पाकिस्तानने केली भारताची ‘copy’, आता ‘शांतता’ शिष्टमंडळ पाठवणार

0
शांतता

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानवर जागतिक स्तरावर टीका झाली. त्यानंतर करण्यात आलेल्या भारतीय लष्करी कारवाई  ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आपली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर विविध देशांना भेट देण्यासाठी एका “शांतता” शिष्टमंडळची घोषणा करण्यात आली आहे.

दहशतवादी कारवायांबाबत माहिती देण्यासाठी परदेशात शिष्टमंडळ पाठवण्याच्या भारताच्या प्रयत्नांची तंतोतंत copy करत आता इस्लामाबादने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांची नियुक्ती केली आहे. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार आणि सार्वजनिक विचारवंत शशी थरूर करत आहेत.

“पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज माझ्याशी संपर्क साधला, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी निर्माण होणाऱ्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. ही जबाबदारी स्वीकारणे आणि या आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहणे हा मला सन्मान वाटतो,” असे बिलावल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘एक योग्य निवड’

उच्च गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की बिलावल यांचे पाश्चात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषेतील अस्खलितता ही पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टीने फार मोठी संपत्ती आहे, ज्यामुळे ते थरूर आणि ग्लोबल पीस मिशनमध्ये भारतीय शिष्टमंडळातील इतर सदस्यांविरुद्ध इस्लामाबादचे प्रतिनिधित्व करण्यासाठी “योग्य निवड” ठरतील.

सूत्रांनी सांगितले की पाकिस्तान या मोहिमेचा वापर करून जागतिक स्तरावर स्वतःला दहशतवादाचे प्रायोजक देश ही प्रतिमा पुसून टाकत शांतताप्रिय देश अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

बिलावलच्या माध्यमातून भुट्टो कुटुंबाच्या राजनैतिक वारशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न लष्कर करत आहे.

शांतता आणि लोकशाहीवादी पक्ष

बिलावल यांच्या आई, माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि आजोबा, माजी राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी पीपीपीला शांतता आणि लोकशाहीवादी पक्ष म्हणून स्थान दिले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शांतता मोहिमेसाठी बिलावल यांची निवड करणे हे पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाने एक विचारपूर्वक केलेली राजकीय आणि राजनैतिक रणनीती असल्याचे दिसून येते.

बिलावल यांनी मरियम नवाज (माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी) आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांच्यासह स्वतःला पाकिस्तानातील तरुण नेत्यांच्या नवीन पिढीचा भाग म्हणून स्वतःची ओळख बनवली आहे.

बिलावल यांनी नवाज शरीफ आणि सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासारख्या वरिष्ठ व्यक्तींपासून सतत अंतर राखून काम केले आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे लष्कराचे आवडते प्रशासक म्हणून पाहिले जात असले तरी, बिलावल यांचे शांतता अभियान पाकिस्तानच्या संकरित युद्धनीती आणि आयएसआय समर्थित दहशतवादाला कव्हर करण्यासाठी सॉफ्ट-पॉवर डायव्हर्जन म्हणून काम करू शकते, असे वृत्तात म्हटले आहे.

ग्लोबल पीस मिशनमध्ये बिलावल यांच्याकडे तीन प्रमुख कामे आहेत.

भारताच्या हवाई हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतो या भारताच्या आरोपांना विरोध करण्यासाठी, बिलावल संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनसारख्या व्यासपीठांवर लॉबिंग करणार आहआणि

CPEC

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे (CPEC) उदाहरण देऊन भुट्टो पाकिस्तानला शांततापूर्ण गुंतवणूक केंद्र म्हणून उभे करण्याचा प्रयत्न करतील.

2015 पासून चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग असलेला 62 अब्ज डॉलर्सचा CPEC प्रकल्प, चीनमधील शिनजियांगला ३ हजार किमीपेक्षा जास्त महामार्ग, रेल्वे, पाइपलाइन आणि वीज प्रकल्पांद्वारे पाकिस्तानमधील ग्वादर बंदराशी जोडतो.

ते काश्मीरला मानवतावादी संकटाचे प्रकरण म्हणून सादर करण्याचा आणि या बाबत तृतीय पक्षाची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतील.

‘बळीचा बकरा’

भारतीय सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांचा असा दावा आहे की पाकिस्तानी सैन्याला दहशतवादी प्रॉक्सी गटांना पाठिंबा देत राहण्यासाठी बिलावलला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.

त्यांनी इशारा दिला आहे की बिलावलने सावधगिरीने पुढे जावे कारण त्याच्या भूमिकेमुळे जागतिक व्यासपीठांवरील त्याची वैयक्तिक विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.

पाकिस्तानच्या शांतता मोहिमेकडे ढोंगीपणाचा कळस म्हणून पाहिले जाते – पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने रचलेला तो एक स्टंट आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्सह)


+ posts
Previous articleEstonia: बाल्टिक समुद्रात रशियन सैन्याने तेल टँकर जप्त केला
Next articleMilitary Intelligence Ops Crush Pakistani Espionage Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here