पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD Vance आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा वान्स, यांच्यासाठी सोमवारी सायंकाळी दिल्लीमध्ये स्नेहभोजन आयोजित केले आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, स्नेहभोजनापूर्वी पंतप्रधान मोदी आणि व्हान्स यांच्यामध्ये व्यापार, टॅरिफ आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
JD वान्स, त्यांची पत्नी उषा आणि त्यांची तीन मुले — इवान, विवेक आणि मिराबेल, सोमवारी सकाळी 10 वाजता, पालम हवाई तळावर दाखल होणार आहेत. वान्स कुटुंबीय चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागतासाठी एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अहवालात दिली आहे.
दिल्ली व्यतिरिक्त, वान्स कुटुंब जयपूर आणि आग्रालाही भेट देणार आहेत.
JD वान्स यांच्या भारत दौऱ्यात, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय (Pentagon) आणि परराष्ट्र विभागातील किमान पाच वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत.
दिल्ली आगमनानंतर, वान्स आणि त्यांचे कुटुंब स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देतील, तसेच पारंपरिक भारतीय हस्तकलेच्या वस्तू विकणाऱ्या बाजाराला भेट देण्याची शक्यता आहे, असेही माध्यमांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता, पंतप्रधान मोदी आणि वान्स यांच्यात द्विपक्षीय व्यापार कराराच्या अंतिम टप्प्यासाठी चर्चा होणार आहेत.
या बैठकीत भारताच्या बाजूने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते.
भारत दौऱ्यापूर्वी JD वान्स इटलीला भेट देणार आहेत.
रोममध्ये ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी यांची भेट घेतील, ज्या लवकरच व्हाइट हाऊसला भेट देणार आहेत.
2019 मध्ये कॅथोलिक धर्म स्विकारलेले JD वान्स, व्हॅटिकनचे सेक्रेटरी ऑफ स्टेट कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन यांचीही भेट घेणार आहेत. ते ईस्टर संडेच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)