मात्र कार्यालयाने मेमोबद्दल तपशील शेअर केला नाही.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने असा युक्तिवाद केला की मेमोवर तातडीने निर्णय घ्यावा असे त्यात नमूद केले नसल्याने कर्मचाऱ्यांचा निर्णय योग्य होता, असे वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.
आयडीएफने त्या रात्री गाझामधील हमासच्या हालचालींची असंख्य चिंताजनक चिन्हे दर्शविणाऱ्या दस्तऐवजाचा मसुदा तयार करून नेतान्याहू आणि तत्कालीन संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यासह सात प्रमुख इस्रायली नेत्यांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना तो पाठवला होता, असे वृत्तवाहिनी 12 ने दिलेल्या वृत्ताला प्रतिक्रिया म्हणून ही कबुली देण्यात आली.
गुप्तचर अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा?
वृत्तांनुसार, नेतान्याहू यांच्या गुप्तचर अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. वृत्तात असाही दावा करण्यात आला आहे की माहिती न देण्यामागील कारणांचा आयडीएफने तपास केला नाही.
द टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, आयडीएफच्या गुप्तचर तपासावर देखरेख करणारे आयडीएफ अधिकारी मोशे श्नाइड यांच्या म्हणण्यानुसार “तिथे (पंतप्रधान कार्यालयातील आदेशांच्या साखळीमध्ये) काय चालले आहे हे मी तपासले नाही कारण मी राजकीय पातळीवरील तपासात खूप सावध होतो. मी पंतप्रधानांच्या गुप्तचर अधिकाऱ्याला अनेक वेळा रस्त्यावर भेटलो आणि मी त्यांना त्याबद्दल न विचारण्याचीही काळजी घेतली.”
आयडीएफचे प्रमुख हर्झी हलेवी यांच्या म्हणण्यानुसार, हल्ला होण्याच्या तीन तास आधी पंतप्रधान कार्यालयाला हमासच्या संशयास्पद हालचालींबद्दल सतर्क करण्यात आले होते हे आयडीएफने जाहीरच केले नाही. “जरी यामुळे आम्हाला आमच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या वाईट गोष्टींसाठी मदत होऊ शकली असती.” “आम्ही खूप जबाबदार आणि विवेकी आहोत. याचा प्रतिकार केला जात नाही ही शरमेची बाब आहे,” असे ते म्हणाल्याचे वृत्तपत्राने नमूद केले आहे.
त्याच बातमीत हलेवी यांचे म्हणणे उद्धृत केले आहेः “जर पंतप्रधानांचा गुप्तचर अधिकारी ही प्रामाणिक व्यक्ती असती, तर त्याने आधीच (नेतान्याहू) सांगायला हवे होते की त्याला (हल्ल्याच्या अगदी आधी हमासच्या तयारीबद्दल) माहिती होती आणि त्याने (नेतान्याहू) यासंदर्भात कोणतीही नवीन माहिती दिली नाही. [अधिकाऱ्याने] हे केले नाही.”
आपल्याला या हल्ल्याबद्दल कोणतीही आगाऊ माहिती मिळालेली नव्हती असे नेतान्याहुच्या कार्यालयाने स्पष्ट केले.
“चीफ ऑफ स्टाफने आयडीएफमधील नैतिक आणि विश्वासार्ह अधिकाऱ्यावर जाहीरपणे असा शाब्दिक हल्ला करणे आणि त्यांची जबाबदारी असताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना यासाठी जबाबदार ठरवणे हे अतिशय दुर्दैवी आहे,” असे पंतप्रधान कार्यालयाने ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ च्या हवाल्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गाझा युद्धविराम करार
इस्रायलने रविवारी सांगितले की, हमासबरोबरच्या युद्धविराम कराराचा पहिला टप्पा लवकरच संपणार आहे. त्यामुळे गाझामधील युद्धविराम तात्पुरता वाढवण्याच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिल्याचे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने मध्यरात्रीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी युद्धविराम वाढवण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यात रमजान काळाचा समावेश असेल, जो मार्चच्या अखेरीस संपणार आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी गट हमास यांच्यातील युद्धविराम कराराचा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्याबाबत कोणतीही खात्री न देता आठवड्याच्या शेवटी संपला. दुसऱ्या टप्प्यातील वाटाघाटी अजूनपर्यंत अनिर्णीत राहिल्या आहेत, गाझामध्ये अजूनही ओलिसांना ठेवण्यात आले आहेत आणि 20 लाखांहून अधिक पॅलेस्टिनींचे जीव धोक्यात आहेत.
इस्रायली निवेदनानुसार, करार लागू होण्याच्या दिवशी गाझामध्ये अजूनही असलेल्या ओलिसांपैकी निम्म्या ओलिसांना सोडण्यात येईल, तर कायमस्वरुपी युद्धविरामावर करार झाल्यास उर्वरितांना शेवटी सोडण्यात येईल.
हमासकडून यावर त्वरित कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हमासने याआधी युद्धविरामाला मुदतवाढ देण्याची कल्पना नाकारली होती.
टीम स्ट्रॅटन्यूज