन कार्यरत युरेनियम संवर्धन प्रकल्पांपैकी किमान दोन प्रकल्प बंद पडले आहेत. नतांझ येथील जमिनीवरील प्रायोगिक संवर्धन प्रकल्प नष्ट झाला, असे ग्रॉसी यांनी मंडळाला दिलेल्या अद्ययावत माहितीमध्ये सांगितले.

ग्रोसी यांनी मंडळाला सांगितले की डोंगरात खोलवर खोदण्यात आलेल्या वेगळ्या फोर्डो संवर्धन प्रकल्पात कोणतेही नुकसान झालेले दिसले नाही, नंतर बीबीसीला सांगितलेः “कोणतेही नुकसान नोंदवले गेले तरी (ते) खूप मर्यादित आहे.”

हल्ल्यांनंतर IAEA तिथली तपासणी करू शकलेली नसली तरी ती उपग्रह प्रतिमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे.

ग्रोसी यांनी इस्फहान आण्विक संकुलातील चार इमारतींच्या नुकसानीबद्दल तपशीलवार माहिती दिली, ज्यात युरेनियम-रूपांतरण सुविधेचा समावेश आहे, जी “यॅलोकॅक” युरेनियमचे युरेनियम हेक्साफ्लोराइडमध्ये रूपांतर करते, जो सेंट्रीफ्यूजसाठीचा कच्चा माल आहे, जेणेकरून ते उच्च विखंडनीय शुद्धतेसाठी समृद्ध केले जाऊ शकते.

“शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात चार इमारतींचे नुकसान झालेः केंद्रीय रासायनिक प्रयोगशाळा, युरेनियम रूपांतरण प्रकल्प, तेहरान अणुभट्टी इंधन उत्पादन प्रकल्प आणि यूएफ 4 (युरेनियम टेट्राफ्लोराईड) ते ईयू (समृद्ध युरेनियम) धातू प्रक्रिया सुविधा, जी निर्माणाधीन होती”, असे ते म्हणाले.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ग्रोसी पुढे म्हणाले, “इस्फहानमध्ये अशाही काही  भूमिगत जागा आहेत, ज्या जराही प्रभावित झाल्या आहेत असे दिसत नाही.”.

एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने त्या भूमिगत जागांमध्ये इराणचा सर्वाधिक समृद्ध युरेनियम साठा साठवला आहे असे सांगितले, परंतु तेथील परिस्थितीचे पूर्णपणे मूल्यांकन करण्यासाठी त्याची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 


+ posts
Previous articleIndia’s Energy Lifeline at Risk as Iran Threatens Hormuz Closure
Next articleFirst of 16 Indigenous Anti-Submarine Ships, Arnala, to Join Navy Fleet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here