अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्री भारतात असताना पाकिस्तानचा काबूलवर हल्ला

0

गुरुवारी रात्री अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाकिस्तानने हवाई हल्ला केला, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पहिल्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा हवाई हल्ला केला.

 

स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा हवाई हल्ला झाला.

पाकिस्तानी विमानांनी काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) छावण्यांवर हल्ला केला. यामुळे अफगाणिस्तानशी संघर्ष वाढला आहे. तिथे सध्या तालिबान राजवट आहे.

शाहिद अब्दुल हक स्क्वेअरजवळ झालेल्या या हल्ल्याचा उद्देश टीटीपी प्रमुख नूर वली मेहसूद याला ठार करणे हा होता, जो 2018 पासून या संघटनेचे नेतृत्व करत असल्याचे सांगितले जाते.

समोर आलेल्या एका ऑडिओ मेसेजमध्ये मेहसूद सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या सगळ्या वृत्तांचे खंडन करण्यात आले .

अनेक साक्षीदारांच्या मते एका लढाऊ विमानाचा आवाज त्यांनी ऐकला, त्यानंतर दोन मोठे स्फोट झाले आणि त्यानंतर स्वयंचलित गोळीबार झाल्याचे वृत्त दिले आहे.

पाकिस्तान बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानवर टीटीपीला निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप करत आहे.

हा हल्लाचे महत्त्वही तितकेच आहे कारण तो अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध लक्षणीयरीत्या बिघडले असून 2021 मध्ये अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्या तालिबान राजवटीशी भारत करार करण्यास तयार आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी मुत्ताकी 9 ऑक्टोबरपासून नऊ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

यापूर्वी पाकिस्तानी सुरक्षा दलांवर टीटीपीने अनेक हल्ले केले आहेत.

सर्वात अलीकडील हल्ला 7 ऑक्टोबर रोजी टीटीपीच्या दहशतवाद्यांनी निमलष्करी दलाच्या ताफ्यावर केलेला हल्ला होता.

या हल्ल्यात रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट आणि त्यानंतर गोळीबार झाला.

यात अकरा पाकिस्तानी सैनिक (दोन अधिकाऱ्यांसह) ठार झाले तर त्यानंतरच्या कारवायांमध्ये 19 दहशतवादीही मारले गेले.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानला कडक इशारा दिल्यानंतर 24 तासांच्या आत काबूलवर हल्ला झाला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleइस्रायलला F-35 चे सुटे भाग ब्रिटनने देऊ नये – पॅलेस्टिनी स्वयंसेवी संस्था
Next articleOver 30 Nations to Join India-Led UN Peacekeeping Chiefs’ Conclave 2025 in New Delhi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here