हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरची लष्कराला तातडीने गरज

0
हलक्या

अतिदुर्गम भागात असणाऱ्या लष्करी ठाण्यांपर्यंत योग्य प्रकारे दळणवळण व्हावे या उद्देशाने हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी भारतीय लष्कराने अलीकडेच खाजगी कंपन्यांशी करार केला आहे. या कराराअंतर्गत जम्मू प्रदेशातील 16 ठाण्यांना हेलिकॉप्टर सेवा देण्यात येईल. याशिवाय जम्मू आणि काश्मीर  तसेच लडाखमध्ये अतिरिक्त 28 ठाणी जोडली जातील. पुढील वर्षापासून हा उपक्रम 150 दिवस चालणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वेक्षण करणे आणि पाळत ठेवणे यासाठी 20 हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी लष्कराने एक वर्षापूर्वी जारी केलेल्या निविदेनंतर या घडामोडी घडल्या आहेत.

वर उल्लेख केलेल्या दोन्ही कामांसाठी आवश्यक असलेले हेलिकॉप्टर वजनाने हलके असावे म्हणजे मुख्यतः चीता आणि चेतक या मॉडेल्सची लष्कराला अपेक्षा आहे. ही हेलिकॉप्टर अत्यंत आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये, विशेषतः कडाक्याच्या थंडीच्या महिन्यांत फॉरवर्ड पोस्टसाठी महत्त्वपूर्ण जीवनरेखा म्हणून काम करतात. ते केवळ कर्मचारी आणि पुरवठा यांची वाहतूक करण्याचे साधन नसून इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसताना अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे एकमेव साधन आहे.

असा करार करण्यामागे लष्कराने नमूद केलेल्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे त्यांच्या सध्याच्या ताफ्याचे परिचालन आयुर्मान टिकवून ठेवणे. पहिले चेतक हेलिकॉप्टर हवाई दलात सामील करण्यात आले त्याला जवळपास 62 वर्षे झाली आहेत, तर चित्ता हेलिकॉप्टरची लष्कराकडून पहिली ऑर्डर 1971 मध्ये दिली गेली होती. यावरून  हे सूचित होते की या दोनही हेलिकॉप्टरचा सेवाकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे त्यांना वेळेत निवृत्त करण्याची आवश्यकता आहे. यातील बहुतांश हेलिकॉप्टर तीस वर्षांपेक्षा अधिक  जुनी आहेत.

सशस्त्र दलांनी 2027 पासून ही हेलिकॉप्टर निवृत्त करण्याची योजना आखली आहे. अर्थात टप्प्याटप्प्याने ही हेलिकॉप्टर कार्यमुक्त करण्याचे  एका दशकाहून अधिक काळापासून प्रयत्न सुरू आहेत. मधल्या काळात लष्कराची हलक्या हेलिकॉप्टर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रशियन कामोव्ह 226 ची निवड करण्यात आली होती. मात्र, युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती आणि स्वदेशी सामग्रीशी संबंधित चर्चांमुळे या आघाडीवर पुढे काही निर्णय घेतला जाईल ही आशा कमी झाली आहे.

चेतक आणि चीता हेलिकॉप्टरची जागा HALच्या लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH)  घेईल अशी अपेक्षा आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, सरकारने 12 LUHs च्या मर्यादित मालिका उत्पादनाला (LSP) मान्यता दिली आहे, त्यानुसार पहिले हेलिकॉप्टर डिसेंबरमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. एकंदर 225 हेलिकॉप्टरची एकट्या लष्कराला आवश्यक असताना, त्यांच्या संपादनासाठी अजूनही HAL सोबत औपचारिक करार झालेला नाही.

ध्रुव यादव


Spread the love
Previous articleNavigating Challenges: Army’s Urgent Need for Light Helicopters
Next articleDefence Innovations Take Centre Stage In Army’s High-Tech Exercise Near Jhansi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here