कीव यांनी वारंवार विनंती करूनही जर्मनी युक्रेनला 480 किमीपेक्षा जास्त पल्ल्याची टॉरस क्रूझ क्षेपणास्त्रे देण्याचा विचार करत नसल्याचे जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पष्ट केले.
टॉरस क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी युक्रेनला पाश्चात्य उपग्रह, गुप्तचर यंत्रणा आणि जर्मन अधिकाऱ्यांची आवश्यकता असेल. याचाच अर्थ जर ती रशियावर सोडली गेली तर जर्मन अधिकारीही रशियन प्रदेशावर हल्ला करण्यात सहभागी असतील, असेही पुतीन पुढे म्हणाले.
“रशियन फेडरेशनशी थेट सशस्त्र संघर्षात फेडरल रिपब्लिकचा सहभाग नसेल तर हे काय आहे? याला दुसरे काहीही म्हणता येणार नाही “, असे पुतीन यांनी उत्तर रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील वरिष्ठ वृत्तसंस्थेच्या संपादकांशी बोलताना सांगितले.
मर्झ यांच्याशी बोलण्यास तुम्ही तयार आहात का? असे विचारले असता, पूर्वीच्या पूर्व जर्मनीमध्ये केजीबीचे गुप्तहेर म्हणून काम करणारे अस्खलित जर्मन बोलणारे पुतीन म्हणाले की आपण बोलण्यासाठी तयार आहोत.
“जर फेडरल चॅन्सेलरला फोन करून बोलायचे असेल, तर मी हे आधीच अनेक वेळा सांगितले आहे-आम्ही कोणत्याही संपर्कास नकार देत नाही. आणि यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत,” असे पुतीन म्हणाले.
मात्र युद्धभूमीवर जर्मन रणगाडे असल्याने युक्रेनमधील युद्धाच्या वेळी जर्मनी हा तटस्थ मध्यस्थ होता असे आपण मानत नसल्याचे पुतीन यांनी सांगितले.
पुतीन म्हणाले, “आम्ही फेडरल रिपब्लिकला, इतर अनेक युरोपियन देशांप्रमाणेच, तटस्थ देश मानत नाही, तर युक्रेनला पाठिंबा देणारा पक्ष म्हणून आणि काही प्रकरणांमध्ये, कदाचित, या शत्रुत्वाचे भागीदार मानतो.”
अर्थात जर्मनीने क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला, तरी त्याचा युद्धाच्या अंतिम निर्णयावर कोणताही परिणाम होणार नाही आणि रशियाचे सैन्य सर्व दिशांनी पुढे जात आहे, असा खुलासा पुतीन यांनी केला आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)