रविवारी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, “इराणसोबतच्या 12 दिवसांच्या संघर्षाने इस्रायलला नवीन संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यातील सर्वात महत्वाची संधी म्हणजे, 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी गाझामध्ये पकडून ठेवलेल्या ओलिसांची सुटका करणे.
त्यांच्या या विधानासोबतच, जेरूसलेम जिल्हा न्यायालयाने त्यांच्या दीर्घकालीन भ्रष्टाचार प्रकरणातील साक्ष पुढे ढकलल्याने, गाझा संघर्ष संपवण्याची आणि ओलिसांच्या सुटकेमध्ये प्रगती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी न्यायालयाने, गोपनीय राजनैतिक आणि सुरक्षाविषयक कारणांची दाखल घेत, नेतान्याहू यांचा ट्रायल पुढे ढकलण्याचा अर्ज स्विकारला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सुचवले होते की, “हा खटला मागे घेण्यात यावा, कारण नेतान्याहू यांना वाटाघाटी करण्यात अडथळा तो ठरू शकतो.”
इस्रायली लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एयाल झामीर, यांनी शुक्रवारी सांगितले की, “24 जूनला संपलेल्या इराण युद्धामुळे, गाझामधील इस्रायलच्या इराण समर्थित हमासविरोधी उद्दिष्टांमध्ये प्रगती होऊ शकते.”
इस्रायलचा सार्वजनिक रेडिओ कानने सांगितले की, “इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाची रविवारी संध्याकाळी बैठक झाली आणि सोमवारी पुन्हा एक बैठक होईल.” तर, इस्रायली माध्यमांनी सांगितले की, “इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री, जे नेतन्याहू यांचे विश्वासू आहेत, ते सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये इराण आणि गाझावरील चर्चेसाठी येण्याची अपेक्षा होती.”
अनेकविध संधी
रविवारी, इस्रायलच्या अंतर्गत गुप्तचर संस्था ‘शिन बेट’च्या एका सुरक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर नेतान्याहू म्हणाले की:
“इराण संघर्षातील या विजयानंतर अनेक संधी समोर आल्या आहेत, अनेक विविध संधी.”
“सर्वप्रथम, ओलिसांची सुटका करणे हे प्राधान्य असेल. अर्थातच, त्याकरता आपल्याला गाझा प्रश्न सोडवावा लागेल, हमासचा पराभव करावा लागेल, पण माझ्या अंदाजानुसार आपण ही दोन्ही उद्दिष्ट साध्य करु” असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गाझामध्ये असलेल्या 50 ओलिसांसाठी लढणाऱ्या, Hostages and Missing Families Forum Headquarters या संस्थेने नेतान्याहूंच्या या विधानाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की: “20 महिन्यांनंतर प्रथमच पंतप्रधानांनी ओलिसांच्या सुटकेस सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.”
“हे एक अत्यंत महत्त्वाचे विधान आहे, जे एका व्यापक करारात परावर्तीत होणे गरजेचे आहे, ज्याद्वारे सर्व 50 बंदकांची सुटका होईल आणि गाझामधील युद्ध समाप्त होईल,” असे त्यांच्या निवेदनात नमूद केले. या 50 बंदकांपैकी केवळ 20 जण जिवंत असल्याचा विश्वास आहे.
ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, “नेतान्याहू सध्या हमाससोबत कराराची वाटाघाटी करत आहेत, जरी कोणत्याही नेत्याने तपशील उघड केला नाही आणि दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ युद्धविरामाच्या शक्यतेबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.”
अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव
अमेरिकेने 60 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये अर्ध्या बंदिवानांची सुटका, पॅलेस्टिनी कैद्यांची देवाणघेवाण आणि पॅलेस्टिनी मृतांचे अवशेष परत करण्याच्या प्रमुख अटी सामाविष्ट आहेत. एकदा कायमस्वरूपी युद्धविराम झाला, की हमास उर्वरित बंदकांची सुटका करेल.
रविवारी, इस्रायली लष्कराने हमासविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याआधी उत्तर गाझातील नागरिकांना स्थलांतराचे आदेश दिले.
एका हमास अधिकाऱ्याने सांगितले की, “या गटाने मध्यस्थांना कळवले आहे की ते युद्धविराम चर्चेचे पुनरारंभ करण्यास तयार आहेत, मात्र त्यांनी पुन्हा एकदा ही अट अधोरेखित केली की कोणताही करार युद्ध समाप्ती आणि इस्रायलच्या गाझा तटबंदीमधून पूर्ण माघारीसहच होऊ शकतो.”
इस्रायलने म्हटले आहे की, “युद्ध केवळ तेव्हाच संपवले जाईल जेव्हा हमासला निशस्त्र आणि निष्क्रिय केले जाईल. हमासने मात्र शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला आहे.”
इस्रायलच्या आकडेवारीनुसार, हमासच्या 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक ठार झाले होते आणि 251 लोकांना गाझामध्ये बंदी बनवण्यात आले होते.
त्यानंतर इस्रायलच्या लष्करी कारवाईत, गाझा आरोग्य मंत्रालयानुसार 56,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले, ज्यात सुमारे 2.3 दशलक्ष लोकसंख्या विस्थापित झाली आणि संपूर्ण गाझा पट्टी मानवी संकटात ढकलली गेली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)