लेफ्टनंट जनरल डी.एस.राणा यांनी अंदमान-निकोबार कमांडची सूत्रे स्विकारली

0

लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा, यांनी रविवारी अंदमान आणि निकोबार कमांडचे (CINCAN)- कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्विकारला. ही कमांड भारताची एकमेव त्रिसेवा (थिएटर) कमांड असून, अंदमान-निकोबार बेटांतील श्री विजयपुरम येथे मुख्यालय असलेली ही कमांड, धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. लेफ्टनंट जनरल डी.सी.राणा यांनी, एअर मार्शल साजू बालाकृष्णन यांच्याकडून कार्यभार स्विकारला असून, या कमांडचे नेतृत्व करणारे ते 18वे कमांडर ठरले आहेत.

या नेमणुकीपूर्वी, लेफ्टनंट जनरल राणा हे ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे’ महासंचालक (DGDIA) तसेच मुख्य एकत्रित संरक्षण कर्मचारी (मुख्यालय IDS) याठिकाणी उपप्रमुख (गुप्तचर) म्हणून कार्यरत होते. त्यांनी हे पद 31 मे 2025 रोजी सोडले. विशेष म्हणजे, जनरल राणा हे संरक्षण गुप्तचर प्रमुख पदावरून कमांडर-इन-चीफ या पदावर नियुक्त होणारे पहिले अधिकारी आहेत. यामुळे भारताच्या लष्करी नेतृत्वामधील संरक्षण गुप्तचर आणि त्रिसेवा समन्वय यांचे वाढते महत्त्व अधोरेखित होते.

लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा, यांची 19 डिसेंबर 1987 रोजी, गढवाल रायफल्सच्या 10व्या बटालियनमध्ये नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे, आपल्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी याच बटालियनचे नेतृत्वही केले, जी एक अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते.

खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) चे, माजी विद्यार्थी असलेले राणा हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथून पदवीधर आहेत. त्यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली, Centre for National Defence Studies, माद्रिद (स्पेन), आणि National Defence University, अमेरिका येथूनही उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीत त्यांनी अनेक प्रतिष्ठित लष्करी अभ्यासक्रमांत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.

तब्बल 37 वर्षांहून अधिक कालावधीच्या त्यांच्या गौरवशाली सेवेदरम्यान, लेफ्टनंट जनरल राणांनी विविध भूप्रदेशांमध्ये आणि संघर्ष क्षेत्रांमध्ये ऑपरेशनल, स्टाफ आणि प्रशिक्षणाशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यांनी पूर्व सेक्टरमधील एक पायदळ ब्रिगेड आणि डिव्हिजन, तसेच LAC (वास्तविक नियंत्रण रेषा)वरील गजराज कॉर्प्स यांचेही नेतृत्व केले आहे. ते Indian Military Training Team आणि United Nations Interim Force in Lebanon सोबतही सेवा बजावून आले आहेत.

प्रशिक्षक म्हणून त्यांनी, Indian Military Academy, देहरादून, College of Defence Management, सिकंदराबाद, आणि Army War College, महू येथील Higher Command Wing मध्ये योगदान दिले आहे.

त्यांच्या महत्त्वाच्या स्टाफ भूमिकांमध्ये स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर, स्टाफ ड्युटीजचे उपमहासंचालक, मिलिटरी इंटेलिजन्स (पूर्व) चे ब्रिगेडियर, प्रोव्होस्ट मार्शल, आणि संरक्षण मंत्रालयाच्या एकत्रित मुख्यालयात स्टाफ ड्युटीजचे महासंचालक हे समाविष्ट आहेत.

त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना: ‘परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM), युद्ध सेवा पदक (YSM), सेना पदक (SM), लष्करप्रमुख प्रशस्तिपत्र (COAS Commendation Card)’ या अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आले आहे.

एक तरुण अधिकारी म्हणून, जनरल राणा यांना काश्मीरमध्ये शौर्यगौरवासाठी सेना पदक आणि लष्करप्रमुख प्रशस्तिपत्र प्राप्त झाले होते. ते चीनच्या संरक्षण आधुनिकीकरणावर पीएच.डी. पदवीही धारक आहेत.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleUkraine Strikes Russian Bases Ahead Of Crucial Peace Talks
Next articleऑस्ट्रेलियाकडून मालदीवला पेट्रोलिंग जहाजाची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here