शीनबॉम यांना cartels ची भीती वाटते – ट्रम्प यांची प्रतिक्रिया

0

अंमली पदार्थ तस्करीचा सामना करण्याच्या दृष्टीने मेक्सिकोमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची आपली तयारी असल्याचे राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबॉम यांना सांगितले होते याला रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला. शिनबॉम यांनी एक दिवस आधी असा प्रस्ताव आल्याचे जाहीर करत या प्रस्तावाला आपण नकार दिल्याचे सांगितले.

फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला परत येत असताना एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, आपण ही ऑफर दिली होती कारण अमली पदार्थांच्या टोळीत (drug cartels)  ‘भयानक लोक’ होते, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

स्पष्ट विचार करू शकत नाही

ते म्हणाले, “जर मेक्सिकोला cartels च्या उच्चाटनासाठी मदत हवी असेल, तर ती करणे हा माझा सन्मान ठरेल”.

शीनबॉम यांनी हा प्रस्ताव  नाकारल्यामुळे तुम्ही निराश आहात का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की ती एक सुंदर स्त्री आहे. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा एक सुंदर स्त्री आहे, परंतु त्यांना cartels इतकी भीती वाटते की त्या स्पष्ट विचारही करू शकत नाही.”

सार्वभौमत्व विकता येत नाही

शीनबॉम यांनी शनिवारी सांगितले की आपण ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला आहे कारण “सार्वभौमत्व विकता येत नाही.”

2 मे रोजी प्रकाशित झालेल्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमी संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना त्यांचे वक्तव्य आले, ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की सामायिक सीमेवरील तस्करीचा सामना करण्यासाठी अंमली पदार्थांच्या टोळीविरुद्ध अमेरिकेच्या लष्करी सहभागाला शीनबॉम यांनी परवानगी द्यावी यासाठी ट्रम्प मेक्सिकोवर दबाव आणत आहेत.

शीनबॉम म्हणाल्या की दोन्ही देश सहकार्य करू शकतात, परंतु  “आमच्या प्रदेशात अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती मेक्सिको कधीही स्वीकारणार नाही.”

मेक्सिकोला यावर आणखी काम करण्याची गरजः अमेरिका

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) प्रवक्त्याने शनिवारी रॉयटर्सला सांगितले की, अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळ्या आणि गटांचा सामना करण्यासाठी मेक्सिकोने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते आणि अमेरिका मदतीसाठी तयार होती.

मेक्सिको अंमली पदार्थांची टोळी नष्ट करण्यात अयशस्वी ठरल्यास अमेरिका एकतर्फी लष्करी कारवाई करेल, असे ट्रम्प यांनी जाहीरपणे म्हटले आहे. सुरक्षा मुद्दे, व्यापार आणि स्थलांतर यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अलीकडच्या काही महिन्यांत अनेक वेळा एकमेकांना फोन केले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleभारतीय संरक्षण कंपनी BEL ब्राझीलमध्ये कार्यालय उघडणार
Next articleIranian Foreign Minister In Islamabad Amid India-Pakistan Standoff

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here